जी ई डी सीच्या अध्यक्षपदी डॉ सुषमा कुलकर्णी यांच्या नावाची अधिकृत घोषणा I
जीईडीसीच्या अध्यक्षपदी डॉ सुषमा कुलकर्णी यांच्या नावाची अधिकृत घोषणा
केपटाउन मधील वार्षिक परिषदेमध्ये शुभेच्छांचा वर्षाव
राजारामबापू इस्न्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि राजारामनगर या महाविद्यालयाच्या डायरेक्टर डॉ.सौ.सुषमा कुलकर्णी या नुकत्याच अत्यंत प्रतिष्ठेच्या ग्लोबल इंजिनिअरिंग डीन्स कौन्सिलच्या च्या चेअरमनपदी निवडून आल्या आहेत. या निवडीनंतर दक्षिण आफ्रिकेमधील केप टाउन या शहरात झालेल्या जीईडीसीच्या वार्षिक परिषदेमध्ये सध्याचे अध्यक्ष सुनील महाराज आणि इंटरनॅशनल फेडरेशन व इंजिनीरिंग एजुकेशन सोसायटीज चे स्टेफनी फेटल यांनी एक्सिक्युटीव्ह कमिटीच्या मीटिंग मध्ये डॉ.सौ.सुषमा कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी डॉ.सौ.सुषमा कुलकर्णी यांनी जीईडीसीच्या सर्व प्रतिनिधींचे त्यांनी दाखवलेल्या विश्वासा बद्दल आभार मानले तसेच जागतिक स्तरावरती अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात जीईडीसीच्या माध्यमातून काम करत असताना आतापर्यंत झालेले हे काम पुढील टप्प्यापर्यंत नेण्यास प्रयन्तशील राहीन असे त्या म्हणाल्या .
आपल्या अध्यक्षपदाच्या येणाऱ्या कालावधीत अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला बदलणाऱ्या काळाबरोबर बदल आत्मसात करता यावेत यासाठी उद्योग आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था यांच्यात समन्वय आणि सहकार्य निर्माण करणे, संयुक्त संशोधन प्रकल्प सुरु करण्यास प्रोत्साहन देणे, जागतिक स्तरावरील वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना लहान कालावधीच्या इंटर्नशिप सुरु करणे, अनेक विद्यपीठांच्या सहयोगातून संशोधन प्रकल्प सुरु करणे , शिक्षकाच्या नेटवर्किंग मधून संयुक्तिक परिषद आणि चर्चासत्रे आयोजित करणे, सर्वोत्कृष्ट पद्धतींचे आदान प्रदान करणे, उद्योगांच्या मागणीप्रमाणे अभियंत्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करणे या सर्व महत्वाच्या विषयांसाठी प्रयन्तशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने आयोजित महिला सशक्तीकरण या विषयावरील तज्ञ चर्चासत्रात सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या यशाचा प्रवास आणि त्यांना आलेली आव्हाने याबद्दलचे त्यांचे अनुभव कथन केले. तसेच दुसऱ्या दिवशी महिला नेतृत्व या कार्यशाळेत त्यांनी सहभागी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ तीन वर्षाचा असून ऑक्टोबर २०२३ मध्ये सौ कुलकर्णी यांच्याकडे हा पदभार सुपूर्द केला जाणार आहे. याप्रसंगी डॉ रेनेत्त गररिसॉन, लॉरेटो वॅलेंझुएला, जुलियन पल्लान्ग्यो, घडा मोहम्मद आमेर, मारिया लौरा आणि ४४ देशातील प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे