गोदरेज अँड बॉयसने जर्मन भागीदार कॉर्बर सप्लाय चेनच्या सहयोगाने आपल्या स्वयंचलित पुरवठा शृंखला सुविधांमध्ये वाढ केली I
गोदरेज अँड बॉयसने जर्मन भागीदार कॉर्बर सप्लाय चेनच्या सहयोगाने आपल्या स्वयंचलित पुरवठा शृंखला सुविधांमध्ये वाढ केली
पुढील ५ वर्षात १८% वृद्धीचे गोदरेज कॉर्बरचे उद्दिष्ट
मुंबई, ५ ऑगस्ट २०२२: वेयरहाऊस ऑटोमेशनच्या जागतिक बाजारपेठेची उलाढाल आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत १९.५ बिलियन डॉलर्सवर पोहोचण्याची शक्यता आहे आणि महामारीमुळे या क्षेत्राचे महत्त्व पुन्हा एकदा उजेडात आले आहे. या वाढत्या बाजारपेठेला अनुसरून, गोदरेज ग्रुपमधील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयस व जर्मनीतील कॉर्बर सप्लाय चेन यांच्या भागीदारीने अनोखी ऑटोमेशन सोल्युशन्स प्रस्तुत करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इंट्रालॉजिस्टिक्समध्ये पुढाकार घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये गोदरेज कॉर्बरने आपल्या ऑर्डर इनटेक उद्दिष्टांपेक्षा जास्त ऑर्डर्स मिळवण्यात यश मिळवले. कॉर्बर सप्लाय चेन या जागतिक कंपनीसोबत यशस्वी भागीदारीच्या बळावर येत्या पाच वर्षात १८% वृद्धी साध्य करण्याचे उद्दिष्ट त्यांनी आखले आहे.
महामारी सुरु झाल्यापासून या उद्योगक्षेत्रामध्ये ऑटोमेशनचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. याबरोबरीनेच पुरवठा शृंखला ऑटोमेशनच्या विकासाला वेग देणारे इंजिन म्हणून आशिया खंडाची ख्याती होत असल्याने गोदरेज कॉर्बर या आपल्या उपकंपनीमार्फत भारतातील गुंतवणुकींमध्ये आर्थिक वर्ष २०२३ मध्ये वाढ करण्याचा कॉर्बर सप्लाय चेनचा उद्देश आहे.
मजबूत सहयोगाचा परिणाम आणि सरकारच्या मेक इन इंडिया धोरणांना प्रतिसाद म्हणून गोदरेज कॉर्बर सप्लाय चेनने बाजारपेठेतील हिस्सेदारीमधील वाढीसह बाजारपेठेत वृद्धी साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत बाजारपेठेत २५% हिस्सेदारी मिळवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट त्यांनी आखले आहे. उत्पादन क्षेत्राची वाढ, संघटित ३पीएल, फार्मा, रिटेल, ईकॉमर्स आणि खाद्य सेवा व्यवसायांचा विकास तसेच उपभोगाच्या पद्धतींमध्ये होणारे बदल यामुळे सरकार शीत शृंखला आणि शीत साठवण सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहे. हे ध्यानात घेऊन गोदरेज कॉर्बर आघाडीच्या खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्पांसाठी ऑटोमेशन उद्योगक्षेत्रात बल्क हँडलिंगवर भर देत आहे. ऑटोमेटेड सुविधा तयार करून भारतात स्वावलंबी इंट्रालॉजिस्टिक्स क्षेत्र उभारण्याची गोदरेज अँड बॉयस व कॉर्बर सप्लाय चेन या दोघांचीही इच्छा होती. या व्यवसायाची बाजारपेठ तब्बल ४,००० कोटींची आहे.
गोदरेज कॉर्बरचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड श्री सूनिल डाब्राल म्हणाले, “गोदरेज कॉर्बर एक सिस्टिम इंटिग्रेटर आहे. मॅन्युअल हँडलिंग, कन्व्हेयर यांची गरज न लागता तुम्हाला तुमच्या सर्व पॅलेटाइज्ड वस्तूंच्या साठवणीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात सक्षम बनवणाऱ्या स्टेकर क्रेन्स व शटल बेस्ड एएस/आरएस सुविधा, वेयरहाऊसमधील दूरवरच्या जागांना देखील पटकन आणि अतिशय कार्यक्षमपणे जोडणाऱ्या रेल-गाईडेड वेहिकल सिस्टिम्स, ऑटोनॉमस रोबोटिक्स बेस्ड सुविधा आणि सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी या यंत्रणा चालवण्यासाठी डब्ल्यूसीएस व डब्ल्यूएमएस सारख्या आयटी सुविधा यांचा समावेश असलेली व्यापक ऑटोमेशन सोल्युशन्स ही कंपनी प्रदान करते. तंत्रज्ञान व नैपुण्ये यांची अतुलनीय खोली व व्याप्ती प्रस्तुत करून भारतात विविध क्षेत्रांमधील किचकट व गुंतागुंतीच्या पुरवठा शृंखला लीलया सांभाळण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
कॉर्बर सप्लाय चेनचे (एशिया) चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विन थियन चाय यांनी सांगितले, “इंट्रालॉजिस्टिक्समध्ये वाढ करण्यासाठी स्थानिक व जागतिक अशा दोन्ही अपेक्षांपेक्षा कैक पटींनी जास्त चांगली कामगिरी करून दाखवण्याचे कॉर्बरचे उद्दिष्ट आहे. गोदरेज अँड बॉयससोबत आमची भागीदारी आम्हाला हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवेल. कमी खर्चात वेयरहाऊसिंग कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणून आणि वेयरहाऊसमध्ये कचरा व नुकसान यामध्ये घट करून शाश्वत तंत्रज्ञानासह सामग्री हाताळणी सुविधा पुरवणारे सिस्टम्स इंटिग्रेटर म्हणून आम्हाला ओळखले जावे हा आमचा उद्देश आहे. आमच्या व्यवसाय महत्त्वाकांक्षांचे रूपांतर आमच्या ग्राहकांच्या यशामध्ये करण्याचे काम गोदरेज कॉर्बर सक्षमपणे करेल याची आम्हाला खात्री आहे.”
About Godrej & Boyce
Godrej & Boyce (‘G&B’), a Godrej Group Company, was founded in 1897 and has contributed to India’s journey of self-reliance through manufacturing. G&B patented the world’s first springless lock and since then, has diversified into 14 businesses across various sectors from Security, Furniture, and Aerospace to Infrastructure and Defence. Godrej is one of India’s most trusted brands serving over 1.1bn customers worldwide daily. To learn more visit: www.godrej.com
About Körber Supply Chain
Körber Supply Chain is a Business Area of Körber, an international technology group with around 10,000 employees and more than 100 locations worldwide. At Körber Supply Chain, we have a broad range of proven supply chain solutions to fit our customers’ size, business strategy and appetite for growth. Our customers conquer the complexity of the supply chain thanks to our portfolio that includes software, automation, voice solutions, robotics and material handling — plus the systems integration expertise to tie it all together. Körber helps to manage the supply chain as a competitive advantage.
We are a global partner not just for today, but also as the needs of supply chains continue to evolve. Conquer supply chain complexity – with Körber. The Business Area Supply Chain is part of the global technology group Körber. Find out more on www.koerber-supplychain.com
For further information, please contact:
Priya Shetty: priya.shetty@adfactorspr.com, 9870774424
Zainab Najmi: zainab.najmi@adfactorspr.com, 7710877863
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi