टर्टलमिंटने फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणसोबत केला ‘ग्रीन राईड २.०’ चा शुभारंभ I
टर्टलमिंटने फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणसोबत केला ‘ग्रीन राईड २.०‘ चा शुभारंभ
मुंबई, १९ डिसेंबर २०२२: भारतातील आघाडीचा विमा तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म टर्टलमिंटने ‘ग्रीन राईड २.० – एक पहल स्वच्छ हवा की ओर‘ या उपक्रमासाठी अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणसोबत हातमिळवणी केली आहे. या उपक्रमांतर्गत मिलिंद सोमण यांनी मुंबई ते बंगलोर अशी १००० किमीपेक्षा जास्त अंतराचा सायकलप्रवास सुरु केला आहे. वायुप्रदूषणाबाबत तसेच दळणवळणाच्या पर्यावरणस्नेही साधनांविषयी लोकांना माहिती देणे, जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हवा शुद्ध व स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे, याविषयीची जागरूकता पसरवण्यासाठी, लोकांनी वाहतुकीच्या पर्यावरणस्नेही साधनांचा वापर करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन राईडचे आयोजन करण्यात आले आहे. टर्टलमिंट हे ग्रीन राईड २.० चे एक प्रायोजक आहेत. मिलिंद सोमण यांनी मुंबईमध्ये १९ डिसेंबर रोजी राईडला सुरुवात केली, टर्टलमिंटच्या कार्यालयात ते थोडावेळ थांबले. पुणे, बंगलोर, म्हैसूर असा प्रवास करत ते २६ डिसेंबर रोजी मंगलोरला याची सांगता करणार आहेत. टर्टलमिंट हा भारतातील एक सर्वात मोठा विमा प्लॅटफॉर्म आहे, भारतभरातील २.५ लाखांहून जास्त विमा सल्लागारांच्या नेटवर्कमार्फत ही कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक वेगवेगळी विमा उत्पादने प्रस्तुत करते व ग्राहकांना इन्श्युर्ड व निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देते.
टर्टलमिंटचे सह-संस्थापक श्री. आनंद प्रभुदेसाई यांनी सांगितले, “मिलिंद सोमण यांना आरोग्य आणि फिटनेसमधील आदर्श मानणारे लाखो लोक आहेत आणि या क्षेत्रातील अनेक विविध उपक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. ग्रीन राईड २.० साठी मिलिंद सोमण यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, लोकांनी फिट राहावे, आपल्या रोजच्या आयुष्यात पर्यावरणस्नेही साधनांचा वापर करावा यासाठी त्यांना जागरूक करणे हा आमचा उद्देश आहे. आम्हाला आशा आहे की, हा उपक्रम लाखो लोकांपर्यंत पोहोचेल आणि आज आम्ही ज्या प्रेरणेने यामध्ये काम करत आहोत त्याच प्रेरणेने लाखो व्यक्ती यामध्ये सहभागी होतील.”
अभिनेते, सुपरमॉडेल श्री. मिलिंद सोमण यांनी सांगितले, “ग्रीन राईड २.० हा पर्यावरण सुरक्षा आणि संवर्धन असेच शुद्ध, हरित हवेचे महत्त्व यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी ग्रीन राईडला चांगले यश मिळाले, यंदाच्या वर्षी युवकांना त्यामध्ये सहभागी करवून घेऊन ग्रीन राईड २.० ला अजून जास्त यशस्वी करावे, अधिक जास्त सामाजिक प्रभाव निर्माण केला जावा हा आमचा उद्देश आहे. भविष्यकाळात देखील मी अशा अनेक उपक्रमांमधून या व अशा अनेक उद्दिष्टांना प्रोत्साहन व पाठिंबा देत राहीन. या उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी ऑनबोर्ड आलेल्या टर्टलमिंटसोबत सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे.”
About Turtlemint:
Founded in 2015 by Dhirendra Mahayavanshi and Anand Prabhudesai, Turtlemint has created a wide network of 250,000+ digital partners and empowered them with the right set of digital tools that enables them to provide insurance policies to their customers. Turtlemint has raised close to USD 190 million from marquee investors Jungle Ventures, Nexus Venture Partners, Amansa Capital, Sequoia Capital India, GGV Capital, Vitruvian Partners, Marshall Wace American Family Ventures, MassMutual Ventures , SIG , Blume Ventures, Dream Incubator and Trifecta Capital & adding.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi