सणासुदीच्या दिवसांचा उत्साह वाढवण्यासाठी गोदरेज अप्लायन्स तयार
सणासुदीच्या दिवसांचा उत्साह वाढवण्यासाठी गोदरेज अप्लायन्स तयार
सणासुदीच्या दिवसांचा उत्साह वाढवण्यासाठी गोदरेज अप्लायन्सेसतर्फे प्रीमियम अप्लायन्सेसची विलक्षण श्रेणी सादर
· ४ दरवाजे आणि उच्च क्षमता असलेले रेफ्रिजरेटरचे प्रकार
· स्टीम वॉश करता येणारे आणि फ्रंट-लोड वॉशिंग मशीन
· उच्च ISEER आणि टर्बो चिल सीरीज एअर कंडिशनर्स
· गेल्या वर्षीच्या तुलनेत या सणासुदीच्या हंगामात ३०-४० % वाढीचे लक्ष्य
गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचा एक भाग असलेली गोदरेज अप्लायन्सेस, आपल्या ग्राहकांसाठी प्रीमियम उत्पादने आणि आकर्षक सणाच्या योजनांसह सणासुदीचा काळ उजळवून टाकण्यासाठी सज्ज आहे.
खरेदीचा कल आता अधिकाधीक अनुभव-आधारित आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांकडे वळला असल्यामुळे प्रीमियम विभागाच्या वाढीस हातभार लागला आहे. या वर्षी प्रीमियम विभागामध्ये ३०% पेक्षा जास्त वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवून गोदरेज अप्लायन्सेसने ग्राहकांना विशिष्ट वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानासह अधिक उत्पादन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विशेषत: प्रीमियम विभागामध्ये घरगुती उपकरणांची श्रेणी वाढवली आहे. एकूणच, ग्राहक रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर्स, एअर कूलर, मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर, डिशवॉशर आणि इतर अनेक गोष्टींच्या विस्तृत पोर्टफोलिओमध्ये पसरलेल्या ३५० हून अधिक एसकेयूज मधून निवडू शकतात.
गोदरेज अप्लायन्सेसने अलीकडेच सोपे परिवर्तनीय मोड आणि प्रगत नियंत्रणांसह सुसज्ज असा ६७० ली. प्रीमियम ‘इऑन वेल्वेट ४ डोअर रेफ्रिजरेटर’; ४०० लीटरहून अधिक फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर्स आणि उच्च क्षमतेचे २५० लीटरहून अधिक सिंगल-डोअर रेफ्रिजरेटर्स ‘एज मार्व्हल सीरिज’मध्ये सादर केले आहेत. सोबत स्टीम वॉश करता येणारे टॉप-लोड स्वयंचलित वॉशिंग मशीन आणि प्रगत वैशिष्ट्यांसह फ्रंट-लोड वॉशिंग मशीनही सादर केले आहे. जोडीला 1.1 TR आणि 1.7 TR मध्ये ‘टर्बो चिल एअर कंडिशनर्स’, विस्तीर्ण इनडोअर युनिट, l-सेन्स आणि 5-इन-1 परिवर्तनीय तंत्रज्ञान, नॅनो कोटेड अँटी-व्हायरल फिल्टर्स; आणि वीज बचत करणारे 5.4 ISEER ‘सुपर-कार्यक्षम एसी सादर करत आहे. हे सर्व ‘एज स्नोचिल एअर कूलर्स’ आणि नवीन ‘५ स्टार डीप फ्रीझर्स’ च्या नवीन मालिकेसह अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्य यांसह ग्राहकांना त्यांच्या घरांसाठी निवडण्यासाठी भरपूर पर्याय आहेत.
सणासुदीच्या दिवसांबाबत बोलताना गोदरेज अँड बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “सणासुदीच्या दिवसांत आमचे लक्ष विविध श्रेणींमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रगत घरगुती उपकरणे सादर करण्यावर आहे. सध्या, आमचे प्रीमियम मिक्स ३५% असून आम्हाला आमच्या नवीन योजनांसह ते ४०% पर्यंत न्यायचे आहे. या योजना विशेषत: विशिष्ट ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या असून त्यांना सौंदर्यात्मक अपील आहे. सुलभ सुधारणा सक्षम करणार्या ग्राहक योजनांसह, या नवीन ऑफर भरीव वाढीला चालना देण्यासाठी तयार आहेत. ३५० पेक्षा जास्त SKUS आणि ग्राहक योजनांच्या विस्तृत पोर्टफोलिओच्या मागे आम्हाला गेल्या वर्षीच्या तुलनेत या उत्सवाच्या काळात ३०-४० % विक्री वाढीची अपेक्षा आहे.
आम्हाला याची जाणीव आहे की ग्राहक दिवाळीत त्यांच्या घरांसाठी खरेदी करताना टिकाऊ वस्तू खरेदी करण्याचा विचार करतात. त्यानुसार, आमची #AyushmannBhavaForever ही खास उत्सवी मोहीम त्यांना दीर्घकाळ टिकणाऱ्या उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांद्वारे चिरस्थायी आनंदाचे आश्वासन देते. जोडीला आता विस्तारित वॉरंटी योजना आणि इतर आकर्षक ग्राहक योजना घेऊन येत आहे.”
सणासुदीच्या दिवसांसाठी, गोदरेज अप्लायन्सेस आपल्या प्रिय ग्राहकांसाठी रोमांचक योजनांच्या मालिकेचा विस्तार करत आहे. त्यात विस्तारित वॉरंटी, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर आणि सुलभ ईएमआय यांचा समावेश आहे. हे संपूर्ण भारतात ऑफलाइन स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi