जागतिक शहरी संवर्धन प्रयत्नांमध्ये FedEx ची २ दशलक्ष अमेरिकन डॉलर गुंतवणुक
जागतिक शहरी संवर्धन प्रयत्नांमध्ये FedEx ची २ दशलक्ष अमेरिकन डॉलर गुंतवणुक
जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक आणि FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी FedEx Express शाश्वत समाजासाठी २ दशलक्ष अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक करत आहे. FedEx मार्च ते मे २०२४ पर्यंत भारतासह जगभरातील ४० शहरी संवर्धन प्रकल्पांना पाठबळ देईल.
FedEx केअर्सच्या स्वयंसेवकांनी स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मुंबई आणि दिल्लीमध्ये जवळपास १०,००० रोपांची यशस्वीपणे लागवड केली आहे. ही नवीन झाडे हवेचे प्रदूषण कमी करण्यास, शहरी उष्णतेच्या बेटांचे आणि हवामानातील बदलांचे परिणाम कमी करण्यास आणि एकूणच समाजाचे आरोग्यस्वास्थ्य आणि निरोगीपणा वाढविण्यात मदत करतील. हे प्रयत्न FedEx च्या पर्यावरणीय कामकाजाप्रती असलेल्या व्यापक बांधिलकीचा भाग आहेत.
“पर्यावरण बांधिलकी दर्शविणाऱ्या केवळ प्रतिकात्मक कृतीपेक्षा आमचे उपक्रम भारतासाठीचे आमचे समर्पण प्रतिबिंबित करतात,” असे FedEx भारत आणि CE, MEISA ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष सुवेंदू चौधरी म्हणाले. “भारतासाठी हरित भविष्य घडवण्यासाठी FedEx सक्रियपणे सहभागी होत शहरी परिक्षेत्र वाढवून हे उपक्रम व्यापक पर्यावरणीय प्रयत्नांना देखील हातभार लावत आहेत.”
हा उपक्रम बॉर्न चॅलेंज अंतर्गत २०३० पर्यंत २६ दशलक्ष हेक्टर जंगल पुनर्संचयित करण्याच्या भारताच्या प्रतिज्ञा आणि राष्ट्रीय वन धोरणाशी सुसंगत असून त्याचे उद्दिष्ट देशाचा ३३% भाग जंगलांनी आच्छादित करण्याचे आहे. FedEx चे जागतिक प्रयत्न शाश्वत भविष्याच्या दिशेने भारताच्या प्रगतीसाठी कसे पोषक आहेत हे FedEx केअर्स स्वयंसेवकांच्या कार्यातून दिसून येते. अधिक जाणून घेण्यासाठी, fedexcares.com ला भेट द्या.
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3
शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT
18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi