क्रिप्टोला कधीही अधिकृत परवानगी देण्यात येणार नाही – अर्थ सचिव सोमनाथन
क्रिप्टोला कधीही अधिकृत परवानगी देण्यात येणार नाही – अर्थ सचिव सोमनाथन
रिझर्व्ह बँकेने आणलेला डिजिटल रुपी एक कायदेशीर चलन असेल. रिझर्व्ह बँकेने आणलेल्या डिजिटल चलनाखेरीज इतर कोणतेही चलन कायदेशीर नाही आणि कधीही कायदेशीर होणार नाही. बिटकॉईन, इथेरियम किंवा एनएफटी यांना भविष्यात कधीही कायदेशीर चलनाचा दर्जा मिळणार नाही, क्रिप्टोला कधीही अधिकृत परवानगी देण्यात येणार नाही. दोन लोकांमधील क्रिप्टोच्या व्यवहारांना क्रिप्टोकरन्सी असेट्स समजले जाईल.
आभासी मालमत्तेच्या हस्तांतरणामध्ये झालेल्या नुकसानावर कोणत्याही सेट-ऑफला परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ क्रिप्टोचा तोटा किंवा नफा चालू आर्थिक वर्षातील इतर कोणत्याही उत्पन्न किंवा तोट्यासह समायोजित केला जाऊ शकत नाही आणि तोटा पुढील वर्षासाठी पुढे नेला जाऊ शकत नाह – अर्थमंत्री सीतारामन
क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अर्थ सचिवांनी धोक्याची सूचना देऊन ठेवली आहे. जे क्रिप्टोकरन्सी व क्रिप्टो असेट सारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यांनी याला सरकारची मान्यता नाही, हे लक्षात घ्यावे. तुम्ही केलेली गुंतवणूक परतावा देईल किंवा तुमचे पैसे बुडतील, याची कोणतीही शाश्वती नाही. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते आणि यासाठी सरकार बिलकुल जबाबदार राहणार नाही. – अर्थ सचिव सोमनाथन
आभासी मालमत्तांच्या व्यवहारांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के दराने कर आकारण्यात येणार आहे. मात्र यामुळे व्यवहारांना कोणतीही कायदेशीर वैधता देण्यात आलेली नाही असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जेबी महापात्रा स्पष्ट केले आहे.
सध्या आभासी चलनांचे व्यवहार कोण करत आहे? ते किती प्रमाणात होत आहेत? कुठून केले जात आहेत? या सर्वाची माहिती प्राप्तिकर विभाग घेणार आहे.
जेव्हा डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून नफा प्राप्त होतो, तेव्हा गुंतवणूकदाराने त्यात गुंतवणुकीसाठी पैसे कोठून आणले हे सांगावे लागते आणि जर गुंतवणूक योग्य असेल तर त्यावर कर आकारला जातो. गुंतवणूक बेकायदेशीर किंवा बेनामी उत्पन्नातून केली असल्यास त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे प्राप्तिकर विभाग गुंतवणूकदाराला मिळालेला नफा बघत नसून गुंतवणूकदार करत असलेल्या गुंतवणुकीचे स्वरूपही बघत असते, असेही महापात्रा यांनी सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo