किवळे मामुर्डी रस्ता – आयटी, बँकिंग, वित्त क्षेत्र तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करणाऱ्या पुण्यातील नोकरदारांचे पसंतीचे स्थान I
निवासी मालमत्ता बाजारपेठ लक्षणीय प्रमाणात विस्तारत असून महामारीनंतर या बाजारपेठेत मासिक वाढ पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहाण्यासाठी मुख्य शहरापासून दूर असलेल्या निवासी स्थावर मालमत्तेत मोठी वाढ होत आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्ली अशा शहरांतील गृह नोंदणी आणि विक्रीत चांगली वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मालमत्ता विक्री नोंदणी वार्षिक पातळीवर २० टक्के वाढ झाली आहे, तर राज्य उत्पन्नात ४७ टक्के वाढ झाली आहे. त्याशिवाय पुण्यासारख्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात तेजी आणणाऱ्या शहराने या प्रदेशातील सर्वसामान्य निवासी मालमत्ता वाढीस मागे टाकले आहे. परिणामी पुण्यातील किवळे, पुनवळे, उंड्री, तळेगाव, चाकण आणि रावेत अशा छोट्या बाजारपेठा उदयास येत असून खरेदीदारांची त्यांना पसंती मिळत आहे.
पुनवळे, तळेगाव, चाकण अशा ठिकाणच्या निवासी बाजारपेठांमध्ये किवळे मामुर्डी रस्ता निवासी जागांसाठी लोकप्रिय होत असून हा परिसर घर खरेदीदारांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करणारा आहे. खास बनवण्यात आलेल्या १, २ आणि ३ बीएचके अपार्टमेंटपासून स्मार्ट सोसायटी सुविधांपर्यंत किवळे मार्मुडी रस्त्यावरील प्रकल्पांनी वैविध्यपूर्ण घर खरेदीदारांना आकर्षित केले आहे. आयटी कर्मचारी, इंजिनियर्स आणि एनआरआय किवळे येथील अपार्टमेंट्स तसेच प्लॉटेड प्रकल्पांना पसंती देत आहेत. विनाअडथळा कनेक्टिव्हिटी, सामाजिक पायाभूत सुविधा, योग्य जागा आणि किफायतशीर किंमती यांमुळे किवळे पुण्यातील घर खरेदीदारांसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे.
सुलभ कनेक्टिव्हिटीमुळे बाजारपेठेचा विकास
पुण्याच्या प्रवेशद्वारावर वसलेले किवळे तिथपासून पाच मिनिटे अंतरावर असलेल्या आगामी रिंग रोडमुळे बेंगळुरू, नाशिक, मुंबई, सोलापूर आणि अहमदनगरचे जंक्शन झाले आहे. पुणे- बेंगळुरू हायवे हा रिअल्टर्स व घर खरेदीदारांमधील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. रावेत, हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, वाकड यांनी वेढलेला किवळे मामुर्डी रस्ता पुण्याच्या बाणेर, हिंजवडी आणि वाकड येथील मुख्य आयटी हब्जमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरले आहे. किवळे मुकाई चौकाशीही चांगल्या प्रकारे जोडलेले असून किवळे बस टर्मिनस म्हणून ते ओळखले जाते. यामुळे इतर पुण्याशी जोडणे सोपे झाले आहे. जवळच्या भागांत प्रसिद्ध शाळा व महाविद्यालये असून त्यात डीवाय पाटील, जेएसपीएम, इंदिरा कॉलेज आणि सिम्बायसिस यांचा समावेश आहे. लहान मुलांना रोजचा प्रवास करण्यासाठी हे ठिकाण सुयोग्य आहे. त्याचप्रमाणे हा परिसर पुण्याच्या बाहेर असून पीसीएमसीअंतर्गत येतो. या परिसरात मुख्य शहराच्या तुलनेत कमी ट्रॅफिक असते व त्यामुळे रोजचा प्रवास सोपा होतो. हे ठिकाण पूर्वीचा एनएच4 हायवे, कात्रज- देहू रस्ता आणि मुंबई- पुणे एक्सप्रेसवे यांच्या जंक्शनवर वसलेला आहे. यामुळे किवळेतून देशातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी अगदी सहजपणे पोहोचता येते. चिंचवड रेल्वे स्टेशन औंध रावेत बीआरटीएस रस्ता आणि वाल्हेकरवाडी रस्त्यापासून ९ किलोमीटर दूर आहे. इथून एनएच48 द्वारे २९ किलोमीटर दूर असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचता येते.
वैविध्यपूर्ण प्रकारच्या निवासी घरांसह किवळे मार्मुडी रस्ता येथील निवासी प्रकल्प घर खरेदीदारांच्या इच्छा पूर्ण करण्याच्यादृष्टीने तयार करण्यात आले आहेत. त्याहीपेक्षा या ठिकाणी भरपूर निसर्गसौंदर्य आणि लोणावळ्यासारखी सहलीची ठिकाणे केवळ ३० ते ४५ मिनिटे अंतरावर आहेत. यामुळे येथील सामाजिक सुविधा विकसित झालेल्या असून आवश्यक वस्तू, किराणाची दुकाने केवळ ३००- ४०० मी अंतरावर आहेत. त्याखेरीज निवासी जिल्हा म्हणून किवळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहे. या भागात बँकिंग आणि आयटी क्षेत्राचा उदय होत आहे. नवे मॉल, सामाजिक पायाभूत सुविधांमुळे हा परिसर कुटुंबांसाठी राहाण्यायोग्य, तर ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी आवडीचे फिरायचे ठिकाण झाला आहे.
महाराष्ट्रातील निवासी स्थावर मालमत्तेची बाजारपेठ महानगरे व मुंबईव पुण्याच्या पहिल्या श्रेणीतील शहरांबाहेर विस्तारत असताना किवळेसारख्या लघु बाजारपेठा डेव्हलपर्स तसेच खरेदीदारांमध्ये लोकप्रिय होत आहेत. यामुळे अतिरिक्त रोजगार संधी तसेच निवासी सुविधा तयार होऊन या परिसराच्या एकंदर विकासाला हातभार लागला आहे आणि विशेष म्हणजे, त्याचा घर खरेदीदाराच्या खिशावर ताण येत नाहीये.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi