आर्थिक नियोजन न करण्याची कारणे ! – डॉ अमित बागवे

आर्थिक नियोजन न करण्याची कारणे ! – डॉ अमित बागवे

१. आर्थिक नियोजन कळत नाही !

प्रसार माध्यमे व इंटरनेट सर्वत्र आर्थिक नियोजनाचा बोलबाला असताना, तुम्ही अजूनही आर्थिक नियोजनापासून दूरच आहात का ?
उशिरा का होईना आर्थिक नियोजनाला सुरुवात करणे आवश्यक आहे !

आर्थिक नियोजनात खालील प्रकार येतात. 
१. गुंतवणूकीचे नियोजन 
२. निवृत्तीचे नियोजन 
३. मुलांचे भविष्य नियोजन 
४. कर नियोजन 
५. जोखीम व विमा नियोजन 
६. संपत्ती नियोजन

२. कळते पण वळत नाही !

आर्थिक नियोजनाची गरज मला काय ? असा प्रश्न नेहमीच सगळ्याना पडत असतो.  
आर्थिक नियोजनाचा उपयोग काय आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे !

३. आर्थिक नियोजन हि श्रीमंतांची मक्तेदारी !

ज्यांच्याकडे भरपुर पैसे आहेत, त्यांनीच आर्थिक नियोजन करावे, असा एक गैरसमज आहे. 
मुळात “ भरपुर पैसे कमविण्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागते ”, हेच आपल्याला कळत नाही.

श्रीमंत व्यक्ती आर्थिक नियोजन करूनच श्रीमंत झालेली असते व आर्थिक नियोजनाच्या माध्यमातूनच आपली श्रीमंती टिकवून असते  !

४. आर्थिक नियोजन केले आहे !

बँकेत मुदत ठेव किंवा एखादा विमा काढणे म्हणजे आपले आर्थिक नियोजन झाले असे आपल्याला वाटते !
“ आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण आयुष्याचे नियोजन असते ”  

आर्थिक नियोजन हे वर्तमान काळापासून भविष्य काळापर्यंत करावे लागते, तसेच आर्थिक नियोजनात जोखिमेपासुन सुरक्षितता या सर्वांचे व्यवस्थापन करावे लागते ! 

५. गुंतवणूक म्हणजे आर्थिक नियोजन !

फक्त गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक नियोजन नव्हे , आर्थिक नियोजनात भविष्य काळाची तरतूद तसेच जोखमीचे व्यवस्थापनही करावे लागते ! 

“ गुंतवणूक करणे व योग्य वेळी गुंतवणूक सोडविणे महत्वाचे असते ”  

६. आपत्कालीन परिस्थिती हाताळणे सोप्पे !

कधीच वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, असे नेहमीच आपल्याला वाटत असते ! त्यामुळे आपण कधीही जोखमीचे व्यवस्थापन करीत नाही
व आपला असा एक “ दुराग्रह ” असतो की, आपण आपत्कालीन परिस्थिती सहज हाताळू शकतो !

आपत्कालीन परिस्थिती ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, जसे की, नोकरी जाणे, व्यवसायात नुकसान होणे, खुप मोठा आजार अचानक उद्भवणे, मृत्यू !
त्यामुळे, प्रत्येक परिस्थितीला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावे लागते !

७. आजचे मरण उद्यावर !

“ उद्या पासून सुरुवात करू ” , असे म्हणत आपण कधीच सुरुवात करत नाही !

गुंतवणूक हि नेहमी जितक्या लवकर सुरु करता येईल तितक्या लवकर सुरु करणे आवश्यक आहे ! 

लवकर सुरुवात करण्याचा फायदा म्हणजे आपल्याला जास्त वेळ मिळतो. तहान लागल्यावर विहीर खणणे हा मूर्खपणा आहे !

कृपया आपल्या प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा. धन्यवाद.

Dr Amit Bagwe on Investment
Dr Amit Bagwe on Investment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *