अर्थसंकल्प २०२२ – सर्वसामान्यांची निराशा I Budget 2022 Nothing for Common Man I

अर्थसंकल्प २०२२ – सर्वसामान्यांची निराशा

  • भारताचा विकास दर ९.२७ टक्के असण्याचा अंदाज
  • अर्थसंकल्पातून भारताला पुढील २५ वर्षांचा पाया मिळणार
  • सरकार भांडवली खर्च १०.६८ लाख कोटी करणार
  • भांडवली गुंतवणुकीत ३५.४० टक्के वाढ. ७.५० लाख कोटी रुपये गुंतवले जाणार
  • राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा
  • रिझर्व्ह बँक आणणार डिजिटल चलन, ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून डिजिटल रुपया आणणार
  • पुढील पाच वर्षांत ६० लाख नव्या रोजगारांच्या निर्मितीचे लक्ष्य
  • पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वाढवणार. २० हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • रेल्वे, जल, हवाई वेगवान वाहतुकीसाठी गुंतवणूक करणार. १०० नवे कार्गो जाळे बनवणार.
  • देशात २५ हजार किमीचं रस्त्याचं जाळं उभं करणार
  • पुढच्या तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु होणार
  • पिकांच्या देखरेखीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्यास परवानगी
  • कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पांना नाबार्डच्या माध्यमातून मदत करणार
  • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी पुढील पाच वर्षांसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद
  • पेयजलासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद
  • गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवणार
  • शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल, स्थानिक भाषेत शिक्षण
  • डिजिटल विद्यापीठ स्थापन करणार
  • पीएम ई- विद्या चॅनल सुरू करणार, शिक्षणासाठी उच्च दर्जाचा ई-कंटेन्ट उपलब्ध करून देणार
  • २ लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार
  • पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ८० लाख घरे बांधणार, ४८,००० कोटींचा निधी देणार
  • ४.५ लाख टपाल कार्यालये डिजिटल पेमेंट अंतर्गत येणार
  • पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होईल
  • ७५ डिजिटल बँकिंग केंद्रे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ डिजिटल जिल्ह्यांत
  • चीप असणारे ई-पासपोर्ट योजनेला चालना देणार
  • जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन
  • २१ मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरु करणार
  • २०२२-२३ मध्ये ५ जी मोबाइल सेवा सुरू होणार
  • सर्व गावांमध्ये भारत नेटद्वारे ऑप्टिकल फायबरसाठी कंत्राट देणार. २०२५ मध्ये प्रत्येक गावात इंटरनेट असणार
  • देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी काम करण्यात येणार असून ११२ जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार
  • संरक्षण क्षेत्रातील २५ टक्के संशोधन आणि विकासाचा निधी खासगी कंपन्यांना संशोधनासाठी उपलब्ध करून देणार
  • संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी स्वदेशी उद्योगांकरिता संरक्षण खर्चापैकी ६८ टक्के तरतूद
  • सर्व मंत्रालयांमध्ये खरेदी व्यवहारांसाठी ई-बिल यंत्रणा सुरू करणार
  • देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार
  • नगर नियोजन क्षेत्रातील पाच शिक्षणसंस्थांच्या आधुनिकीकरणासाठी २५० कोटींचा निधी
  • प्राप्तिकर परतावा विवरणपत्र भरताना काही चुका झाल्यास दुरुस्त करण्याची संधी मिळणार
  • सहकार क्षेत्राचा कर १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यावंर
  • को-ऑपरेटिव्ह सोसीयटी ज्यांचं उत्पन्न १ ते १० कोटी आहे त्यांचा कर १२ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत कमी
  • कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर
  • कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १२ वरून ७ टक्क्यांवर
  • सौरऊर्जा निर्मितीसाठी १९ हजार ५०० कोटींची तरतूद
  • क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार
  • स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत करसवलत दिली जाईल
budget 2022
budget 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Dr Amit Bagwe
Dr Amit Bagwe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *