अल्ट्राटेक सिमेंटला रु. १७०८/- करोड नफा I Ultratech Cement profit Rs. 1,708/- Crore I

अल्ट्राटेक सिमेंटला रु. १७०८/- करोड नफा

आदित्य बिर्ला ग्रुप च्या अल्ट्राटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला डिसेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ७.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७०८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १५८४/- करोड चा निव्वळ नफा झाला होता.

ऑपरेटिंग महसुलात ५.८९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२,९८५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२,२६२/- करोड होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये मागणीत वाढ झाली असली तरीही नोव्हेंबर मध्ये पुन्हा मागणीत घट झाल्याचे कंपनीने सांगितले. अवकाळी पाऊस, दिवाळी सुट्टी , वाळू चा अपुरा पुरवठा यामुळे मागणीत घट झाली होती. देशांतर्गत सिमेंट विक्री प्रमाणात अद्याप वाढ झाली नसल्याचे कंपनीने सांगितले. कच्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. कंपनीने या तिमाहीत रु.३४५९/- करोड चे कर्ज परतफेड केली आहे.

ultratech jan 2022
ultratech jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

08 Dr Amit Bagwe Share Market
08 Dr Amit Bagwe Share Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *