नेस्टले इंडियाला रु. ६१७.३७/- करोड रुपयांचा नफा I Nestle India 617/- crore profit I
नेस्टले इंडियाला रु. ६१७.३७/- करोड रुपयांचा नफा
तिसऱ्या तिमाहीत नेस्टले इंडियाला निव्वळ नफ्यात ५% ची वाढ
एफएमसीजी क्षेत्रातील नेस्टले इंडिया लिमिटेडने सप्टेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ५.१५ टक्क्यांची वाढ केली व हि रक्कम रु. ६१७.३७/- करोड आहे. हि कंपनी जानेवारी-डिसेंबर आर्थिक वर्षात काम करते.
कंपनीने एक वर्षापूर्वी याच कालावधीत ५८७.०९/- करोड चा नफा कमावला होता. या तिमाहीत निव्वळ विक्री ९.६३ टक्क्यांनी वाढून हि रक्कम रु.३,८६४.९७/- करोड आहे.मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३,५२५.४१/- करोड होती.
नेस्टले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणाले, या तिमाहीत पुन्हा एकदा कंपनीने सर्व श्रेणींमध्ये देशांतर्गत विक्रीमध्ये ‘दुहेरी अंकी मूल्यवर्धित वाढ केली आहे.
कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित होऊन संथ झालेल्या दुसऱ्या तिमाहीनंतर मजबूत महसूल वाढीसह तिसऱ्या तिमाहीत संघटित व्यापारास पुनर्जीवित केले.
नेस्टले इंडियाची देशांतर्गत विक्री १०.०७ टक्क्यांनी वाढून ३,६८७.३७/- करोड आहे. मागील वर्षी हि रक्कम रु.३,३५०.१०/- करोड होती.
कंपनीने सांगितले की, मॅगी नूडल्स आणि पोलो अलीकडेच मध्य पूर्व बाजारपेठेत सादर करण्यात आले आहेत, तर क्रियान वेफर्स आशियायी बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत,एकूण खर्च १०.४८ टक्क्यांनी वाढून ३,०८१ .९९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.२७८९.६७/- करोड होती.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R