पुण्यात स्थिरस्थावर होण्याची ‘महिंद्रा लाईफस्पेस®’ची योजना I

पुण्यातील पिंपरी येथील 3.2 एकर जमीन ‘महिंद्रा अॅंड महिंद्रा लि.’कडून खरेदी करण्याबाबतच्या अटींना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे, अशी माहिती ‘महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.’तर्फे आज देण्यात आली. खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनीही मान्य केलेल्या अटींच्या पूर्ततेच्या अधीन असलेला हा खरेदीचा व्यवहार सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ही जमीन नेहरू नगरच्या निवासी भागात आहे. या नवीन प्रकल्पात अंदाजे 3.25 लाख चौरस फूट चटईक्षेत्र उपलब्ध होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तो सूक्ष्म बाजारपेठेतील महिंद्रा लाइफस्पेसचा चौथा प्रकल्प असेल. या बाजारपेठेतील कंपनीचा यापूर्वीचा प्रकल्प, ‘महिंद्रा सेंट्रलिस’, 2019 मध्ये सादर होतानाच विकला गेला.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्य म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हा पुण्यातील धोरणात्मकदृष्ट्या विकसीत आणि भरभराट असलेला निवासी भाग आहे. येथे सामाजिक व नागरी पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. प्रस्तावित जमिनीच्या अधिग्रहणामुळे आम्हाला या उच्च-कार्यक्षम अशा सूक्ष्म बाजारपेठेत आमचे अस्तित्व उभे करण्यात मदत होईल. निवासी प्रकल्पांच्या विस्ताराच्या आमच्या धोरणानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे.”

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यालयासमोरील मेट्रो स्थानकापासून ही जमीन सुमारे 1 किमी अंतरावर आहे.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.विषयी :

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड हा 19.4 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहाचा रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा विकसनाचा व्यवसाय आहे. भारतातील शाश्वत शहरीकरणात ही कंपनी अग्रेसर आहे. 1994 मध्ये तिची स्थापना करण्यात आली. ‘महिंद्रा लाइफस्पेस®’ आणि ‘महिंद्रा हॅपीनेस्ट®’ या ब्रँड्सअंतर्गत निवासी घरांच्या विकसनाद्वारे आणि ‘महिंद्रा वर्ल्ड सिटी’ आणि ‘ओरिजिन्स बाय महिंद्रा वर्ल्ड सिटी’ या शहरे व उद्योग यांच्या एकत्रित वसाहतींद्वारे, भारतातील शहरांचे रुपांतर रमणीय प्रदेशांमध्ये करण्यास ही कंपनी कटिबद्ध आहे

देशातील सात शहरांमध्ये 25.7 दशलक्ष चौरस फूट ( 2.4 दशलक्ष चौरस मीटर) इतक्या क्षेत्रावर पूर्ण झालेल्या, चालू अवस्थेतील आणि आगामी स्वरुपाच्या निवासी प्रकल्पांचे कंपनीचे बांधकाम विस्तारलेले आहे; तसेच शहरे व उद्योग यांच्या एकत्रित वसाहती उभारण्याचे / व्यवस्थापनाचे कामही चार ठिकाणी 5000 एकर जमिनीवर सुरू आहे.

Mahindra Lifespace 2021
Mahindra Lifespace 2021

हरीत घरांच्या चळवळीची प्रणेती असलेली ‘महिंद्र लाइफस्पेस®’ ही कंपनी, जागतिक विज्ञान आधारित लक्ष्यित उपक्रमासाठी (एसबीटीआय) कटिबद्ध असलेल्या भारतातील अव्वल रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे. विचारपूर्वक केलेले डिझाइन आणि स्वागतार्ह वातावरण ही वैशिष्ट्ये बाळगून कंपनीचा विकास झालेला असल्याने येथील व्यक्ती आणि उद्योग या दोन्हींच्या जीवनमानात उन्नती साधली जाते.

www.mahindralifespaces.com या वेबसाईटवर ‘महिंद्रा लाइफस्पेस’बद्दल अधिक जाणून घ्या.

’महिंद्रा’विषयी :

महिंद्रा समूह हा 19.4 अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेला अनेक कंपन्यांचा समूह आहे. हा समूह लोकांना नवीन समृद्ध ’मोबिलिटी सोल्यूशन्स’ देऊन ग्रामीण भागात समृद्धी आणण्यास तसेच शहरी नागरिकांचे राहणीमान वाढविण्यास मदत करतो.  नवीन व्यवसायांचे व्यवस्थापन आणि समाजोपयोगी कार्येही हा समूह करीत असतो. भारतात युटिलिटी वाहनांचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सेवा आणि पर्यटन स्थळांच्या क्षेत्रातील उद्योग यांमध्ये या समुहाचे नाव अग्रभागी आहे. महिंद्र ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. या समुहाच्या अन्य व्यवसायांमध्ये अपारंपारीक उर्जा, कृषी व्यवसाय, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट विकसन या उद्योगांचा समावेश आहे. भारतातच मुख्यालय असलेला  महिंद्र उद्योग समूह 100 देशांमध्ये 2,56,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देतो.

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *