जी आय एल केमिकल्सला भारताच्या रसायन क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक असल्याचा सन्मान ग्रेट प्लेस टु वर्क इंडियातर्फे बहाल I

जीआयएल केमिकल्सला भारताच्या रसायन क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक असल्याचा सन्मान ग्रेट प्लेस टु वर्क इंडियातर्फे बहाल

मुंबई, २२ जून २०२३ – जीआयएल केमिकल्स या रसायन क्षेत्रातील प्रमुख कंपनीने असून या काम करण्यासाठी या क्षेत्रातील सर्वात चांगल्या कंपन्यांपैकी एक असल्याचा सन्मान ग्रेट प्लेस टु वर्कतर्फे त्यांना देण्यात आला आहे. जीआयएल केमिकल्सचा २०२३ मधील उत्पादन क्षेत्रातील भारतातील ५० सर्वोत्तम वर्कप्लेसेसपैकी एक म्हणून नुकतेच प्रमाणित करण्यात आले.

ग्रेट प्लेस टु वर्क ही कामाच्या ठिकाणी शाश्वत, विश्वासार्ह, दर्जेदार कामगिरीस परिपूर्ण देणारे वातावरण तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणारी जागतिक संस्था आहे. ग्रेट प्लेस टु वर्क इन्स्टिट्यूटने जगभरातील तब्बल १०० दशलक्ष कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. भारतात या संस्थेने प्रत्येक वर्षी २२ उद्योग क्षेत्रातील ११०० कंपन्यांबरोबर सहकार्य केले असून त्याद्वारे कामाच्या ठिकाणच्या संस्कृतीचे विश्लेषण, मापदंड तयार करणे आणि पूरक वातावरण बळकट करण्यासाठी आवश्यक कृती इत्यादी कामे केली जातात.

जीआयल केमिकल्सचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष नितिन नबार म्हणाले, ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असल्याचा सन्मान मिळणे हे अंतिम ध्येय नाही, तर सातत्याने दर्जेदार कामगिरी करण्याच्या आमच्या प्रवासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. यापुढेही आमचा हा प्रवास अखंड सुरू राहील. सर्व कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि पाठिंबा मला अधिक शाश्वत व दैदीप्यमान भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.’

जीआय केमिकल्सच्या एचआर विभागाच्या एव्हीपी अपेक्षा जैन म्हणाल्या, ‘हा सन्मान विश्वास आणि कामगिरीस महत्त्व देणारे सकारात्मक वातावरण कंपनीअंतर्गत तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेणारा आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रगतीला व पर्यायाने कंपनीच्या यशाला चालना देणारे कामाचे ठिकाण तयार करण्यासाठी ते घेत असलेल्या कष्टांना मिळालेली ही पावती आहे.

GIL Chemicals 1
GIL Chemicals 1

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *