गोदरेज कोर्बरतर्फे भारताच्या कोल्ड चेन साठवणूक क्षेत्राचे स्वयंचलन; प्रगत एएस/ आरएस तंत्रज्ञान सादर I
गोदरेज कोर्बरतर्फे भारताच्या कोल्ड चेन साठवणूक क्षेत्राचे स्वयंचलन; प्रगत एएस/ आरएस तंत्रज्ञान सादर
गोदरेज कोर्बरने आर्थिक वर्ष २५ पर्यंत कोल्ड चेन क्षेत्रातून २०% महसूल योगदानाचे लक्ष्य ठेवले आहे
मुंबई, १५ सप्टेंबर २०२२: गोदरेज आणि बॉयस आणि जर्मन कंपनी कोर्बर सप्लाय चेन यांच्यातील संयुक्त उपक्रम गोदरेज कोर्बर कंपनी भारतामध्ये भारतीय कोल्ड चेन क्षेत्रासाठी वेगळ्या ऑटोमेशन सोल्यूशन्सद्वारे वेअरहाऊस ऑटोमेशन ट्रान्सफॉर्मेशन (गोदाम स्वयंचलन हस्तांतरण) चालवित आहे. गोदरेज कोर्बरने आर्थिक वर्ष २३ मध्ये अत्यंत प्रगत उच्च घनता एएस/आरएस प्रणाली सादर करून भारताच्या कोल्ड चेन क्षेत्रातून २०% योगदान महसूल मिळविला आहे.
कोल्ड स्टोरेज क्षेत्रासमोर जी आव्हाने आहेत त्यांना इतर ‘कोरड्या’ गोदामांना तोंड द्यावे लागत नाही. कोल्ड स्टोरेजमधील कामकाजाच्या उच्च खर्चामुळे जागेचा सर्वोत्तम इष्टतम पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. भारतात डेअरी किंवा कोल्ड चेन उद्योग इंट्रालॉजिस्टिक्स ऑटोमेशनच्या दृष्टीने विकसित झालेला नाही कारण कंपन्या आधुनिक कोल्ड स्टोरेज डिझाइनच्या फायद्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामध्ये प्रगत रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाव्यतिरिक्त उच्च घनता साठवण प्रणाली देखील समाविष्ट आहे. कोरड्या वातावरणापेक्षा कोल्ड स्टोरेजमध्ये काम करणार्या मजुरांना जास्त मोबदला द्यावा लागतो. याशिवाय, फ्रीजिंग गोदामांमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना भरती करण्यात अडचण ही पण प्रमुख समस्या आहे. ऑटोमेशन तंत्रज्ञान जसे की ASRS प्रणाली, कन्व्हेयर्स आणि लेयर पिकर सोल्यूशन्स जलद वितरणाची हमी देऊ शकतात. त्यामुळे सुविधांमध्ये कमी फूटप्रिंट आणि जास्तीत जास्त जागेचा वापर होऊ शकतो.
गोदरेज कोर्बर पुढील ५ वर्षांमध्ये १८%-२०% वाढीची अपेक्षा करत आहे कारण महामारीनंतर पुरवठा साखळीमध्ये ऑटोमेशनचा अवलंब करण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आणि हा प्रवाह कायम राहण्याची अपेक्षा आहे. उत्पादन क्षेत्राच्या वाढीमुळे, संघटित ३पीएल, फार्मा, रिटेल, ई-कॉमर्स आणि अन्न सेवा व्यवसायांचा विकास, तसेच वापराच्या बदलत्या पद्धती यामुळे सरकार कंपन्यांना कोल्ड चेन आणि कोल्ड स्टोरेज सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देत आहे. हे लक्षात घेऊन गोदरेज कोर्बर आघाडीच्या खाजगी कंपन्यांसाठी तसेच सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्पांसाठी ऑटोमेशन उद्योगात मोठ्या प्रमाणात हाताळणीवर लक्ष केंद्रित करत आहे.
गोदरेज कोर्बरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सुनील डब्राल म्हणाले, “स्वयंचलित कोल्ड स्टोरेज सुविधेचा उद्देश प्रक्रिया जलद करणे आणि कर्मचारी आणि उत्पादन या दोघांसाठी सुरक्षितता वाढवणे हा आहे. गोदरेज कोर्बरचे उद्दिष्ट विशेष उच्च घनता साठवणूक स्वयंचलन सुविधा प्रदान करून भारतातील शीतगृह सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आहे. स्टेकर क्रेन आणि शटल आधारित AS/RS सोल्यूशन्सचा त्यात समावेश आहे. ते तुम्हाला मानवी हाताळणीशिवाय सर्व पॅलेटाइज्ड वस्तूंच्या स्टोरेजवर पूर्णपणे नियंत्रण करू देतात. प्रगत तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णता एकत्रित करून आम्ही विविध क्षेत्रांमधील पुरवठा साखळीतील गुंतागुंत हाताळण्याची आणि भारतातील मोठ्या संख्येने कोल्ड चेन गोदामे स्वयंचलित करण्याची आकांक्षा बाळगतो.”
कोल्ड चेन स्टोरेजच्या वाढत्या क्षेत्रात आणखी काम करताना गोदरेज कोर्बरने आर्थिक वर्ष २२ मध्ये ऑर्डर बुक पूर्ण करून ऑर्डर घेण्याचे लक्ष्य ओलांडले आणि जागतिक पातळीवरील कोर्बर सप्लाय चेन सोबतच्या यशस्वी युतीमुळे ४००० कोटी रुपयांच्या एकूण बाजार आकारावर प्रभुत्व मिळवले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे