घरगुती वस्तूंचे ब्रॅंड सिस्का चे रिमोट कंट्रोल वर चालणारे बी एल डी सी इफेक्टा एसएफआर-१५०० सिलिंग फॅन बाजारात I
घरगुती वस्तूंचे ब्रॅंड सिस्का चे रिमोट कंट्रोल वर चालणारे बीएलडीसी इफेक्टा एसएफआर-१५०० सिलिंग फॅन बाजारात
· हा पंखा ५०% पर्यंत वीज वाचवतो.
· शासनाच्या मेक इन् इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने पंखे स्थानिक पातळीवर तयार केले जातात.
मुंबई, ०७ फेब्रुवारी २०२३: भारतातील एक आघाडीचे एफएमसीजी ब्रॅंड सिस्का समूहाने आज बीएलडीसी इफेक्टा एसएफआर १५०० हा सिलिंग फॅन बाजारात आणल्याची घोषणा केली. बीएलडीसी पंख्यांमध्ये ऊर्जा बचत तंत्रज्ञान आहे जे वीज वापर ५०% पर्यंत कमी करू शकते. सिस्काद्वारे पंख्यांचे सर्व प्रकार पर्यावरणीय दृष्ट्या पूरक असून ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्ये पूर्ण करण्याच्या उद्देशाने डिझाईन आणि विकसित केले आहेत.
भारतीय घरांमध्ये अंदाजे ९० दशलक्ष हून अधिक पंखे बसवलेले असून आपल्याकडे पंखे हेच मुख्य थंडावा देणारे साधन आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण उर्जेपैकी २५% ऊर्जा पंख्यांना लागते त्यामुळे पंखे हे भारतातील सर्वात जास्त ऊर्जा वापरणार्यांपैकी एक आहे. सिस्काच्या ऊर्जा बचत उद्दिष्टांना समर्थन देण्याच्या उद्देशाने कंपनी ने सर्वात जास्त ऊर्जा कार्यक्षम सिलींग फॅन बाजारात आणले आहेत, जे कमी आवाज करणारे व कमी देखभालीची आवश्यकता असणारे आहेत. त्यांच्या शक्तिशाली बीएलडीसी मोटरसह हा पंख २२० cmm हवेची डिलिव्हरी देतो आणि पंख्याचे पाते १२००mm हलवतो आणि ३० वॅट ऊर्जा वापरतो.
सिस्का समूहाचे संचालक श्री. राजेश उत्तमचंदानी या पंख्याबाबत बोलताना म्हणाले, “सिस्का जे करते त्याच्या केंद्रस्थानी किफायतशीरपणा आणि शाश्वतता आहे. आमची हीच परंपरा लक्षात घेऊन आमच्या उत्पादनांमध्ये हे दोन्ही घटक देऊन आमच्या सिलिंग फॅनच्या प्रकारांमधील सर्वात नवीनतम मॉडेल सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचे नवीन बीएलडीसी इफेक्टा एसएफआर १५०० सिलिंग फॅन उर्जेचा वापर कमी करण्याच्या उद्दिष्टाने बनवण्यात आले असून ते कमी वीज वापरुन ग्राहकांचे वीज बील कमी करण्यात मदत करते; आणि अशाप्रकारे याद्वारे एखादे उपकरण वापरताना अधिक ऊर्जा वापर या मूलभूत समस्येचे निराकरण केले जाते.”
सिस्का बीएलडीसी इफेक्टा एसएफआर १५०० सिलिंग फॅनची प्रमुख वैशिष्ठ्ये:
· धूळ प्रतिरोध:
गंजमुक्त पेंटच्या वापराद्वारे पंख्यांमध्ये धूळ प्रतिरोध हे वैशिष्ठ्य या मध्ये जोडले आहे.
· रिमोट कंट्रोल:
पंखा रिमोट ने ही चालवता येतो.
· कमी आवाजात शांतपणे कार्य:
या पंख्याची पाती अशा पद्धतीने काळजीपूर्वक बनवली आहेत जेणेकरून ते कमी आवाजात शांतपणे काम करतात.
· उत्कृष्ट प्रतीचे मेटॅलिक फिनिश:
या पंख्याला उत्कृष्ट मेटॅलिक फिनिश देण्यात आले आहे, जे ग्राहकांच्या घरात सौन्दर्य आणि अभिजाततेचा स्पर्श जोडते.
· एरोडायनामिक ब्लेड:
एरोडायनामिक ब्लेडस् उच्च हवा वितरण सुनिश्चित करते.
या भारतीय बनावटीच्या (मेड इन इंडिया) पंख्याला कोणत्याही अडचणीच्याशिवाय सहज लावता येते. हा पंखा ग्राहक सर्व आघाडीच्या किरकोळ विक्री दुकानांमधून खरेदी करू शकतील. ग्राहकांना सौन्दर्य दृष्ट्या जास्त आनंददायी बनवण्यासाठी बीएलडीसी इफेक्टा एसएफआर १५०० सिलिंग फॅन काळा, पांढरा, सॅण्ड ग्रे, बेकर्स् ब्राऊन, ब्लॅक अँड व्हाइट, ब्लॅक अँड आयव्हरी अशा रंगत उपलब्ध आहे. हा पंख सर्व आघाडीच्या किरकोळ विक्री दुकानांमधून रु ६,९९९/- या किंमतीत खरेदी करता येईल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi