अक्षय पात्र फाऊंडेशनचा गो-ग्रीन उपक्रमाला चालना देण्यासाठी FedEx Express सोबत सहयोग I
अक्षय पात्र फाऊंडेशनचा गो-ग्रीन उपक्रमाला चालना देण्यासाठी FedEx Express सोबत सहयोग
गो-ग्रीन उपक्रमाचा संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी २,८०० पेक्षा अधिक वंचित मुलांना फायदा होईल
भारत, ५ सप्टेंबर २०२२: अक्षय पात्र फाऊंडेशनने ‘गो ग्रीन इनिशिएटिव्हज’ पुढे नेण्यासाठी जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी FedEx Express सोबत सहयोग केला आहे. FedEx Express ने अक्षय पात्रच्या किचनला महाराष्ट्रातील पनवेल येथे सौर पॅनेल आणि बेल्लारी, कर्नाटक येथे इलेक्ट्रिक बाइक्स (ई-बाईक) दान केल्या आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे फाउंडेशनला २५ किलोवॅट ऊर्जा निर्माण करण्यास, वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यास आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत होईल. इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या बदली म्हणून ई-बाईकचा अवलंब केल्यामुळे वाहतूक खर्चात होणारी बचत अक्षय पात्रला संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी २,८०० पेक्षा अधिक मुलांना जेवण पुरवण्यास सक्षम करेल.
वर्ष २००० पासून अक्षय पात्र दैनंदिन शालेय दिवसांमध्ये मुलांना गरम, पौष्टिक माध्यान्ह भोजन देत आहे. फाऊंडेशनला ही सेवा देत असलेल्या मुलांबद्दल व समुदायांप्रती असलेली जबाबदारी आणि भूमातेप्रती असलेली जबाबदारी याची जाणीव आहे. १२० ते १५० घनमीटर बायोगॅस निर्माण करणार्या सेंद्रिय कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी बायोगॅस प्लांटच्या वापरासह विविध हरित उपक्रमांचा अवलंब करून संस्थेने कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्लांट्स एलपीजीवरील अवलंबित्व कमी करतात, तसेच सेंद्रिय खताचे उत्पादन करतात, जे रासायनिक खतांसाठी अधिक टिकाऊ पर्याय आहे. फाऊंडेशनकडे स्वयंपाकघरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, विल्हेवाट लावण्यासाठी व पुनर्वापर करण्यासाठी आणि पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स (ईटीपी) आहेत.
अक्षय पत्र किचन्समध्ये सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी फोटोव्होल्टेइक (पीव्ही) सेल वापरणारे सौर पॅनेल देखील स्थापित केले आहेत. संस्थेने कार्बन फूटप्रिंट आणखी कमी करण्यासाठी त्यांच्या किचन्समध्ये आणि तेथून शाश्वत पद्धती सुनिश्चित करण्यासाठी ई-बाईकची देखील सुविधाा सुरू केली आहे. पनवेलमधील सौर पॅनेल आणि FedEx Express ने दान केलेल्या बेल्लारीतील ई-बाईक्स अक्षय पात्रच्या सर्व कार्यसंचालनांमध्ये हरित ऊर्जेचा अवलंब करण्याच्या प्रयत्नांना गती देतील.
FedEx Express साठी आंतरराष्ट्रीय काय्रसंचालनांचे व्यवस्थाापकीय संचालक सुवेंदू चौधरी म्हणाले, ‘’ FedEx मध्ये आम्ही जबाबदारीने आणि संसाधनाने जगाशी संलग्न होण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि अक्षय पात्रसोबत त्यांच्या कामाच्या पद्धतीत शाश्वत बदल घडवून आणण्यास आम्हाला आनंद होत आहे. आमच्या FedEx केअर्स उपक्रमाचा भाग म्हणून, आम्ही जगभरातील समुदायांसोबत काम करत आहोत, ज्यामुळे लोक आणि सामानांसाठी अधिक शाश्वतपणे सुविधा देण्यास मदत होईल. अक्षय पात्रला ई-बाईक्स व सौर पॅनेलचे योगदान पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करेल, परिणामी शाळेतील मुलांना अधिक जेवण मिळेल.”
अक्षय पात्र फाऊंडेशनचे चीफ सस्टेनेबिलिटी अॅण्ड कम्युनिकेशन ऑफिसर अनंत अरोरा या सहयोगाचे कौतुक करत म्हणाले, ‘’आम्ही तळागाळातील मुलांची भूक आणि कुपोषणाचे निर्मूलन करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या दिशेने काम करत असताना आणखी एक ध्येय – पर्यावरणाची पतरफेड पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. स्कूल-रिलेशनशिप अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक-वेईकल्स आणि पनवेल येथील सोलर पॉवर प्लांट यांना देणगी देऊन गो-ग्रीन उपक्रमाला प्रोत्साहन व पाठिंबा देण्यासाठी FedEx Expressचे प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत. मला खात्री आहे की हा सहयोग आम्हाला आमच्या दैनंदिन कामकाजात अधिक शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यात मदत करेल आणि आमचा कार्बन फूटप्रिंट कालांतराने कमी होत जाईल याची खात्री मिळेल. आम्ही FedExच्या परोपकाराबद्दल मनापासून कृतज्ञ आहोत, कारण ते आम्हाला आमच्या हरित उद्दिष्टांच्या एक पाऊल जवळ घेऊन जातील. महामारीच्या काळात आम्हाला मुलांची व समुदायांची सेवा करण्याची ही संधी उपलब्ध करून दिली आणि आमच्या प्रयत्नांना पाठिंबा व प्रोत्साहन दिले, याबद्दल मी केंद्र सरकार व कर्नाटक सरकारचे आभार मानतो.’’
About The Akshaya Patra Foundation
The Akshaya Patra Foundation is a not-for-profit organization that strives to address classroom hunger and malnutrition in India. By implementing the Mid-Day Meal Scheme in Government and Government-aided schools, Akshaya Patra aims to fight hunger and, at the same time, bring children to school. Since 2000, Akshaya Patra has worked towards reaching out to children with wholesome food every single school day.
In partnership with the Government of India and various State Governments and with the inestimable support of many philanthropic donors and well-wishers, Akshaya Patra has grown from humble beginnings serving just 1,500 school children across five schools to becoming the world’s largest (not-for-profit run) mid-day meal program, serving wholesome food to over 1.8 million children from 19,039 schools [as of March 2020] across 14 states & 2 union Territories in India.
About FedEx Express
FedEx Express is the world’s largest express transportation company, providing fast and reliable delivery to more than 220 countries and territories. FedEx Express uses a global air and-ground network to speed delivery of time-sensitive shipments, by a definite time and date.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे