महिला बचत गटांच्या माध्यमातून संकेत समृद्दीचा
महिला बचत गटांच्या माध्यमातून संकेत समृद्दीचा
दररोज अर्थसंकेतच्या माध्यमातून आम्ही असंख्य उद्योजकांना भेटत असतो, त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेतो, विविध कार्यक्रमांना जातो, पण आजचा दिवस खास होता, कारण आज मी महिला बचत गट आणि त्यांचे उत्पादन जाणून घेण्यासाठी ठेवलेला.
महिला या संसार चालवतातच, पण त्याच बरोबर आपल्या देशाचे आणि जगाचे देखील अर्थकारण अनेक प्रमाणावर महिलांवरच अवलंबून आहे. महिला बचत गट हे फक्त स्वतःच्या विभागा पुरते काम न करता पूर्ण महाराष्ट्रात आणि परदेशात देखील त्यांचे उत्पादन पोहोचवत आहेत, हे बघून आज खूप आनंद झाला.
मुंबई महानगरपालिकेच्या १२० विभागातून आलेल्या महिलांच्या उत्पादनांचा अभ्यास आणि आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, आज डॉ संगीता हसनाळे आणि त्यांच्या टीमने मला आणि माझ्याबरोबर काही उद्योजकांना आमची मतं मांडण्याची संधी दिली.
माझ्याबरोबर मी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला उद्योजकांना देखील नेले होते, त्यांनीदेखील सर्व महिला बचत गट लीडर्सना त्यांचे अनुभव सांगून खूप चांगले मार्गदर्शन केले.
संपूर्ण मुंबईतून महिलांनी त्यांच्या हाताने बनवलेले खूपच सुंदर वस्तू घेऊन आल्या होत्या. त्यांच्यासाठी मार्केटिंग आणि ब्रँडिंग या विषयावर मी त्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांना अजून मोठी बाजारपेठ कशी उपलब्ध होईल यासाठी देखील काही मुद्दे नमूद केले. सर्व महिलांमध्ये शिकण्याची आणि मोठे होण्याचे उमेद दिसून येत होती.
कोरोनानंतरच्या काळात, सर्व महिला बचत गटांना प्रोत्साहन देणं आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत याची जाणीव करून देण्याचं काम महानगरपालिकेच्या महिला आणि बालविकास खाते यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून खूपच चांगले काम करण्यात आले.
महिलांनी सर्व प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जाऊन स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे आणि मोठा उद्योग करावा याकरिता आम्ही सर्वजण कार्यरत आहोत.
महिला बाल विकास अध्यक्ष, रेडकर मॅडम, N Ward च्या CDO वेदिका मॅडम, विविध वर्ड चे आलेले पदाधिकारी, सर्व महिला बचत गट आणि माझ्याबरोबर आलेल्या उद्योजिका सौ सानिका गोळे, सौ सुजाता चव्हाण आणि सौ शिवकला सर्वांचे आभार.
महिला घडल्या तर देश घडेल ❤️🙏
- सौ रचना लचके बागवे
अर्थसंकेत
Helicopter Book Launch Mrs. Rachna Bagwe I
हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन डॉ अमित बागवे विश्वविक्रम
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ ! संपर्क – 8082349822