गोदरेज आणि बॉयसने पुनर्निर्मिती करता येऊ शकणाऱ्या उर्जेवर लक्ष केंद्रित करून ऊर्जा संवर्धनासाठी भारताची जी उद्दिष्टे आहेत त्यांना मजबूत केले I

गोदरेज आणि बॉयसने पुनर्निर्मिती करता येऊ शकणाऱ्या उर्जेवर लक्ष केंद्रित करून ऊर्जा संवर्धनासाठी भारताची जी उद्दिष्टे आहेत त्यांना मजबूत केले

~ भारतातील ऊर्जा संवर्धनाला चालना देण्यासाठी गोदरेज आणि बॉयसच्या  गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाने पुढील तीन वर्षांसाठी पुनर्निर्मिती करता येऊ शकणाऱ्या उर्जेसाठी ३०% चक्रवाढवाढीचा दर (कम्पाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट (CAGR) ठरविला आहे.

~ गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सने २०,००० गावांमधील आणि ५६ महानगरांमधील सुमारे १६ लाख घरांचे विद्युतीकरण केले आहे.

मुंबई,९ डिसेंबर२०२२: गोदरेज समूहाची एक प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयसने जाहीर केले की, त्यांचा गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स (इ अँड इ) विभाग पुनर्निर्मिती करता येऊ शकणाऱ्या उर्जेवर लक्ष केंद्रित करून भारताच्या ऊर्जा क्षेत्राला बळकट करीत आहे. २०३० पर्यंत भारताचे ५०० गिगा  वॅट एवढी अ-जीवाश्म ऊर्जा ( नॉन फॉसील एनर्जी) क्षमता निर्माण करण्याचे आणि आपल्याला जेवढ्या ऊर्जेची आवश्यकता आहे त्याच्या ५०% ऊर्जा ही पुनर्निर्मिती करता येऊ शकणाऱ्या उर्जेच्या वापराने पूर्ण करण्याचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर देशाची पुनर्निर्मिती करता येऊ शकणाऱ्या उर्जेची मागणी वाढवून भारताचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जा संवर्धन कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. यामुळे गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाने पुढील तीन वर्षांसाठी पुनर्निर्मिती करता येऊ शकणाऱ्या उर्जेसाठी ३०% चक्रवाढवार्षिकवाढीचा दर (कम्पाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट CAGR) ठरविला आहे.

            भारतात पुनर्निर्मिती करता येऊ शकणाऱ्या उर्जेचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि ही वाढती मागणी या दशकापर्यंत देशाच्या वीज क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणेल. भारताचा सुरक्षित नेट- झीरो ऊर्जेच्या प्रवास तीन खांबांनी बळकट केले आहे. ऊर्जा कार्यक्षमता, विद्युतीकरण आणि अक्षय ऊर्जा किंवा पुनर्निर्मितिक्षम ऊर्जा. ऊर्जा कार्यक्षमतेसाठी वचनबद्ध असलेल्या गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सचे प्रति वर्षी ५० मेगावॅट ते १०० मेगावॅट सौर प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. विद्युतीकरणासाठी गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर यूनिट ने २५ हून अधिक सब स्टेशनस् आणि  ४००kV पर्यंतच्या ३०० किमी ट्रान्समिशन लाइन्स सुरू केल्या आहेत. या प्रकल्पाने संपूर्ण भारतातील २०,००० गावे आणि ५६ शहरांमधील १६ लाख घरांचे विद्युतीकरण केले आहे, तसेच स्वच्छ व सुरक्षित वीज निर्माण करण्यासाठी लाखो सौर पॅनल स्थापित केले आहे. या शिवाय भारतात पुरनिर्मितीक्षम ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी सध्या राज्य जेन्को साठी ८५ मेगावॅट ग्राउंड माऊंटेड सौर प्रकल्पांवर काम करीत आहे. ज्यामध्ये वीज निर्वासनासाठी संपूर्ण पायाभूत सुविधा विकसित कराने समाविष्ट आहे.

            या विषयी बोलताना गोदरेज आणि बॉयसच्या  गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सचे वरिष्ठ उपसंचालक आणि व्यवसाय प्रमुख श्री राघवेंद्र मिरजी म्हणाले, गोदरेज आणि बॉयसमध्ये आम्ही टिकाउपणाची पुनर्रचना करण्यासाठी वचनबद्ध आहोत. प्रामुख्याने जागतिक कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि या व्हीजनची सतत जाणीव होण्यासाठी  विश्वासार्ह्यस्वच्छ उर्जेची उपलब्धता मदत करेल. अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओ हे आम्ही आमच्या धोरणात्मक व्यवसाय योजनेत ठरविलेल्या प्रमुख विकास क्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील ऊर्जा संवर्धनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुनर्निर्मिती करू शकणाऱ्या ऊर्जेस आवश्यक असणाऱ्या इएचव्ही (EHV) पायाभूत सुविधांमध्ये योगदान देण्याचे ध्येय ठेवत आहोत. भविष्यातील पिढ्यांसाठी वीज ट्रान्समिशन ची गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही भारतातील छोट्या छोट्या शहरांपर्यंत पोहोच वाढविण्याची आशा करतो.

            ऊर्जा संवर्धन विधेयकाने कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेसाठी नवीन उद्दिष्टे ठरविली आहेत आणि त्यासाठी ग्राहकांना त्यांच्या ऊर्जेच्या गरजा अ-जीवाश्म (नॉन फॉसील) स्त्रोतांकडून पूर्ण करणे आवश्यक आहे. गोदरेज आणि बॉयस कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापनासाठी विविध उपकरणे,साहित्य, उपाय आणि सेवा प्रदान करतात. गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या व्यवसाय यूनिट एमइपी (MEP) ने असे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत ज्यांना आयजीबीसी (IGBC), लीड (LEED), गृह (GRIHA) आणि वेल (WELL) यांसह विविध प्राधिकरणांकडून हरित आणि शाश्वत वातावरण निर्मितीसाठी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. याशिवाय, गोदरेज आणि बॉयसचा आणखी एक महत्वाचा व्यवसाय गोदरेज कन्स्ट्रकशन पुनर्वापर केलेल्या कॉँक्रीट व बांधकाम साहित्याचे उत्पादन करते. एएसी आणि पुनर्नविनीकरण केलेल्या कॉँक्रीट ब्लॉकस् मध्ये नेहमीच्या व्हर्जिन कॉँक्रीट ब्लॉकसच्या  तुलनेत ३०% पेक्षा कमी एम्बॉडीड कार्बन आहे. या एएसी आणि पुनर्नविनीकरण केलेल्या कॉँक्रीट ब्लॉकसच्या उत्कृष्ट इन्स्यूलेशन गुणधर्मामुळे हे ब्लॉकस ऊर्जेची आवश्यकता ५% पर्यंत कमी करू शकतात.

godrej & boyce
godrej & boyce

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *