एच डी एफ सी लाईफला रु. ३५८/- कोटी नफा I HDFC Life profit of Rs. 358/- Crore I
एच डी एफ सी लाईफला रु. ३५८/- कोटी नफा
एच डी एफ सी लाईफला मार्च तिमाहीत नफ्यात १३% ची वाढ
HDFC लाईफ ला मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३५८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१८/- कोटी होती. खर्च वाढले असले तरीही प्रिमिअम इन्कम व बिझनेस मार्जिन मध्ये वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. प्रिमिअम इन्कम मध्ये ११% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १४,२९०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२,८६८/- कोटी होती. एकूण खर्च १५% ने वाढला असून हि रक्कम रु. २४३०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २१०८/- कोटी होती. कंपनीच्या सीईओ ,विभा पडळकर म्हणाल्या, “सेव्हिंग व इन्व्हेस्टमेंट करिता मागणीत सातत्याने वाढ होत असून आर्थिक प्रगती च्या दिशेने भारताच्या प्रगती बरोबर कंपनीची प्रगती निश्चित आहे. “
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo