गोदरेज अॅग्रोव्हेटने तेल पाम शेतकऱ्यांसाठी ‘समाधान’ हे वनस्टॉप सोल्यूशन केंद्र सुरू केले I

गोदरेज अॅग्रोव्हेटने तेल पाम शेतकऱ्यांसाठी ‘समाधान’ हे वनस्टॉप सोल्यूशन केंद्र सुरू केले

~कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एनएमइओ-ओपी योजनेअंतर्गत २०२७ पर्यंत १,०००,००० हेक्टर तेल पामची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

~ गोदरेज अॅग्रोव्हेटने पुढील पाच वर्षात आणखी ६०,००० हेक्टर नवीन तेल पाम लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

~२०२७ सालापर्यंत असे आणखी ५० केंद्र चालू करण्याची कंपनीची योजना आहे.

मुंबईजानेवारी २०२०२३: गोदरेज अॅग्रोव्हेटच्या तेल पाम व्यवसायाने ‘समाधान’ नावाचे एक महत्त्वाचे उपक्रम सुरू केले आहे जे एक असे वन स्टॉप सोल्यूशन असेल जे तेल पाम उत्पादकांसाठी माहिती, साधने, सेवा आणि उपाय पुरविणारे सर्वसमावेशक पॅकेज प्रदान करेल. पाम तेल उद्योग क्षेत्रात एक महत्त्वाचे सहाय्यक बनून तेल पाम शेतकऱ्यांना नवीनतम कृषी तंत्राचा अवलंब करून आणि त्यांची उत्पादकता वाढवून त्यांचे उत्पादन अनुकूल करण्यासाठी मदत करणे हे ‘समाधान’चे ध्येय आहे. ज्ञान आणि आधुनिक व समकालीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करून ‘समाधान’ शेतकऱ्यांना तेल पाम लागवडीबद्दल माहितीपूर्ण व योग्य निर्णय घेण्यास सक्षम करेल, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल.

            ‘नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल-ऑइल पाम’ (एनएमइओ-ओपी) या राष्ट्रीय योजनेची ऑगस्ट २०२१ मध्ये सुरुवात झाल्यापासून एक वैविध्यपूर्ण कृषी उद्योग आणि भारतातील तेल पाम क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडने भारतातील तेल पाम व्यवसायाच्या दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी पुढील पाच वर्षांमध्ये अजून ६०,००० हेक्टर तेल पामची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंपनीने ‘समाधान’ विकसित केले आहे.

            प्रत्येक ‘समाधान’ केंद्र ~२००० हेक्टर तेल पामच्या लागवडीस सहाय्य करेल आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान व तज्ज्ञांच्या सल्ल्याद्वारे उत्तम परिपक्व बागांमध्ये शाश्वत उत्पादकता मिळवण्यास शेतकऱ्यांना मदत करेल. या उपक्रमाद्वारे, गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड भारतीय तेल पाम शेतकऱ्यांपर्यंत जगातील सर्वोत्तम पद्धती पोहोचविण्याचे आणि सर्व भौगोलिक क्षेत्रांमधील शेतकऱ्यांना या पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करण्याचे योजित आहे. हे केंद्र शेतकऱ्यांना विकासात्मक वित्त पुरवठा मिळवून देण्यासाठी सहाय्य करेल आणि  सरकारी अनुदाने, योजना आणि इतर लाभदायक तरतुदींची माहिती पुरवून ते मिळवण्यासाठी सुद्धा मदत करेल.

            या उपक्रमाविषयी बोलताना गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बलराम सिंग यादव म्हणाले, “तेल पाम व्यवसायातील तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभवांसहआम्ही शाश्वत पाम तेल लागवड प्रक्रियेवर शेतकऱ्यांसोबत काम करीत आहोत आणि त्यांना प्रशिक्षित ही करीत आहोत. ‘समाधान’च्या मदतीने आम्ही उद्योगाच्या विस्तारासाठी आणि समृद्धीसाठी उपाय प्रदान करण्याची आशा करतो. पाम तेल उत्पादक शेतकऱ्यांना विविध संसाधनेसेवाव्यावसायिक मार्गदर्शन आणि नवीनतम तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही अलीकडेच तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मध्ये प्रत्येकी दोन केंद्रे उघडली आहे आणि मार्च २०२३ पर्यंत त्यांचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. साल २०२७ पर्यंतआम्ही अशीच अजून ५० केंद्रे स्थापन करण्याचे योजले आहे.”

            ऑगस्ट २०२१ मध्ये ‘नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल-ऑइल पाम’ (एनएमइओ-ओपी) योजना सुरू झाल्यापासून तेल पाम उद्योगात एक नवीन उत्साह आणि गती आली आहे. हा कार्यक्रम भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम असून याचा उद्देश तेल पाम व्यवसायाच्या दीर्घकालीन शाश्वत विकासाला चालना देणे आणि नवीन शेतकऱ्यांना विशेषतः ईशान्येकडील प्रदेशात नवीन शेती सुरू करण्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी अतिरिक्त समर्थन प्रदान करणे हा आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ‘नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल-ऑइल पाम’ (एनएमइओ-ओपी) योजने अंतर्गत २०२७ पर्यंत १,०००,००० हेक्टर तेल पाम ची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी व्हायबिलिटी गॅप पेमेंट (VGP) ची सुरुवात आणि नवीन शेतकऱ्यांना वाढीव प्रोत्साहन निधी ही या कार्यक्रमाची दोन प्रमुख वैशिष्ठ्ये आहेत जी यास अनोखे आणि उद्योग क्षेत्रास आधार देणारे बनवतात.

Godrej Agrovet
Godrej Agrovet

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *