गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अ‍ॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण 

गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अ‍ॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण
कन्वर्जन्स फाउंडेशन आणि मनीष सभरवाल यांच्या सहयोगाने GATI फाउंडेशनचे भारताला जागतिक प्रतिभा केंद्र बनवण्याचे ध्येय

 ग्लोबल अ‍ॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशनने आपल्या उद्घाटनाची घोषणा एका विशेष कार्यक्रमात केली.  या कार्यक्रमाला भारताचे माननीय परराष्ट्र मंत्री श्री. डॉ. एस. जयशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माननीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार), कौशल्य विकास व उद्योजकता आणि राज्य मंत्री, शिक्षण मंत्रालय श्री. जयंत चौधरी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कन्वर्जन्स फाउंडेशन, मनीष सबरवाल आणि गोदरेज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेली GATI ही एक ना-नफा संस्था असून, जागतिक प्रतिभा गतिशीलतेसाठी सुसूत्र, नैतिक आणि चक्रिय सुसंवादी मार्ग निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.

उच्च उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये 2030 पर्यंत 45–50 दशलक्ष कुशल व अर्ध-कुशल कामगारांची कमतरता भासेल असा अंदाज असल्याने ही मोहिम अधिक महत्त्वाची आणि तातडीची ठरते. भारताला कौशल्यवान प्रतिभेचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीकोनातून GATI फाउंडेशनचे उद्दिष्ट सरकार, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांमधील सहकार्य वाढवून भारतीय कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय कामगार बाजारात संधी उपलब्ध करून देणे हे आहे.

या उद्घाटन कार्यक्रमात परदेशी राजदूत, वरिष्ठ शासकीय अधिकारी, अग्रगण्य उद्योग प्रतिनिधी आणि थिंक टॅंक संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. यामध्ये सरकार-टू-सरकार भागीदारी, नैतिक भरती पद्धती आणि जागतिक कौशल्य गतिशीलतेसाठी उद्योगचालित उपायांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

गोदरेज फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमर मोमिन म्हणाले, “जगात जिथे एका देशाची सीमा ओलांडल्याने एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न दहापट होऊ शकते अशा वेळी जागतिक कामगार गतिशीलतेला चालना देणे हा केवळ एक चांगला आर्थिक निर्णय नसून तो विकासासाठी परिवर्तनकारी ठरतो. उच्च उत्पन्न असलेल्या देशांना 2030 पर्यंत सुमारे 50 दशलक्ष कामगारांची कमतरता भासेल हे लक्षात घेता GATI नैतिक, सुसंवादी आणि उत्तम नियमन असलेले स्थलांतर मार्ग निर्माण करू शकते. त्यामुळे  कौशल्याच्या कमतरतेची भरपाई, देशांतर्गत समृद्धीस चालना आणि व्यक्तींसाठी सन्माननीय संधी निर्माण करणे अशा तीन गोष्टी साध्य होऊ शकतात.”

कन्वर्जन्स फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष धवन म्हणाले, “आज दरवर्षी सुमारे 700,000 भारतीय परदेशात कामासाठी स्थलांतर करतात. मात्र यातील 60% कामगार GCC देशांमध्ये एकवटलेले आहेत. आपण भौगोलिक आणि नोकरीच्या भूमिकांमध्ये विविधता आणून हे वार्षिक स्थलांतर 2–2.5 दशलक्ष पर्यंत वाढवू शकतो. यामुळे केवळ अधिक नोकऱ्या निर्माण होणार नाहीत, तर आपले परकीय चलन 300 अब्ज डॉलरपर्यंत वाढवणे शक्य होईल. परदेशातून आपल्या देशात पाठवलेली रक्कम थेट घराघरात पोहोचत असल्यामुळे उपभोग, शिक्षण व आरोग्यावर खर्च करण्याची क्षमता वाढते. परिणामी गरिबी कमी करण्यावरही मोठा परिणाम होतो.”

टीमलीज सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष मनीष सबरवाल म्हणाले, “GATI ही एक कल्पना आहे ज्याची वेळ भारतासाठी आली आहे. आज गोंधळ खूप आहे, पण जर स्थलांतरासंबंधीची चर्चा बेकायदेशीरतेपासून कायदेशीरतेकडे, स्थलांतरापासून गतिशीलतेकडे आणि नागरिकत्वापासून कामाच्या संधींकडे वळवली तर अर्थशास्त्र हे राजकारणावर मात करेल. समृद्ध देश महागाई टाळू शकतात किंवा देखभाल संबंधित काम (care-work) स्थलांतराशिवाय करू शकतात, ही कल्पनाच अशक्य आहे. देशांसाठीचे आव्हान हे आहे की स्थलांतर हे सुव्यवस्थित, तात्पुरते आणि सुरक्षित असावे. पुढच्या दोन दशकांत जागतिक समृद्धीसाठी उत्तम डिझाइन केलेले गेस्ट वर्कर प्रोग्रॅम्स हे महत्त्वाचे उपाय आहेत हे GATI फाउंडेशन कल्पनांच्या चर्चासत्रात मांडत आहे.”

Godrej industries
Godrej industries

अधिक माहितीसाठी www.gatifoundation.org आणि www.godrejfoundation.com येथे कृपया भेट द्या.

About Godrej Foundation:

The Godrej Foundation is an independent philanthropic trust working to contribute to a progressive, prosperous India. We support work towards accelerated development, inclusive institutions, and prosperous communities. Currently, we do this through investments in building knowledge that contributes to better policy-making; in ecosystems that support people from disadvantaged backgrounds to achieve their full potential; and in measures that create tangible progress for the Indian economy and Indian society.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *