शेअर मार्केट म्हणजे ? – डॉ अमित बागवे – अर्थसंकेत

शेअर मार्केट म्हणजे? – डॉ अमित बागवे – अर्थसंकेत

शेअर मार्केट म्हणजे जिथे विविध कंपन्यांच्या शेअर्स ची खरेदी विक्री केली जाते. शेअर म्हणजेच कंपनीच्या एकूण भाग भांडवलातील एक भाग. जेव्हा एखाद्या कंपनीला करोडो रुपये भांडवल उभे करायचे असते त्यावेळी ते शेअर मार्केट मार्केट मध्ये शेअर्स विकून भांडवल उभे करतात.

शेअर मार्केटचे दोन प्रमुख प्रकार पडतात. प्राथमिक आणि दुय्यम. प्राथमिक शेअर मार्केट मध्ये नवीन कंपनीची नोंदणी केली जात. व दुय्यम शेअर मार्केट मध्ये शेअरची रोजच्या रोज खरेदी विक्री केली जाते.

जी व्यक्ती शेअर विकत घेते तिला शेअर होल्डर असे म्हणतात. शेअर होल्डर हा कंपनीचा सयुंक्त मालक असतो. त्याने जेव्हढे शेअर विकत घेतले असतील तेव्हढी त्याची कंपनीवर मालकी असते. कंपनीच्या प्रमुख मुद्द्यावर तो मतदान करू शकतो. तसेच कंपनीचा जमा खर्च हि बघू शकतो.

शेअर होल्डरला परतावा म्हणून जे व्याज मिळते त्याला डिवीडेंड असे म्हणतात. कंपनीला होणाऱ्या फायद्यावर डिवीडेंडचे प्रमाण अवलंबून असते. ते १०% ते ५००% पर्यंत कितीही असू शकते. तसेच जर एखाद्या वर्षी कंपनीला नेहमीपेक्षा १० पट किंवा अधिक फायदा झाला तर त्यावेळी कंपनी बोनस शेअर देते.

बोनस शेअर म्हणजे ज्यांच्याकडे आधीपासून शेअर आहेत त्यांना फुकट नवीन शेअर मिळतात. हे प्रमाण १:१ किंवा १:१० असेही असू शकते. त्याचप्रमाणे जेव्हा कंपनी बरेच वर्षे फायदा मिळवत राहते व चांगला डिवीडेंड देते त्यामुळे शेअर मार्केट मध्ये त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढत जाते.

उदा. टायटन ह्या कंपनीचा १ शेअर २००२ साली रु. ४०/- इतका होता, जो रु. ४०००/- झाला. कंपनीने १: २० बोनस शेअर देऊन त्याची किंमत रु. २४०/- वर आणली आहे. थोडक्यात शेअर मार्केट मधून ३ प्रकारे उत्पन्न मिळवता येते. १) डिवीडेंड २) बोनस शेअर्स ३) ठराविक काळाने वाढलेली किंमत.

share market marathi

भारतात शेअर मार्केट चे दोन प्रमुख शिलेदार आहेत…ते म्हणजे बी एस ई व एन एस ई….म्हणजेच मुंबई भाग भांडवल बाजार आणि राष्ट्रीय भाग भांडवल बाजार…दोन्हीही ठिकाणी शेअर्स ची खरेदी विक्री केली जाते..

बी एस ई हा १८७५ मध्ये स्थापन करण्यात आला..त्याची मालकी हि पूर्णपणे दलालांकडे आहे..तिथे एकूण ६५०० कंपन्यांची नोंद केलेली आहे…तसेच दिवसाकाठी रु. ६००० करोड चा व्यवहार केला जातो…

एन एस ई हा बी एस ई मध्ये होणारे घोटाळे तसेच गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी १९९२ साली स्थापण्यात आला…ह्याची मालकी हि प्रमुख सरकारी कंपन्यांकडे आहे…स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग हे एन एस ई मुळे सुरु झाले..इथे जवळपास २५०० कंपन्यांची नोंद आहे…कारण नियम खूप कडक आहेत…परंतु दिवसाकाठी रु. १००,००० करोडहून अधिकचा व्यवहार केला जातो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *