विद्युत अग्निसुरक्षा आणि दर्जेदार तारांच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यासाठी आरआर काबेलतर्फे उद्योगक्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण I

विद्युत अग्निसुरक्षा आणि दर्जेदार तारांच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यासाठी आरआर काबेलतर्फे उद्योगक्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण

भारतातील आगीच्या अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट. खराब-गुणवत्तेच्या तारा आणि केबल्समुळे हे वारंवार होते. एएससीआय माहितीनुसार गेल्या दशकात एकूण मानवी मृत्यूंपैकी सुमारे ७३% मृत्यू विजेचा शॉक लागल्यामुळे झाले. त्यामध्ये सुमारे ११% विद्युत आग आणि सुमारे १६% विजेचा समावेश आहे. आगीच्या दुर्घटनेत आगीपेक्षा धुर कोंडल्यामुळे जास्त लोकांचा मृत्यू होतो हे फारसे माहीत नसलेले पण वास्तव आहे. या गंभीर जोखमींना तोंड देण्यासाठी एल्मेक्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि आयईईएमएचे पूर्वाध्यक्ष विपुल रे आणि केप इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक आणि एनएफई (नॅशनल फेडरेशन ऑफ इंजिनिअर्स फॉर इलेक्ट्रिकल सेफ्टी) चे सदस्य एस. गोपा कुमार यांसारख्या या उद्योगक्षेत्रातील तज्ञांच्या सोबत आर.आर.काबेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि आयईईएमए चे माजी अध्यक्ष श्री. श्रीगोपाल काबरा यांनी भारतातील उच्च-गुणवत्तेच्या वायर आणि केबल्सना प्राधान्य देण्याच्या अभावावर प्रकाश टाकला.

उद्योगक्षेत्रातील तज्ञांचा असा विश्वास आहे की विद्यमान आणि नवीन इमारतींमध्ये विद्युत अग्निसुरक्षेच्या महत्त्वाबद्दल लोकांना आणि अधिकाऱ्यांना शिक्षित करणे महत्वाचे आहे. संस्थांनी आपल्या इमारती अग्नि-सुरक्षित आहेत की नाही हे त्वरित तपासले पाहिजे. वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर अग्नि-सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणार्‍या मोकळ्या जागा कशा तयार केल्या जातात त्यामध्ये पद्धतशीर बदल लागू करणे आवश्यक आहे. निवासी समुदायांसाठी, विशेषत: ज्यांना आग लागण्याचा धोका जास्त असतो अशा उंच इमारतीमध्ये नियमित फायर ऑडिट आणि ड्रिल महत्त्वपूर्ण आहेत.

ही बाब लक्षात घेऊन विकसकांकडून बनावट तारा आणि केबल्स किंवा निकृष्ट दर्जाच्या तारांचा  वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा आणण्याच्या महत्त्वावर तज्ञांनी भर दिला. बनावट उत्पादने ही भारतातील वाढती चिंतेची बाब आहे, ज्यामुळे देशाचे मोठे नुकसान होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बनावट वायर खराब-गुणवत्तेच्या सामग्रीपासून बनवल्या जातात त्यामुळे ग्राहकांचे जीवन धोक्यात येते. ही एक चिंताजनक समस्या आहे. वायर आणि केबल उत्पादक हे देशातील सुरक्षितता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. उदाहरणार्थ, आर.आर. काबेलने LS0H (लो स्मोक, झिरो हॅलोजन) वायर्स भारतात आणल्या. या वायर्स कोणत्याही प्रकारच्या अपघाताच्या वेळी गॅस, अॅसिड आणि धूर यांचे विषारी मिश्रण तयार करत नाहीत. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी निरोगी आणि सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करणारी 450001 ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम असलेली ही भारतातील एकमेव कंपनी आहे.

समस्यांना वाचा फोडताना आरआर काबेलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीगोपाल काबरा म्हणाले, “देशाच्या पायाभूत सुविधेतील बहुतांश भाग विद्युत आगीच्या अनेक धोक्यांना बळी पडतात कारण इमारतींच्या बांधकामाबाबत योग्य नियमावली आणि समज यांचा अभाव असतो. या आगीच्या प्रादुर्भावामुळे जीवाला धोका निर्माण होतो. मालमत्तेचे नुकसान, अनमोल कागदपत्रे, दागदागिने, इत्यादींवर मोठा परिणाम घडून येतो. ग्राहकांनी एक कठोर वास्तव माहित करून घेतले पाहिजे: विद्युत अपघात आणि आगीच्या अपघातांमुळे होणारा धूर हा प्रत्यक्ष आगीपेक्षा जास्त धोकादायक असतो आणि त्याचे परिणाम बहुतेकवेळेला प्राणघातक असतात. आम्ही आरआर काबेल येथे विद्युत अग्निसुरक्षा आणि विद्युत अग्निसुरक्षा, प्रीमियम-गुणवत्तेच्या तारा वापरण्याचे महत्त्व याविषयी देशात जागरूकता निर्माण करण्यात आघाडीवर आहोत. नागरिकांनी विद्युत अग्निसुरक्षा समजून घेऊन एक सुरक्षित देश निर्माण करण्यासाठी आणि गुणवत्तेच्या मुद्द्यांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आमच्यासोबत शपथ घ्यावी अशी आमची इच्छा आहे.

याबाबत अधिक माहिती देताना केप इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक आणि एनएफई सदस्य एस. गोपा कुमार म्हणाले, “नागरिकांना त्यांच्या परिसरात आणि घरात दर्जेदार वायर आणि केबल्सचे महत्त्व याबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी कठोर नियम लागू करण्याची गरज आहे. एक मजबूत विद्युत अग्नि-सुरक्षित परिसंस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे आणि हे केवळ त्याचे महत्त्व जाणून घेतल्यावरच घडेल. या उपक्रमाद्वारे बनावट उत्पादनांवर विशेषत: वायर्स आणि केबल्सवर बहिष्कार टाकण्याच्या चळवळीत सामील होण्यासाठी आम्ही ग्राहक आणि आमच्या सर्व भागधारकांमध्ये हा बदल घडवून आणू. ग्राहकांची सुरक्षा केंद्रस्थानी आहे याची खात्री करण्याचे आवाहन आम्ही लोकांना करतो. एकत्रित प्रयत्नांनी आम्ही अग्निसुरक्षित राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवू शकतो.”

एल्मेक्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि आयईईएमएचे पूर्वाध्यक्ष विपुल रे म्हणाले, “या परिस्थितीबाबत धोक्याची घंटा वाजवायचा उद्देश असलेल्या आणि जागतिक प्रश्न म्हणून प्राधान्य देण्याची गरज असलेली बाब म्हणून संबोधित करणाऱ्या या चळवळीत सामील होताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या देशाच्या विकासाचा आराखडा गुणवत्ता ठरवते आणि बनावटगिरी संपवणे ही वेगाने प्रगती करणार्‍या अर्थव्यवस्थेची पहिली पायरी आहे. विद्युत अग्निसुरक्षा ही कोणत्याही संरचनेत महत्त्वाची भूमिका बजावते, मग ती शैक्षणिक सुविधा असो, रुग्णालय असो किंवा सार्वजनिक जागा असो. एनसीआरबीच्या अलीकडील अहवालात असे नमूद केले आहे की सरासरी ३५ लोक गेल्या पाच वर्षांत आगीच्या दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडली. उत्पादनाच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाते तेव्हा हे घडते. समस्येची सोडवणूक करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याच्या कृतीचे  स्वागत करणाऱ्या अधिक चांगल्या अंमलबजावणीसह धोरणकर्त्यांनी कठोर कायदे करण्याची वेळ आली आहे. नागरिकांमध्ये विद्युत अग्निसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिक जागरूकता निर्माण करण्याचे आमचे संयुक्त उद्दिष्ट आहे.”

RR Kabel
RR Kabel

About RR Kabel:

RR Kabel offersthe widest range of premium wires and cables for various residential, commercial, industrial, and infrastructure purposes. RR Kabel is part of RR Global, a USD 1.25 billion conglomerate in the electrical sector with a presence in over 90 countries globally. Spread across multiple business verticals, including wires and cables, the company continues to endeavor to create the best quality products using the latest advances in wire design and engineering. The products are also compliant with the REACH (Registration, Evaluation, and Authorization of Chemical Substances) and RoHS (Restriction of Hazardous Substances) directives. The company has also conducted extensive research and development to ensure its products adhere to global guidelines and standards.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *