आय सी आय सी आय प्रुडेन्शिअलला रु.४४६/- करोड नफा I ICICI Prudential Life Insurance Profit of Rs. 446/- Crore I

आय सी आय सी आय प्रुडेन्शिअलला रु.४४६/- करोड नफा

प्रीमियम, गुंतवणूक उत्पन्नात वाढ झाल्याने आय सी आय सी आय प्रुडेन्शिअलला निव्वळ नफ्यात ४८% ची वाढ

आय सी आय सी आय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स कंपनीने सप्टेंबर २०२१ मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४८ टक्क्यांची वाढ नोंदवली असून प्रीमियम आणि गुंतवणूक उत्पन्नात वाढ झाली आहे.

निव्वळ नफा रु.४४६/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३०२/- करोड होती. कारण गुंतवणुकीतुन उत्पन्नात ७०% ची वाढ नोंदवली असून हि रक्कम रु. १३,५४६/- करोड आहे. पुनर्विमा खर्चासाठी समायोजित केल्यानंतर निव्वळ प्रीमियम उत्पन्न ८% ने वाढून रु.९२८७/- करोड आहे.

सीईओ एनएस कन्नन म्हणाले की, साथीच्या आजारातून झालेली पुनर्प्राप्ती आणि जीवन विम्याच्या गरजेबद्दल ग्राहकांमध्ये वाढलेली जागरूकता यामुळे या तिमाहीत कंपनीला नवीन व्यवसाय अनुक्रमे ६२% ने वाढण्यास मदत झाली आहे. नवीन व्यवसाय विमा सौरक्षण रक्कम ३५% ने वाढली असून रु.३.३७/- लाख करोड आहे.

कन्नन म्हणाले की, कंपनीच्या नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीएनबी) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४५ % ने रु.८७३/- करोड आहे. जे गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत रु.६०२/- करोड होते.

कंपनीच्या उत्पादनांच्या मिश्रणामध्ये लिंक्ड बचत ४८%, पारंपारिक बचत ३०%, संरक्षण १७% आणि 5 %गट बचत उत्पादनांचा समावेश आहे.

icici pru
icici pru

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *