१५ रुपयांमध्ये शॅम्पू हेअर कलर बाजारपेठेत घडवणार नवी क्रांती I

१५ रुपयांमध्ये शॅम्पू हेअर कलर बाजारपेठेत घडवणार नवी क्रांती

पहिला सर्वात जास्त किफायतशीर शॅम्पू हेअर कलर

जीसीपीएलचा नवा शॅम्पू हेअर कलर ब्रँड ‘गोदरेज सेल्फी’ किंमत फक्त १५ रुपये, शॅम्पू हेअर कलर्सच्या ६८० कोटी रुपयांच्या बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्याचे उद्दिष्ट

गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) या भारतातील एका सर्वात मोठ्या हेअर कलर कंपनीने १५ रुपयांना नवा शॅम्पू हेअर कलर ब्रँड सादर करून भारतात हेअर कलर बाजारपेठ आता सर्व स्तरातील ग्राहकांसाठी खुली करून दिली आहे. जीसीपीएलने ‘गोदरेज सेल्फी’ हा अवघ्या पाच मिनिटात केस रंगवू शकणारा शॅम्पू हेअर कलर ब्रँड आणला आहे. केस रंगवणे आता अधिकच सोयीस्कर आणि प्रत्येकासाठी सहजशक्य बनले आहे.

भारतात शॅम्पू हेअर कलर बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल तब्बल ६८० कोटी रुपयांची आहे. या प्रकाराला संपूर्ण देशभरात खूप पटकन भरपूर प्रसिद्धी मिळाली. याखेरीज हेअर कलर पावडर आणि मेहेंदी यासारखे उत्पादन प्रकार वापरणाऱ्या ग्राहकांचा समावेश असलेल्या बाजारपेठेची आर्थिक उलाढाल १५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हेअर कलर उत्पादनांमध्ये निपुण म्हणून ख्यातनाम असलेल्या जीसीपीएलने गोदरेज सेल्फी हा नवीन शॅम्पू हेअर कलर अवघ्या १५ रुपये किमतीला सादर करून या बाजारपेठेत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.

गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) कॅटेगरी हेड – हेअर केयर श्री. नीरज सेनगुट्टूवन यांनी सांगितले, “शॅम्पू हेअर कलर हा खऱ्या अर्थाने स्वतः करता येण्याजोगा हेअर कलर प्रकार आहे जो आपण अगदी सहजपणे स्वतःचा स्वतः करू शकतो. आणि म्हणूनच आम्ही आमच्या नवीन शॅम्पू हेअर कलर ब्रँडचे नाव गोदरेज सेल्फी असे ठेवले आहे. भारतात सर्व स्तरातील ग्राहकांना हेअर कलर बाजारपेठेचा लाभ घेता आला पाहिजे हा आमचा उद्देश आहे, त्यासाठीच आम्ही पुरुष व महिला दोघांसाठी, छोट्या व मोठ्या केसांसाठी हेअर पॅक पर्याय फक्त १५ रुपयांपासून पुढील किमतींना उपलब्ध करवून दिले आहेत.”

श्री नीरज यांनी पुढे सांगितले, “प्रत्येक गोष्टीसाठी सहजसोप्या व किफायतशीर उत्पादनांच्या, सेवासुविधांच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी जीसीपीएलने ‘गोदरेज सेल्फी’ हा सर्वात परवडण्याजोगा शॅम्पू हेअर कलर सादर करून हेअर कलर कॅटेगरीत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.”

सुधारित फॉर्म्युलेशनमुळे गोदरेज सेल्फी नक्की यशस्वी ठरेल. याचा नो-अमोनिया फॉर्म्युला केसांचे नुकसान होण्यापासून बचाव करतो. यामध्ये कोरफडीचे गुण असल्यामुळे केस मऊशार राहतात. पुरुष व स्त्रिया दोघांनाही वापरता येईल असे हे उत्पादन दोन पॅक साइझेसमध्ये उपलब्ध असून छोटे केस असणाऱ्यांसाठी खास १५ रुपये किमतीचा पॅक आहे तर स्टॅंडर्ड मोठ्या साईझचा पॅक मोठे केस असणाऱ्यांसाठी आहे.

गोदरेज सेल्फी शॅम्पू हेअर कलरसोबत सर्वात सोप्या पद्धतीने, अजिबात गोंधळ, त्रास न होता रंगवले जाऊ शकतात. याचा वापर करण्यासाठी सॅशे खोलून, त्यातील शॅम्पू हेअर कलर सुक्या केसांवर लावा. सर्व केसांवर नीट मसाज करा व पाच मिनिटांनंतर धुवून टाका. सलोनमध्ये जाऊ शकत नसलेल्या किंवा केस रंगवण्याची पारंपरिक उत्पादने वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा खूप सोयीस्कर पर्याय आहे.

Godrej Selfie

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *