गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड ने राकेश स्वामी यांची समूह अध्यक्ष आणि कॉर्पोरेट अफेअर चे प्रमुख म्हणून नियुक्ती केली I
गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड ने राकेश स्वामी यांची समूह अध्यक्ष आणि कॉर्पोरेट अफेअर चे प्रमुख म्हणून नियुक्ती केली
मुंबई, ९ डिसेंबर २०२२: गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड ने श्री. राकेश स्वामी यांना १ डिसेंबर २०२२ पासून समूह अध्यक्ष आणि कॉर्पोरेट अफेअर चे प्रमुख म्हणून नियुक्त केले. राकेश स्वामी यांना कॉर्पोरेट व्यवहार, सार्वजनिक धोरण, सरकारी आणि नियामक व्यवहार, व्यावसायिक वकिली, धोरणात्मक नियोजन, संघर्ष व्यवस्थापन, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, सार्वजनिक खासगी भागीदारी आणि सामान्य प्रशासकीय कामे यांमधील २२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
गोदरेज समूह मध्ये सामील होण्यापूर्वी ते हनीवेलमध्ये सरकारी संबंध या कामांचे ते नेतृत्व करीत होते आणि ते इंडिया लीडरशिप टीम चे मुख्य सदस्य ही होते. त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात रिलायन्स इंडस्ट्रीज ने केली आणि त्याशिवाय एस्सार, टाटा मोटर्स, जॉन डीर आणि जनरल इलेक्ट्रिक मध्ये ही काम केले आहे.
गोदरेज मध्ये श्री राकेश स्वामी हे कॉर्पोरेट घडामोडींचे संचालन करतील आणि गोदरेज समूहाच्या सार्वजनिक धोरण व सरकारी संबंध याचे नेतृत्व करण्यासाठी ते जबाबदार असतील. ते सर्व संबंधित भागधारकांबरोबर सक्रिय व्यवसाय केंद्रित अडव्हकसी करण्यास मदत करतील.
त्यांच्या या नियुक्ती बाबत बोलताना ते म्हणाले, “गोदरेज समूहाला एक समृद्ध वारसा आहे आणि अत्यंत मजबूत मूल्य प्रणाली असणाऱ्या समूहासाठी काम करणे हे खरोखरच फार आनंददायी व सन्मानाचे आहे. १२५ वर्षांपासून देशाची सेवा करीत असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह्य समूहामध्ये सामील होणे हे मी माझे अहोभाग्यच समजतो.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे