गोदरेज आणि बॉइसने रु. २००० कोटींपेक्षा जास्ट किमतींच्या ऑर्डर्स मिळविल्या I
गोदरेज आणि बॉइसने रु. २००० कोटींपेक्षा जास्ट किमतींच्या ऑर्डर्स मिळविल्या
~व्यवसायाने आतापर्यंतच्या सर्वाधिक किंमतींचे कंत्राट आर्थिक वर्ष २३ मध्ये मिळवल्या आहेत~
मुंबई, ११ मे २०२३: गोदरेज आणि बॉइस मॅन्युफॅक्चयरिंग कंपनी लिमिटेडचे एक व्यवसाय यूनिट गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिनीवेबल एनर्जी व्यवसायाने वीज पारेषण (युनिट पॉवर ट्रान्समिशन), रेल्वे आणि सौर प्रकल्पांकडून रु. २००० कोटींपेक्षा जास्त किंमतींचे कंत्राट मिळविले आहेत. या प्रकल्पांमध्ये संपूर्ण भारतभर ४००केव्ही आणि ७६५ केव्हीच्या इएचव्ही सबस्टेशनसाठी ईपीसी, मुंबईमध्ये २२०केव्ही जमिनीच्या आतीलकेबलसह जीआयएस सबस्टेशन आणि नेपाळमधील १३२ केव्ही सबस्टेशन प्रकल्पाचा समावेश आहे.
सौर विभागामध्ये कंपनीने पश्चिम बंगालमध्ये २० मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड-माऊंट सोलर प्लांटचे कंत्राट मिळवले आहे. पुढील तीन वर्षांमध्ये सोलर ईपीसी पोर्टफोलिओ वार्षिक ३०% वाढवण्याच्या आणि ऊर्जा संवर्धनाला प्रोत्साहन देण्याच्या व्यवसायाच्या उद्दिष्टाला हे कंत्राट समर्थन देते.
ट्रॅक्शन सबस्टेशन आणि संबंधित कामांच्या बांधकामासाठी भारतीय रेल्वेकडून रु. ९०० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या प्रकल्पासह कंपनी रेल्वे विद्युतिकरणामध्ये प्रवेश करत आहे. हा प्रकल्प भारताच्या रेल्वेचे आधुनिकीकरण आणि शाश्वत वाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. सध्याच्या नवी दिल्ली-हावडा मार्गावर, नवी दिल्ली-मुंबई मार्गावरील मथुरा- पलवल दरम्यानचा वेग १६० किमी प्रति तास/२०० किमी प्रति तासापर्यंत सुधारित करण्यासाठी हा प्रकल्प ‘मिशन रफ्तार’ चा एक भाग आहे.
गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सचे वरिष्ठ उपाध्यक्षआणि व्यवसाय प्रमुख श्री. राघवेंद्र मिर्जी म्हणाले, “हे मिळालेले कंत्राट वीज पारेषण क्षेत्राला (पॉवर ट्रान्समिशन) बळकट करण्यासाठी आणि रेल्वे व आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये प्रवेश करण्यासाठी आमच्या विविधीकरणाच्या धोरणाशी सुसंगत आहे. वीज पारेषणमधील (पॉवर ट्रान्समिशन) सबस्टेशन कंत्राटांसह आम्ही सध्याच्या पॉवर युटीलिटीज व्यतिरिक्त गैर-युटीलिटी ग्राहकांचा समावेश करण्यासाठी आमच्या ग्राहक बेसमध्ये विविधता आणली आहे. या कंत्राटांबरोबरच गोदरेज आणि बॉइसने संपूर्ण भारतात तसेच नेपाळमध्ये इएचव्ही केबल, इएचव्ही सबस्टेशनसाठी, ट्रॅक्शन सबस्टेशन आणि सौर प्रकल्पांमध्ये पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. या महत्वाच्या परिवर्तनात भारतीय रेल्वेसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. पुढे जाऊन भविष्यात आम्ही अशा संधी सुरक्षित करू आणि भारतातील पायाभूत सुविधा व वीज पारेषण (पॉवर ट्रान्समिशन) सुधारण्यात योगदान देण्यासाठी नवीन विभागांना सेवा देऊ अशी आम्ही आशा करतो.”
About Godrej Electricals & Electronics
Godrej & Boyce has been one of the pioneers in manufacturing and delivering a range of equipment, solutions, and services aimed at driving efficient energy management across the industry value chain. Godrej Electricals & Electronics, a business of Godrej & Boyce, forayed into the Power Transmission business in 2010 and has successfully commissioned several EHV substation projects up to 400kV across all territories in India and further aims to consolidate its position in the 400kV & above segment. Over the years, Godrej Electricals & Electronics has established itself as one of the most trusted EPC companies in the Power Transmission segment in India.
About Godrej & Boyce
Godrej & Boyce (‘G&B’), a Godrej Group Company, was founded in 1897 and has contributed to India’s journey of self-reliance through manufacturing. G&B patented the world’s first springless lock and since then, has diversified into 14 businesses across various sectors from Security, Furniture, and Aerospace to Infrastructure and Defence. Godrej is one of India’s most trusted brands serving over 1.1bn customers worldwide daily.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo