तंत्रज्ञानाने विस्तारला शिकण्याचा अनुभव आणि शिक्षकांना केले सक्षम!

तंत्रज्ञानाने विस्तारला शिकण्याचा अनुभव आणि शिक्षकांना केले सक्षम!

नवनीत टॉपटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हर्षिल गाला

गेल्या दोन वर्षांत, लिव्हिंग रूम आणि किचनचे वर्गखोल्यांमध्ये रूपांतर झाल्यामुळे जगभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यानी वेगाने दूरस्थ शिक्षणाशी जुळवून घेतले. weforum.org च्या मते,  शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अवलंब आधीच वाढलेला असून २०१९ मध्ये जागतिक एडटेक गुंतवणूक १८.६६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे आणि ऑनलाइन शिक्षणाची एकूण बाजारपेठ २०२५  पर्यंत ३५० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राशी जवळून काम करण्याच्या आमच्या अनुभवात, वर्गात तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण आणि लाभ घेताना आम्ही मोठ्या प्रमाणात साशंकता वाटत असल्याचे निरीक्षण केले आहे. नवीन तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि नावीन्यपूर्णता यांच्याकडे सर्वसाधारणपणे एकतर नियामक आणि शिक्षकांद्वारे वरदान म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थेतील प्रत्येक समस्येचे निराकरण होईल आणि उच्च कुशल व्यावसायिकांची नवीन पिढी तयार होईल असे वाटते. किंवा त्यांच्याकडे धोका निर्माण करणारा म्हणून पाहिले जाते. नोकऱ्या आणि शिक्षकांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणारे म्हणून पाहिले जाते आणि त्यामुळे अविश्वास दाखवून तंत्रज्ञान नाकारले जाते. तथापि, प्रत्यक्षात, तंत्रज्ञानाचा व्यावसायिक आणि खुल्या मनाने वापर केल्यास ते शिक्षकांसाठी सहयोगी तसेच बदलासाठीचे साधन ठरू शकते.

आपल्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक आणि प्रभावी शिक्षण अनुभव तयार करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शिक्षणामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानाची पुरेशी समज आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सहभाग वाढवण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा हे शिक्षकांच्या तयारी कार्यक्रमांसाठी अधिक महत्त्वाचे बनले आहे. विद्यार्थी सहभाग आणि शिक्षण सुधारण्यासाठी शिक्षकांना प्रभावीपणे पाठबळ देण्यासाठी शिक्षकांसाठीचे शैक्षणिक कार्यक्रम या क्षमतांच्या विकासाकडे लक्ष देऊ शकतात. शिक्षक मार्गदर्शक बनू शकतात. ते विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अनुभव तयार करू शकतात जे त्यांना विविध प्रकारच्या तंत्रज्ञानासह सखोल शिक्षणासाठी समृद्ध आणि सक्षम करतील आणि विद्यार्थ्याना या शैक्षणिक साधनांमध्ये व्यस्त राहण्यास मदत करतील.

वर्गात डिजिटल शिक्षण साधनांचा प्रभावी वापर विद्यार्थ्यांचा सहभाग सुधारू शकतो, शिक्षकांना धड्याच्या योजनांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आणि सानुकूलित सूचनांचा प्रचार करू शकतो. उत्पादकतेच्या नवीन स्तरांवर पोहोचण्यासाठी शिक्षक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकतात, विद्यार्थ्यांना शिकण्याच्या संधी वाढवण्यासाठी उपयुक्त डिजिटल साधने उपयोजित करू शकतात आणि विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रतिबद्धता सुधारू शकतात. तंत्रज्ञान शिक्षकांना मिश्र शैक्षणिक वातावरण स्थापित करण्यात मदत करू शकते. तसेच वर्गात शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी नवीन मॉडेल आणत रचनात्मक आणि सारांशात्मक मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञान डिजिटल साधनांचा वापर करते. विद्यार्थी जेव्हा डिजिटल साधानांमध्ये व्यस्त असतात तेव्हा इन्सट्रक्शनल डिझायनर कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल आणि सहभागाबद्दल माहिती गोळा करतात हे तंत्रज्ञान सुलभ करू शकते. त्यामुळे एरवी दूर शिक्षण वातावरणात मिळणे कठीण असलेली मौल्यवान माहिती मिळते.

तंत्रज्ञान सानुकूलनासह, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी शिकण्याचा अनुभव सुधारू शकते. तंत्रज्ञानाचा अवलंब करून शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिकृत सूचना तयार करू शकणार्‍या साधनांमध्येच केवळ प्रवेश मिळवत नाहीत तर ते वेळापत्रक तयार करणे, त्यांच्या सहकाऱ्यांसह  सूचना शेअर करणे आणि भार हलका करण्यावर लक्ष केंद्रित करण्याकरता स्वतःसाठी मोकळा वेळ देखील मिळवू शकतात. योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शिक्षकांना त्यांचा ३०% वेळ परत मिळू शकतो. त्याचा ते वैयक्तिकृत सूचनांसाठी वापर करू शकतात. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होते.

तंत्रज्ञान सर्व स्तरांवर शिक्षकांना सक्षम बनवत आहे. त्यांना धडे तयार करण्यास सक्षम करत आहे. ते केवळ लहान वर्गांपर्यंतच नाही तर जगभरात पसरलेल्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. जसे तुम्ही बघू शकता की जर आपण उत्कट कार्यशक्ती निर्माण करणार असू तर वर्गात विद्यार्थ्यांच्या संधींचा विस्तार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. वर्गातील तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांकडून शिकणे पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याबद्दल एक आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे.

प्रभावी शिक्षकांची निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर हे प्रमुख तत्त्वांपैकी एक आहे. विशेषतः सखोल शिक्षण तेव्हा घडते जेव्हा जिल्हे, शाळा आणि वर्गप्रमुख विद्यार्थी-शिक्षक अध्ययन सखोल करण्यासाठी आणि प्रभावी क्लासरूम सेटिंग्जमध्ये सहभागांसाठी एक साधन म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करण्याला आणि गुंतवणूक करायला प्राधान्य देतात. केवळ तंत्रज्ञान वापरण्यासाठी विद्यार्थ्यांची क्षमता निर्माण करत नाहीत. तंत्रज्ञानाकडे ध्येयाऐवजी ध्येय साध्य करण्याचे साधन म्हणून पाहिले पाहिजे. चांगल्या प्रकारे वापरल्यास ते नवकल्पना वाढविण्यात मदत करू शकते आणि शिक्षकांच्या निवडलेल्या अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोन आणि अभ्यासक्रमाला प्रचंड मूल्य प्रदान करू शकणारे साधन म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो.

Mr. Harshil Gala
Mr. Harshil Gala

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *