यंदा गणेश चतुर्थीला दौंड व सांगलीतील मुलांनी किफायतशीर डिजिटल शिक्षणाचा आनंद घेतला I
यंदा गणेश चतुर्थीला दौंड व सांगलीतील मुलांनी किफायतशीर डिजिटल शिक्षणाचा आनंद घेतला
- सीएससी आणि शुगरबॉक्स नेटवर्क्सच्या भागीदारीने १५ गावांमधील मुलांना इंग्रजी संभाषण कोर्सेस उपलब्ध करवून दिले.
- टीम शुगरबॉक्सने प्रत्येक घराघरांत जाऊन शिक्षणाच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली.
पुणे, सांगली, ७ सप्टेंबर २०२२: बुद्धीची देवता गणपतीबाप्पाचा उत्सव असलेल्या गणेश चतुर्थीला अनुसरून शुगरबॉक्स नेटवर्क्सने पुण्यातील दौंड आणि सांगली जिल्ह्यात मिळून १५ गावांमधील मुलांना विश्वसनीय व किफायतशीर डिजिटल शिक्षणाची उपलब्धता खुली करवून दिली आहे. सीएससीच्या सहयोगाने शुगरबॉक्सने या सर्व गावांमधील सीएससी सेंटर्समध्ये आपले पेटंटेड टेक्नॉलॉजी सोल्युशन इन्स्टॉल केले आहे, ज्यामुळे जवळपासच्या मंडपांना डिजिटल कन्टेन्ट उपलब्ध होऊ शकत आहे.
यंदा गणेश चतुर्थीला शुगरबॉक्स नेटवर्क्सने शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण कन्टेन्ट पुरवणाऱ्यांसोबत सहयोग केला आहे. इंग्रजी संभाषण, के-१२ शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक शिक्षण किफायतशीर पद्धतीने देणाऱ्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी या कंपनीने सीएससी सेंटर्समधील सर्व्हर उपयोगात आणून मुलांसाठी शिक्षणविषयक कन्टेन्टचे हाय-स्पीड स्ट्रीमिंग व डाऊनलोडिंग उपलब्ध करवून दिले आहे. डाउनलोड केलेला कन्टेन्ट मुले आपापल्या घरी देखील आपल्या सुविधेनुसार पाहू शकतात. या तंत्रज्ञानयुक्त सुविधेमुळे ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक कन्टेन्टच्या अखंडित उपलब्धतेचा अनुभव मिळवू शकतील.
आधुनिक शिक्षण सुविधा तंत्रज्ञानावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. इंटरनेट उपलब्ध नसल्याने अधिक चांगले शिक्षण व विकासाच्या शक्यता मिळवून देणे किंवा मिळवणे शक्य होत नाही. महामारीमुळे ग्रामीण भारतातील मुलांना अजूनच मागे ढकलले आहे, गावांमध्ये पुरेशा प्रमाणात पायाभूत सोयीसुविधा नसल्याने महामारीच्या काळात मुलांचे शिक्षण नीट होऊ शकले नाही. तंत्रज्ञानाची कमतरता व गावातील प्रत्येक मुलामुलींपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचवण्यातील अडचणी लक्षात घेऊन शुगरबॉक्स नेटवर्क्सने या मुलांना डिजिटल जग खुले करवून देण्याचे ठरवले. प्रत्येक क्षेत्रातील मुलांना डिजिटल शिक्षण अत्यावश्यक असल्याचा संदेश यामधून दिला जात आहे. सर्वाधिक वेगाने वाढत असलेले ‘मेड इन इंडिया’ हायपरलोकल क्लाऊड तंत्रज्ञान, शुगरबॉक्स नेटवर्क्स आपल्या ग्राहकांना डिजिटल माहिती व सेवांची उपलब्धता खुली करवून देते. सध्या महाराष्ट्र, हरयाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील २५० पेक्षा जास्त ग्राम पंचायतींमध्ये या सेवा पुरवल्या जात आहेत.
शुगरबॉक्स नेटवर्क्सचे सीईओ आणि सह-संस्थापक श्री. रोहित परांजपे म्हणाले, “बुद्धी आणि समृद्धीचे वरदान देणाऱ्या गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या या उत्सवाने आम्हाला सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची संधी दिली, खासकरून आपली गावांमध्ये डिजिटल शिक्षण पोहोचवणे गरजेचे असल्याचे आम्ही या उपक्रमातून जाणवून देऊ शकलो आहोत. सीएससी आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स मिळून या गावांमध्ये मुलांना संवादात्मक शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करवून देत आहेत, आणि अधिक चांगले जीवन जगता यावे यासाठी मजबूत भविष्य निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करत आहेत. डिजिटल पद्धतीने जोडल्या गेलेल्या जगाच्या अमर्याद शक्यता दर्शवणे आणि डिजिटल सर्वप्रथम जगामध्ये यशस्वी होण्याचा पर्याय उपलब्ध करवून देऊन उद्याच्या पिढ्यांना सक्षम करणे ही आमची यामागची संकल्पना आहे.”
सोयीसुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये डिजिटली कनेक्टेड राहणे ही एक मूलभूत गरज म्हणून पूर्ण करण्यासाठी शुगरबॉक्स आपले हायपरलोकल एज क्लाऊड तंत्रज्ञान ग्राम पंचायत, सीएससी आणि सरकारी शाळा यासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी इन्स्टॉल करत आहे. नेटवर्क पार्टनर्स आणि डिजिटल ऍप्लिकेशन सेवांसाठी टिकाऊ, पर्यावरणपूरक व लाभदायक अशी इकोसिस्टिम देखील ते निर्माण करत आहेत. सीएससी आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स मिळून ओटीटी, डी२सी ई-कॉमर्स, डेटासाठी निःशुल्क फिनटेक (ग्राहकांसाठी) यासारख्या कन्टेन्ट व सेवा देऊन एका न्याय्य डिजिटल भविष्याची निर्मिती करत आहेत. एलअँडटी मेट्रो रेल हैदराबाद (एलटीएमआरएचएल), चेन्नई मेट्रो रेल्वे लिमिटेड (सीआरएमएल), सेंट्रल रेल्वेज (मुंबई उपनगरांमधील) मध्ये देखील शुगरबॉक्स आपल्या सेवा पुरवत आहे.
About SugarBox Networks
SugarBox Networks is the world’s first Hyperlocal Edge Cloud platform that enables Users, Networks (ISPs, Internet Infra providers, etc.) and Digital Services (Apps, Websites, etc.) alike, to harness the power of Local Area Networks, thus building a sustainable ecosystem. As a cloud technology and a hyperlocal discovery platform, SugarBox enables users to interact with the digital and physical world, based on the place contextual to where the user is. This patented technology enables native digital Apps to function seamlessly, even when the data connectivity is intermittent or unconnected. SugarBox, co-founded by Rohit Paranjpe, Devang Goradia and Ripunjay Bararia in 2016, is reimagining connectivity for the underserved and unserved, globally, to make access to digital information and services affordable and reliable. SugarBox has been awarded multiple patents in the US, as well as in India, and has additional patents pending grant in across 100+ countries worldwide. LinkedIn
In case of any queries, please connect with:
Team Adfactors – Renuka.nadkarni@adfactorspr.com / kushal.shah@adfactorspr.com
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi