आयुर्वेद आणि आध्यात्मिक साधनेद्वारे अधिक प्रभावी उपचार शक्य – वैद्य डॉ. अभय जमदग्नी I Dr Abhay Jamdagni I

आयुर्वेद आणि आध्यात्मिक साधनेद्वारे अधिक प्रभावी उपचार शक्य – वैद्य डॉ. अभय जमदग्नी [शब्दांकन – श्री प्रशांत असलेकर (९३२२०४९०८३)]

पुण्यातील सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात काम करणारे एक दांपत्य होते. उमेदीची वर्षे करिअर घडवण्यात खर्ची घातल्याने त्यांचा विवाहच काहीसा उशिरा झाला होता. त्यानंतरही काही वर्षे प्लॅनिंग केल्यावर तिशीनंतर हे दांपत्य अपत्यप्राप्तीचा विचार करू लागले. नैसर्गिक गर्भधारणा होईना म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे उपाय केले. आयुर्वेद सोडून इतर उपचार पध्दतींचा अवलंब केला पण काही उपयोग झाला नाही. वैद्यकीय तपासणीत आढळून आले की त्या जोडप्यातील महिलेचे वाढलेले वय, सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनियमित जीवनशैली, नेहमीची जागरणे, बैठे काम आणि सतत जंक फूड खाल्ल्याने त्या स्त्रीची गर्भधारणा करण्याची क्षमताच नाहीशी झाली होती. तिच्या गर्भाशयात बीजांडांची निर्मिती होणे थांबले होते. दुसऱ्या स्त्रीचे बीज वापरून तिच्या गर्भाशयात बीजारोपण करणे शक्य होते पण त्या स्त्रीला असे दुसऱ्याचे मूल नको होते. शेवटी कंटाळून हे दांपत्य पुण्यातील श्री विश्र्वस्वास्थ्य आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म सेंटरच्या डॉ. अभय जमदग्नी यांच्याकडे आले. डॉ. जमदग्नी यांनी त्या स्त्रीला जास्तीतजास्त निसर्गसंवादी जीवनशैली अंगिकारायला लावली. पंचकर्माद्वारे तिच्या शरीरातील दोष काढून टाकले. तिची गर्भधारणा होण्याची नैसर्गिक क्षमता वाढवण्यावर भर दिला. त्याचबरोबर त्यांचे वैशिष्टय असलेल्या नाथ नाडी परिक्षा या तंत्राचाही वापर केला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे अवघ्या तीन महिन्यांच्या उपचारांनंतर तिच्या शरीरात गर्भधारणेस अनुकूल बनले. तिच्या गर्भाशयात बीजनिर्मिती होऊ लागली. ती स्त्री स्वत:चे मूल धारण करू शकायला सक्षम बनली. त्या दांपत्याला आपल्या रक्ताच्या अपत्याला जन्म देणे शक्य झाले. अशीच दुसरी एक क्रिटीकल केस डॉ. जमदग्नी यांनी कोरोनाकाळात हाताळली. त्यांचे एक परिचित श्री. भूतडा हे कोरोनाबाधित होते. त्यांची आक्सिजन लेव्हल फार घसरली होती. डॉक्टरांनी ते यातून वाचू शकणार नाहीत असे भाकीत केले होते. डॉ अभय जमदग्नी यांनी त्यांच्यावर आयुर्वेदिक पध्दतीने उपचार केले आणि त्यांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचून काढले. श्री भूतडा आता एक निरोगी आयुष्य जगत आहेत.

डॉ. अभय अशोक जमदग्नी यांनी हाताळलेल्या या केवळ दोन केसेस आहेत. अशा तऱ्हेच्या इतर अनेक गुंतागुंतीच्या, कीचकट आणि आव्हानात्मक केसेस ते रोज हाताळत असतात. आपले आयुर्वेदीय ज्ञान आणि नाथ नाडी परिक्षेच्या आध्यात्मिक साधनेद्वारे त्यांनी आजवर असंख्य रुग्णांना जीवनदान दिले आहे. दुर्धर व्याधींतून मुक्त केले आहे. हजारो रुग्णांच्या जीवनात सुख, स्वास्थ्य आणि आरोग्य पुनश्च परत आणले आहे. त्यांच्या बाबतीत उच्च कोटीचे आयुर्वेदाचे ज्ञान आणि नाथ नाडी परिक्षेच्या अभ्यासाने विकसित झालेली आध्यात्मिक साधना यांचा दुर्मिळ संयोग झाला आहे.

डॉ. अभय जमदग्नी यांच्या पाठीमागे आयुर्वेदाची प्रदीर्घ परंपरा उभी आहे. त्यांचे काका वैद्य समीर जमदग्नी हे सुध्दा पुण्यातील एक नामवंत वैद्य आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन डॉ. अभय यांनी आयुर्वेदिक डॉक्टर होण्याचे लहानपणीच निश्चित केले होते. दरवेळी सुटीच्या काळात काकांकडे जाऊन ते प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त करीत. इस्लामपूर – सांगली येथील राजारामबापू आयुर्वेदिक मेडीकलमधून त्यांनी बी.ए.एम.एस. ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी 2016 साली एम. डी. ही पदवीही संपादन केली. आपली प्रॅक्टीस सुरू करण्यापूर्वी काकांच्याच सल्ल्यानुसार माधवबाग या सुप्रसिध्द उपचार केंद्रशृंखलेत रिजनल हेड म्हणून तीन वर्षे नोकरी केली. यात 22 केंद्रांचे व्यवस्थापन त्यांना हाताळावे लागायचे. त्यातून त्यांना (पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रातील) रुग्णांना होणारे विविध आजार, त्यावरील उपाययोजना यांचे सखोल ज्ञान मिळाले. त्याचा पुढे स्वत:च्या प्रॅक्टीसमध्ये अमूल्य उपयोग झाला.

डॉ. अभय जमदग्नी यांचे अजून एक वैशिष्ट म्हणजे ते अवलंबत असलेली नाथ नाडी परिक्षा ही उपचार पध्दती किंवा तंत्र ! नाथपंथीय तत्त्वज्ञानाच्या अंतर्गत येणारी ही पध्दती आदीगुरू शंकरांपासून उगम पावलेली आहे. नाथपरंपरेतील सिध्दपुरूषांना तिचे ज्ञान होते. ते पुढे काळाच्या ओघात लुप्त झाले. कोल्हापूर येथिल प. पू. सद्गुरू माधवनाथ महाराज सांगवडेकर यांनी तिचे पुनरुज्जीवन केले. त्याच परंपरेतील प. पू. आनंदनाथ महाराज हे डॉ. अभय जमदग्नी यांचे आध्यात्मिक सद्गुरू आहेत. थोडक्यात सांगायचे तर पाठ्यपुस्तकीय आणि जड ज्ञानाद्वारे रुग्णावर उपचार करण्यापेक्षा या पध्दतीत वैद्याची आध्यात्मिक क्षमता वाढवण्यावर भर दिला जातो. त्यासाठी वैद्याला बरीच आध्यात्मिक साधना करावी लागते. तो रुग्णाच्या हृदयाशी एकाकार होऊ शकतो. त्यामुळे त्याची अंत:प्रेरणा बलवान होते. त्याला नेणिवेच्या पातळीवरून रोगाचे निदान होते. उपाययोजना सुचते. त्यामुळे तो रुग्णावर जड आणि तांत्रिक ज्ञानाने केलेल्या उपचारांपेक्षा अधिक प्रभावीपणे उपचार करू शकतो.

Dr. Jamdagni Logo
Dr. Jamdagni Logo

आयुर्वेद ही सनातन भारतीय संस्कृतीने मानवजातीला दिलेली अमूल्य देणगी आहे. पाच हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या आयुर्वेदात मानवी शरीराचे आश्चर्यकारक ज्ञान दिसून येते. मानवाला होणारे तमाम रोग तसेच भारतीय वनस्पती आणि जीवनक्रमातील बदलांद्वारे त्यावर करण्याचे उपचार यांची माहिती आयुर्वेदात आढळते. आयुर्वेद हा प्रामुख्याने निसर्गसंवादी जीवनशैलीची शिफारस करतो. आयुर्वेदिय उपचारांत थेट उपचार करण्याअगोदर विविध पंचकर्मांद्वारे रुग्णाच्या शरीराची शुध्दी केली जाते. त्याच्या शरीरातील दोष काढून टाकून त्याला उपचारांसाठी अनुकूल बनवले जाते. ही शुध्दी प्रक्रिया हे संपूर्ण आयुर्वेदाचेच वैशिष्टय आहे. ते इतर कोणत्याही पॅथीत अवलंबले जात नाही. आयुर्वेदिक उपचारांत तात्कालिक आणि दुखऱ्या भागावर स्थानिक उपचार करण्यापेक्षा संपर्ण जीवनशैली-आहार-विहारात आवश्यक ते बदल घडवून रोगाचे समूळ उच्चाटन करण्यावर भर दिलेला आढळतो. इतर पॅथींपेक्षा आयुर्वेदिय उपचार पध्दतीने मिळणारा आराम हा चिरस्थायी असतो. तो रोग पुन्हा संभवत नाही.

डॉ. अभय जमदग्नी यांच्याबाबतीत आयुर्वेदाचे ज्ञान आणि त्यात भर म्हणून नाथ नाडी परिक्षा या तंत्राचा अवलंब असा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळेच त्यांचा रुग्णांना बरे करण्याचा सक्सेस रेशो हा फार उच्चांकी आहे. डॉ. अभय जमदग्नी यांची सध्या पुण्यात सिंहगड रोड व औंध या दोन ठिकाणी चिकित्सा व उपचार केंद्र आहेत. त्याचबरोबर ते मुंबईतील दादर, कराड आणि कोल्हापूर येथेही महिन्यातील विविक्षित वेळी उपलब्ध असतात. त्यांचे आध्यात्मिक सद्गुरू प. पू. आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांद्वारे कोल्हापूर येथे श्री विश्र्वपंढरी ट्रस्टद्वारे श्री विश्र्ववती आयुर्वेद चिकित्सालय चालवले जाते. या ट्रस्टचे डॉ. अभय जमदग्नी हे सेक्रेटरी आहेत. या केंद्रात अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स आपली सेवा मोफत देतात. कोरोनाच्या काळात या संस्थेतर्फे ‘ चला भारत सशक्त करू या ‘ ही जनजागृती व उपचार मोहीम राबवली गेली. तिच्या आयोजनात डा अभय जमदग्नी यांचा मोलाचा वाटा होता. या मोहिमेंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या माधव रसायन आणि रस माधव वटी या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. डॉ. जमदग्नी आणि इतर काही वैद्य त्यांना सातत्याने लागणारी काही औषधे पुणे येथिल एका रसशाळेत बनवून घेतात. त्यामुळे ती खात्रीची आणि अधिक परिणामकारक असतात.

Dr Abhay Jamdgani

डॉ. जमदग्नी यांचे कौटुबिक जीवनही अतिशय संपन्न आहे. त्यांचे वडील श्री. अशोक गोविंद जमदग्नी हे किर्लोस्कर कोप्लांट लि / इमर्सन कंपनीतून निवृत्त आहेत तर मातोश्री आरती या गृहिणी आहेत. डा अभय यांच्या पत्नी सौ. अमृता या भरतनाट्यम विशारद आहेत. डा जमदग्नी यांच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांच्या सर्व शाखांच्या कामाचे आणि तेथिल परिचारक वर्गाचे संपूर्ण व्यवस्थापन सौ. अमृता जमदग्नी बघतात. या दांपत्याला अर्जून हा पाच वर्षाचा गोड मुलगा आहे.

डॉ. अभय जमदग्नी यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आयुष मंत्रालयातर्फे 2018 साली आयुष कमल पुरस्कार देण्यात आला. तर 2021 मध्ये लोकशाही मराठी न्युज चॅनेलद्वारे पुणे रत्न हा सन्मान माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. अभय जमदग्नी यांना गायन आणि संगीताचा छंद आहे. शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे.

डॉ. अभय जमदग्नी म्हणतात की आयुर्वेद आणि आध्यात्मिक साधनेद्वारे रुग्णावर अधिक प्रभावी उपचार करणे शक्य आहे. एक आयुर्वेदतज्ज्ञ म्हणून ते सर्वसामान्य जनतेला सल्ला देतात की स्पर्धात्मक आणि चंगळवादी जीवनशैलीमुळे अवेळी जेवण, रात्रीची जागरणे, फास्टफूड यांचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करावे. बरेचसे रोग हे अयोग्य जीवनशैलीमुळेच होतात. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रकृती-पिंड धर्माला अनुसरून माणसाने युक्त आहार-विहार ठेवावा. त्यामुळे अनेक रोगांपासून आपला बचाव होईल. तसेच प्रत्येकाचा एक घरगुती स्नेही आयुर्वेदिक वैद्य असावा. त्यांच्याकडून आपली नियमित शारीरिक तपासणी करून घेत जावी. थोडक्यात निसर्गसंवादी जीवनशैली अवलंबावी. त्यामुळे आपोआपच आरोग्य चांगले राहील.

संपर्क – डॉ. अभय जमदग्नी —– 96653 87217

श्री विश्र्वस्वास्थ्य आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म सेंटर

    Email – drabhay26@gmail.com
    Facebook – https//www.facebook.com/vishwaswasthya
Dr Abhay Jamdagni
Dr Abhay Jamdagni

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *