अबू धाबीची कंपनी अदानी ग्रुपमध्ये करणार गुंतवणूक I Investment in Adani Group I
अबू धाबीची कंपनी अदानी ग्रुपमध्ये करणार गुंतवणूक
३ अदानी ग्रुप कंपन्यांमध्ये अबू धाबीची इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी करणार गुंतवणूक
अबू धाबी मधील इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी भारतातील अदानी ग्रुप च्या ३ कंपन्यांमध्ये $२ बिलियन ची गुंतवणूक करेल. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेड यांचा समावेश आहे . इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी AGEL मध्ये रु.३८५०/- करोड, ATL मध्ये रु.३८५०/-, AEL मध्ये रु. ७७००/- करोड ची गुंतवणूक करेल. पुढील महिन्यात हि प्रक्रिया पूर्ण होईल. प्रेफरन्शिअल अलॉटमेंट माध्यमातून हि गुंतवणूक होईल. भारतात केली गेलेली हि इन्व्हेस्टमेंट दीर्घ काळासाठी असेल व ग्रीन एनर्जी विभागात गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळवण्याची हि संधी असल्याचे IHC चे व्यवस्थापकीय संचालक सय्यद बासर शोएब म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo