एल अँड टी ने त्याच्या हायड्रोकार्बन व्यवसायासाठी दोन महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळविल्या I

एल अँड टी ने त्याच्या हायड्रोकार्बन व्यवसायासाठी दोन महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळविल्या

मुंबई, नोव्हेंबर 28 2022: एल अँड टी च्या हायड्रोकार्बन व्यवसायाने (एल अँड टी एनर्जी हायड्रो कार्बन – एल.टी.इ.एच.) दोन महत्वपूर्ण देशांतर्गत (ऑफशोअर) ऑर्डर्स मिळविल्या आहेत.

            ब्रिटिश गॅस एक्स्पलोरेशन अँड प्रॉडक्शन इंडिया लिमिटेड (बी जी इ पी एल, शेल पी एल सी ग्रुप ऑफ कंपनी चा एक भाग) च्या देशातल्या सुविधा रद्द करण्याचे भारतातील पहिले  कंत्राट  एल अँड टी च्या हायड्रोकार्बन व्यवसायाला मिळाले आहे. या कंत्राटानुसार, पाच ऑफ शोअर वेलहेड प्लॅटफॉर्म आणि या शिवाय बी जी इ पी एल, ओ एन जी सी आणि आर आय एल च्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ताप्तीयेथील सुविधा चे अभियांत्रिकी, तयारी करणे, काढणे आणि वाहतूक व्यवस्था या कामांचा समावेश असेल.

            या व्यवसायाने पाइप लाइन बदलण्याचा प्रकल्प-VI (पी.आर.पी. VI) च्या उरलेल्या कामांसाठी ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ओ.एन.जी.सी) कडून देखील ऑर्डर मिळविली आहे. ओ एन जी सी च्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑफ शोअर क्षेत्रामध्ये अंदाजे 42 किलोमीटर च्या सब सी पाइप लाइन टाकणे आणि संपूर्ण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील ओ.एन.जी.सी च्या ऑफ शोअर क्षेत्रांशी संबंधित कामांचा समावेश आहे.

            या ऑर्डरस् संपूर्ण हायड्रो कार्बन वॅल्यू चेन मध्ये पसरलेल्या एल अँड टी च्या उत्कृष्ट  अंमलबजावणीची साक्ष देतात आणि वन स्टॉप सोल्यूशन प्रदाता म्हणून त्याचे अग्रक्रम  अधिक मजबूत करतात.

            ‘एल टी इ एच’ऑफ शोअर आणि ऑनशोअर  कन्स्ट्रकशन सेवा, मोडयूलर फॅब्रिकेशन आणि एडवांस्ड वॅल्यू इंजीनीरिंग अँड टेक्नॉलॉजी वर्टीकल (अॅडीव्हीइएनटी )अंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना संपूर्ण हायड्रो कार्बन क्षेत्रामध्ये एकत्रितपणे डिझाईन टु  बिल्ड सोल्यूशन्स प्रदान करते. तीन दशकांहून अधिक समृद्ध अनुभवासह कंपनी प्रकल्प व्यवस्थापन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, गुणवत्ता, एच एस इ आणि ऑपरेशनल उत्कृष्टता या सर्व पैलूंमध्ये जागतिक बेंचमार्क प्रस्थापित करीत आहे.

Larsen & Toubro
Larsen & Toubro

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *