इन्फोसिसला ५४२१/- कोटी रुपये निव्वळ नफा
इन्फोसिसला निव्वळ नफा ५४२१/- कोटी रुपये
आयटी सेवा प्रदाता इन्फोसिसने आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत विविध विभागात व भौगोलिक क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक चांगला नफा आणि महसूल नोंदवला.
बेंगळुरूस्थित कंपनीने वित्तीय वर्ष २०२२ साठी वर्तविलेले महसूल मार्गदर्शन १६.५ ते १७.५% दरम्यान राखले.
भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातदाराने निव्वळ नफ्यात ११.८ टक्क्यांनी वाढ केली व हि रक्कम ५४२१/- कोटी रुपये आहे. तर महसूल २०.५ टक्क्यांनी वाढून रु.२९,६०२ /- कोटी रुपये झाला आहे. यामध्ये प्रति शेअर १५ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांच्या डिसेंबरमध्ये सेवानिवृत्तीनंतर कंपनीने एक नवीन संघटनात्मक रचना तयार केली आहे. काही आठवड्यांत याची अंतर्गत घोषणा केली जाईल, असे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले.
“आम्हाला अधिक संधी मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही सतत क्षमता वाढवण्याची खात्री देत आहोत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना नवी कौशल्य देत आहोत आणि आमचे डिलिव्हरी फोकस बदलत आहोत आणि क्लायंट पाहतात की हे बदल सुसंगत आहेत. ” असे पारेख म्हणाले.
उत्तर अमेरिकेतील वाढ २३.१ टक्क्यांवर आली असून सर्वात मोठा विभाग-वित्तीयसेवा-चलन वाढीच्या दृष्टीने वार्षिक २०.५ टक्क्यांनी वाढला.
चालू आर्थिक वर्षात ४५,००० फ्रेशर्सची भर पडण्याची शक्यता आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R