महिंद्रा लॉजिस्टिक्स रिव्हिगोच्या बीटुबी एक्सप्रेस व्यवसायाचे संपादन करणार I

मुंबई सप्टेंबर २०२२ – महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) आणि रिव्हिगो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरएसपीएल) यांनी एमएलएलतर्फे आरएसपीएलच्या बीटुबी एक्सप्रेस व्यवसायाची खरेदी करण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार एमएलएल बिझनेस ट्रान्सफर अग्रीमेंट अंतर्गत (बीटीए) व्यवसाय संपादन करणार असून त्यात कंपनीचे ग्राहक, टीम्स, आरएसपीएलच्या बीटुबी एक्सप्रेस बिझनेसची असेट्स, आरएसपीएलचे तंत्रज्ञान आणि रिव्हिगो ब्रँड यांचा समावेश असेल. ट्रक फ्लीटची मालकी आणि फुल ट्रक लोड (एफटीएल) कामकाजाचे हक्क आरएसपीएलकडेच राहातील.

एमएलएल ही भारतातील आघाडीची सर्वसमावेशक लॉजिस्टिक कंपनी असून ती ग्राहकांना पुरवठा साखळी सेवा, थ्रीपीएल सुविधा, एफटीएल वाहतूक, वेयरहाउसिंग, क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक्स, लास्ट माइल आणि बीटुबी एक्सप्रेस लॉजिस्टिक्स सेवा देते. या संपादनामुळे एमएलएलच्या सद्य बीटुबी एक्सप्रेस व्यवसायाला रिव्हिगोचे दमदार नेटवर्क, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया क्षमतांची जोड लाभेल.

गुरगावस्थित रिव्हिगो पॅन भारतात बीटुबी एक्सप्रेस नेटवर्क चालवते. कंपनीकडे मजबूत ग्राहकवर्ग आणि संपूर्ण सेवा तंत्रज्ञान आहे. रिव्हिगोच्या बीटुबी एक्सप्रेस नेटवर्कमध्ये सध्या देशातील १९,००० पिनकोड्सचा समावेश आहे. त्यांची २५० पेक्षा जास्त प्रक्रिया केंद्रे व शाखा असून १.५ दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त जागेसह एमएलएलच्या एक्सप्रेस व्यवसाय क्षमतेला लक्षणीय बळ मिळेल.

याप्रसंगी महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘बीटुबी एक्सप्रेस लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठा वाव दिसून येत आहे, कारण ग्राहक सखोल डिलीव्हरी नेटवर्क, डिजिटल तंत्राचा अवलंब आणि जलद पुरवठा साखळीतील गुंतवणुकीवर भर देतात. या संपादनामुळे आमच्या सेवा तसेच बीटुबी एक्सप्रेस व पीटीएल क्षेत्रातील आमची व्याप्ती मजबूत होईल. रिव्हिगोने चांगल्या क्षमतांची उभारणी केली असून व्यवसायांच्या एकत्रीकरणातून ही क्षमता आणखी बळकट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. एक टीम या नात्याने या घडामोडीविषयी आम्ही उत्सुक आहोत, कारण सर्वांचे तत्व आणि चालक तसेच समाजाला सक्षम करण्याचे ध्येय समान आहे.’

याप्रसंगी आरएसपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक गर्ग म्हणाले, ‘रिव्हिगोने फुल ट्रक लोड व्यवसायात पायाभरणी केली आहे आणि इतक्या वर्षांत आम्ही पॅन भारतात पीटीएल/एक्सप्रेस सेवा, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि सेवांचे जाळे तयार केले आहे. आम्हाला विश्वास आहे, की आमच्या पीटीएल व्यवसायाचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना एमएलएलसारख्या दर्जेदार, समग्र पुरवठा साखळीचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.’

Rivigo - Rivigo added a new photo.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *