भारत व जगासाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत लसींसाठीची शीतगृहांची साखळी बळकट करण्याचे ‘गोदरेज अँड बॉइस’चे लक्ष्य

भारत व जगासाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत लसींसाठीची शीतगृहांची साखळी बळकट करण्याचे ‘गोदरेज अँड बॉइस’चे लक्ष्य

• ‘जगासाठी, मेड इन इंडिया’ अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझरचे (उणे 80 अंश सेल्सियसच्या खाली) अनावरण; भारतातील सध्याच्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये तैनात असलेल्या विद्यमान पोर्टफोलिओचा विस्तार.

• लसींसाठीच्या प्रगत शीतगृह तंत्रज्ञानातून ‘गोदरेज अँड बॉइस’ने भविष्यातील लसींसाठी भारताला केले सुसज्ज व आत्मनिर्भर.

• भारतातील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी होत, अखेरच्या टप्प्यापर्यंत कोविड लस नेण्याकरीता ‘गोदरेज अँड बॉइस’ सज्ज.

भारत, 9 फेब्रुवारी 2021 : गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अँड बॉइस’ आपल्या स्थापनेपासूनच भारताला स्वावलंबी बनविण्यात हातभार लावत आहे. ‘गोदरेज अप्लायन्सेस’ या आपल्या बिझिनेस युनिटच्या माध्यमातून, देशातील आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, गोदरेज अँड बॉइस ही कंपनी सध्या देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होत आहे.

अतिशय संवेदनशील अशा लसी अगदी योग्य तपमानात सुरक्षितपणे साठविल्या जाव्यात, याकरीता प्रगत, देशातच बनविलेली ‘मेडिकल रेफ्रिजरेशन सोल्यूशन्स’ या कंपनीकडून पुरविली जात आहेत. आज या कंपनीने अत्याधुनिक, अल्ट्रा-लो (अतिशय कमी) तापमानाचे फ्रीझर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आणि लसीची शीतसाखळी आणखी मजबूत केली. या प्रगत वैद्यकीय फ्रीझरमध्ये जीवरक्षक औषधे आणि अति महत्त्वाच्या लसी उणे 80 अंश सेल्सियस या तपमानात ठेवता येतात. भारतीय आणि जागतिक अशा दोन्ही वैद्यकीय शीतसाखळीला चालना देण्याच्या उद्देशाने हे फ्रीझर बनविण्यात आले आहेत.

भारतात देण्यात येत असलेल्या व तपमानाबाबत अतिसंवेदनशील असलेल्या ‘कोवॅक्सिन’ आणि ‘कोविशील्ड’ या लसी साठवण्यासाठी, ऑक्टोबर 2020 मध्ये प्राप्त झालेल्या राष्ट्रीय निविदेचा एक भाग म्हणून, 2 ते 8 अंश सेल्सिअस तपमान तंतोतंत राखणारे खास रेफ्रिजरेटर्स सध्या ‘गोदरेज अप्लायन्सेस’कडून बनविले जात आहेत. ‘डायल्युंट्स’साठी उणे 20 अंश सेल्सियसचे तपमान राखणारे वैद्यकीय फ्रीझर्स आणि कोविड लसीकरण मोहिमेत अखेरच्या टप्प्यापर्यंत लसी नेण्यासाठी लागणारे ‘आईस पॅक’ हेदेखील कंपनीतर्फे तैनात करण्यात येत आहेत. विशिष्ट टप्प्यापलीकडे तपमानात चढ-उतार झाल्यास या लसींचे नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व आर्थिक नुकसानही होते.

‘अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’मुळे कंपनीच्या ‘पोर्टफोलिओ’मध्ये एक नवीन भर पडली आहे. विशेषत: सध्या इतर काही देशांमध्ये वितरीत करण्यात येणाऱ्या एमआरएनए-आधारित लसींसाठी हे फ्रीझर अनुकूल आहेत. ‘एमआरएनए-आधारित कोविड-19 लसी’ या तपमानाबाबत अति-संवेदनशील असतात आणि त्या अत्यंत थंड तपमानातच साठवाव्या लागतात. वातावरणातील इतर रेणूंमुळे नष्ट होण्याचा सततचा धोका ‘एमआरएनए’ला असतो. लस उत्पादकांनी ‘सिंथेटिक एमआरएनए’मध्ये रासायनिक बदल करून ते संरक्षक थरामध्ये गुंडाळले असले, तरी लसींचा अपव्यय रोखण्यासाठी त्या उणे 80 अंश सेल्सियसपेक्षा कमी तपमानात साठवणे आवश्यक असते; अन्यथा त्याचा थेट परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच, शीतगृह साखळीशी संबंधित लॉजिस्टिकल मुद्द्यांमुळे लसीकरण प्रक्रियेत कोणतीही नासाडी किंवा अकार्यक्षमता टाळली जाणे आवश्यक आहे.

‘गोदरेज अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’मध्ये, प्राथमिक व दुय्यम प्रणालीदरम्यान ‘हीट एक्सचेंजर’ म्हणून ‘पीएचई’ (प्लेट हीट एक्सचेंजर) असलेल्या ‘कॅसकेडिंग सिस्टीम’चे कार्यान्वयीन तत्व वापरण्यात आले आहे. या सिस्टीममध्ये दुय्यम प्रणालीतील स्थायी दबाव कमी करण्यात येतो, त्यामुळे तपमान कमी होते. याव्यतिरिक्त, ‘गोदरेज अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’मध्ये अलार्मसह ‘इनबिल्ट सेफ्टी सिस्टीम’देखील आहे. दुय्यम प्रणालीत दबाव वाढण्याची शक्यता असल्यास दुय्यम कॉम्प्रेसरला पुढील प्रकारे संरक्षण मिळते – (अ) तपमान वाढू नये, यासाठी 2 टप्प्यांतील सिलींग आणि अंतर्गत स्वतंत्र दरवाजे, (ब) ऑपरेशनदरम्यान युनिटच्या संपूर्ण कार्यक्षमतेस चालना देण्यासाठी, दुय्यम प्रणालीसाठी तेलाची पुनर्प्राप्ती. याउप्परही, ‘लिक्विड सीओटू’ किंवा ‘लिक्विड एनओटू’ यांसारखी ‘बॅक-अप सिस्टीम’ही यात देण्यात आली आहे. वीज खंडित झाल्यास किंवा यंत्रणेत बिघाड झाल्यास 48 तासांपेक्षा जास्त काळ स्थिर तपमान राखून, आतील लसींच्या साठ्याची सुरक्षितता या ‘बॅक-अप सिस्टीम’मुळे सुनिश्चित होते.

‘अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’ची सध्याची उत्पादन क्षमता वर्षाकाठी 12 हजार युनिट्स इतकी आहे. वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन वर्षाकाठी 30 हजार युनिट्स इतके त्वरेने वाढवण्याच्या दृष्टीने, गोदरेज अप्लायसेस प्रयत्न करीत आहे.

अखेरच्या टप्प्यापर्यंत लस नेण्याच्या पुढील प्रवासात मदत होऊ शकेल, अशा इतर मार्गांचा गोदरेज अप्लायन्सेस शोध घेत आहे. ग्रामीण महाराष्ट्रात लसीच्या रेफ्रिजरेटरने सज्ज असलेली रुग्णवाहिका चालविण्याची चाचणी तीन दिवस वीजप्रवाह न जोडता घेण्यात आली. हा मोबाइल क्लिनिकचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या रेफ्रिजरेटरमधील तपमान दर दोन तासांनी तपासले जात होते आणि ते आवश्यक त्या टप्प्यामध्ये असल्याची खातरजमा करण्यात येत होती. भारतात लसीकरणाची गती वाढत असताना, अधिक चपळ अशी दूरस्थ प्रकारची उपाययोजना ही यशाची गुरुकिल्ली ठरू शकते.

देशाची सेवा करण्यासाठी ‘गोदरेज अॅंड बॉइस’ कंपनी नेहमीच कटिबद्ध असते. ‘मेडिकल कॉम्पोनंट्स’, ‘हॉस्पिटल बेड अॅक्च्युएटर्स’, ‘व्हेंटिलेटर्स’साठीचे ‘इलेक्ट्रो-मॅग्नेटिक व्हॉल्व्ह’ यांसारखी उपकरणे असोत; लोकांना घरात सुरक्षितपणे राहता यावे यासाठी ‘डिसइन्फेक्टंट’ उपकरणे बनविणे असो; किंवा लोकांना सुरक्षितपणे काम करता येण्यासाठी सामाजिक अंतर राखता येण्याजोगी कार्यालये उभी करणे असो; ‘गोदरेज’ने नेहमीच देशाचा विचार प्राधान्याने केला आहे. ‘मेड इन इंडिया’ मेडिकल रेफ्रिजरेटर्स, फ्रीझर्स व आता अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर्

Godrej 2021
Godrej 2021

वर्ष २०२० यशोगाथा – डॉ अमित बागवे I Success Stories of Year 2020 Dr Amit Bagwe I

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलचे सभासद बना आणि मिळवा उद्योजकतेवर मार्गदर्शन सभासद होण्यासाठी लिंकव क्लिक कराhttps://www.youtube.com/channel/UCBVVHqd5d1TkfiwPVv1fnvg/join

अर्थसंकेत युट्युब चॅनेलवर १० लाख Views पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!

आपला उद्योग कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपर्क करा ८०८२३४९८२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *