ईएसजी मधील ‘एस’ उलगडताना – गायत्री दिवेचा

गायत्री दिवेचा, प्रमुख – गुड अँड ग्रीन, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट कंपनीज

अलीकडेच एका मोठ्या तंबाखू कंपनीने ईएसजी स्कोअरवर मोठ्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीला मागे टाकले आहे. असे कसे झाले? उत्तर ईएसजी च्या “एस” मध्ये आहे – सामाजिक निर्देशांक.

तंबाखू कंपनीने बोर्ड विविधता, सामाजिक न्याय उपक्रम आणि अल्पसंख्याक व्यवसाय निधी यांसारख्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. दरम्यान, इलेक्ट्रिक कार उत्पादन कंपनीने या सामाजिक निर्देशांकांमध्ये कमी स्वारस्य दाखवले आहे. सीएनबीसी नुसार, आपल्या गुंतवणूक विश्लेषणामध्ये ईएसजी (पर्यावरण, सामाजिक, प्रशासन) घटक वापरणारे बहुतांश निधी व्यवस्थापक ‘ई’ वर किंवा हवामान बदलावर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या निर्णयांचा तो प्रमुख निकष मानला गेला आहे कारण तो निकष गुंतवणूकदारांना अधिक निकडीचा वाटतो. i

या परिस्थितीत, ईएसजी मध्ये या आधी कमी महत्व दिले जात असलेल्या “एस” ला म्हणजेच सामाजिकतेला आता पुनर्स्थित केले जात आहे. त्याचे महत्त्व किती आहे यावर प्रकाश टाकला जात आहे. एका अभ्यासानुसार, विविध सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण व्यवस्थापन टीम्समुळे १९% जास्त महसूल मिळू शकतो. ii तंबाखू कंपनीच्या बाबतीत, महिला तंबाखू उत्पादक शेतकर्‍यांचे सक्षमीकरण आणि विविधतेला चालना देण्याच्या प्रयत्नांमुळे कंपनीच्या उच्च ईएसजी मानांकनावर प्रभाव पडला. कंपनीने ईएसजीचा वापर करून “वादग्रस्त उद्योगक्षेत्रातील कंपनी” या वरून सामाजिकदृष्ट्या जबाबदार कंपनी अशी आपली प्रतिमा बदलली. तरीही, हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की उच्च ईएसजी रेटिंग असले तरी कंपनीमुळे होऊ शकणारे महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक, आर्थिक आणि पर्यावरणीय नुकसान धूसर होत नाही.

सामाजिक मापदंडांवर उच्च लक्ष केंद्रित करणार्‍या कंपन्यांमध्ये अधिक प्रेरित आणि उत्पादक कार्यशक्ती दिसून येते. त्यांच्यात मजबूत समुदाय भावना असते तसेच कर्मचार्‍यांच्या कार्य-जीवन संतुलनातही सुधारणा दिसून येते. मॅकिन्सेच्या अहवालात (विविधतेच्या माध्यमातून वितरण) असे नमूद केले आहे की विविध कार्यकारी टीम असणे कंपनीला २०% पेक्षा जास्त अधिक कार्यक्षम बनवते. iii

तंबाखू आणि तेल कंपन्यांनी सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे ईएसजी मानांकन उंचावणे जमवले असले तरी, ईएसजी मधील “एस” चे महत्त्व फक्त तपासणी करण्यापलीकडे आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कर्मचार्‍यांच्या कल्याणापासून विविधतेपर्यंत आणि मानवी हक्कांच्या समावेशापर्यंत सामाजिक घटकांची गुंतागुंत कंपनीच्या गाभ्यामध्ये खऱ्या अर्थाने एकत्रित केली पाहिजे, सामावली गेली पाहिजे. अधिक महत्त्वाचे म्हणजे सामाजिक प्रभाव आणि ते कमी करण्याच्या योजनांचा हवामान कृती धोरण, संक्रमण योजना आणि निव्वळ शून्य रोडमॅप्सच्या संदर्भात विचार केला पाहिजे.

हवामानाच्या समस्या सगळं समाजविश्व ढवळून काढत आहे. शेवटी, हवामान बदलाचा फटका जगातील सर्वात गरीब लोकांना सहन करावा लागतो. या अर्थाने या “एस” घटकाचे महत्त्व खूप जास्त आहे. संवाद आणि संशोधनाचे प्रमाण वाढत आहे. त्यावरून हे दिसून येते की हवामान कृती आवश्यक असताना, लोक आणि समुदायांवर हवामान अनुकूलतेचे अनेक संभाव्य परिणाम आहेत. म्हणूनच ‘फक्त संक्रमण’ ची गरज सर्वतोपरि आहे. याचाच अर्थ आपण ज्या गोष्टीपासून दूर जात आहोत त्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या सर्वात असुरक्षित समुदायांच्या गरजा विचारात घेणे आणि त्यांची तरतूद करणे. याचे उदाहरण म्हणजे कोळसा प्लांट/फील्ड जवळ असलेले समुदाय. कोळसा क्षेत्राजवळ राहणाऱ्या ओडिशातील महिलांबद्दलचा डाउन टू अर्थचा अलीकडील भाग हे आणखी समजून घेण्यासाठी अत्यंत वाचनीय आहे. [i]v

“एस” ला “ई” आणि “जी” इतकंच म्हणजेच सामाजिकतेला पर्यावरण आणि प्रशासन यांच्या इतके महत्व देण्याची वेळ आता आली आहे. वादग्रस्त उद्योगातील एखादी कंपनी ज्या प्रकारे सामाजिकता दाखवून “एस” ला पुनर्स्थित करू शकते ते सर्व उद्योगक्षेत्राला वेळेवर स्मरण करून देणारे आहे. “एस” म्हणजेच सामाजिकता ही जटिल आणि सूक्ष्म गुंतगुंतीची असते आणि जबाबदार गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग असते. त्यामुळे याची हाताळणी सांभाळून करावी लागते.

ईएसजी मधील ‘एस’ चा मागोवा घेण्यासाठी, कंपन्या सामाजिक प्रभाव मापन साधनांचा लाभ घेऊ शकतात. ही साधने कर्मचार्‍यांचे समाधान, विविधता, समुदायांना सामावून घेणे आणि मानवी हक्क पद्धती यासारख्या घटकांचे मूल्यांकन करतात. अशा साधनाचे सर्वात व्यापक उदाहरण म्हणजे ग्लोबल रिपोर्टिंग इनिशिएटिव्ह (GRI) चौकट. ही कंपनीला तिच्या सामाजिक कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यास आणि सुधारणेची क्षेत्रे ओळखण्यास सक्षम करते. प्रमाणित संस्थांद्वारे बाह्य ऑडिट सामाजिक घटकांप्रती असलेल्या कंपनीच्या बांधिलकीचे प्रमाणित मूल्यमापन पुरवू शकतात. बी-कॉर्पोरेशन, फेअर ट्रेड आणि SA8000 सारखी प्रमाणपत्रे कंपनीची सामाजिक जबाबदारीची बांधिलकी दर्शवू शकतात.

केवळ डेटा संकलित करणे आणि आकडेवारी नोंदवणे हे उद्दिष्ट नाही, तर या माहितीचा वापर करून प्रभावी बदल घडवून आणणे हे ध्येय आहे. ज्या कंपन्या “एस” घटकांप्रती खरी बांधिलकी दाखवू शकतात त्यांना कर्मचारी सहभाग, ग्राहकांची निष्ठा, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि शेवटी शाश्वत नफा या संदर्भात दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता असते.

सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य काम करणाऱ्या कंपन्या आहेत. आदिदास मध्ये ते त्यांच्या वेबसाइटवर त्यांना किती थर्ड पार्टी मानवी हक्क तक्रारी मिळाल्या, या तक्रारींची स्थिती आणि कंपनी त्यांचे निराकरण करण्यासाठी कशा प्रकारे काम करत आहे याची माहिती सक्रियपणे उघड करत आहे. गोदरेजमध्येही आम्ही विविधतेची आणि आम्हाला घडवणाऱ्या लोकांची कदर करतो. आमच्या कर्मचाऱ्यांसाठी मानवी हक्क सुनिश्चित करण्याची आमची बांधिलकी आहे. आम्ही वैविध्याला प्रोत्साहन देतो आणि जेंडर न्यूट्रल स्वच्छतागृहे, विवाहित जोडीदाराच्या बरोबरीनेच समलिंगी जोडीदार असलेल्या कर्मचार्‍यांसाठीही लाभ मिळणे किंवा जेंडर न्यूट्रल पालन धोरण आणि समर्थन याद्वारे ते सक्षम करतो.

हे सगळे असले तरी “सामाजिकते”ला समर्थन देणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी आणि देखरेख करताना येणारी अनेकविध आव्हाने नाकारता येणार नाहीत. जर एखादी कंपनी वैविध्यपूर्ण कार्यबल वाढवण्याच्या प्रयत्नात असेल, अपंग उमेदवारांना किंवा भिन्न लिंग ओळख असलेल्या व्यक्तींना कामावर ठेवत असेल तर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कार्यात्मक बदलांसाठी खर्च करावा लागतो आणि संवेदनशील प्रशिक्षणाची आवश्यकता देखील उद्भवू शकते.

शेवटी या “एस” वर म्हणजेच सामाजिकतेवर लक्ष केंद्रित करणे केवळ ईएसजी रेटिंगवर उच्च गुण मिळवणे नाही तर हे रेटिंग बदलाला आणि सर्वसमावेशक आणि न्याय्य भविष्यासाठी कंपनीच्या योगदानाचे प्रतिबिंब आहे ना याची खात्री करून घेणे आहे.

Gayatri Divecha Godrej
Gayatri Divecha Godrej

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *