ब्रिटानियाच्या शेअर मध्ये वाढ होण्याची शक्यता – शेअर बाजार तज्ज्ञांचे मत I

ब्रिटानियाच्या शेअर मध्ये वाढ होण्याची शक्यता – शेअर बाजार तज्ज्ञांचे मत

आव्हानात्मक वातावरण असूनही, ब्रिटानिया इंडस्ट्रीजने मजबूत पोर्टफोलिओ, थेट वितरण आणि सुधारित वितरण पायाभूत सुविधांच्या सुदृढ मिश्रणाद्वारे ७.६% वार्षिक (देशांतर्गत विक्री ८.४% वाढली, तर निर्यात ४.८% नी घसरली) वाढीचा वेग कायम ठेवला.

ब्रिटानियाने २०१८ मध्ये एकूण फूड कंपनी बनण्याचा प्रवास सुरू केला आणि या उत्पादनांच्या वितरणात वाढ झाल्यामुळे सॉल्टेड स्नॅक्स, मिल्कशेक, क्रीम वेफर्स, डेअरी उत्पादने, मूल्यवर्धित डेअरी उत्पादने आणि क्रोइसंट्स अधिक प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. या नवीन श्रेणींमधील योगदान अद्याप सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. ब्रिटानियाचे धोरण हे मूल्यवर्धित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणे आहे, ज्यात जास्त मार्जिन असलेले दूध-आधारित पेये, चीज आणि डेअरी व्हाइटनर्स आहेत.

ब्रिटानिया आपले वितरण जलद गतीने सुधारण्यावर काम करत आहे आणि अव्वल स्पर्धकांसह अंतर कमी करत आहे. गेल्या दोन वर्षांत माल थेट २६% पेक्षा जास्त वाढून २.४९ दशलक्ष आउटलेटवर पोहोचला आहे. दर वर्षी हि वाढ सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

ब्रिटानिया कंपनीचे बाजार भांडवल ८१,६५३.१५/- कोटी रुपये आहे

सध्या शेअरची किंमत रु ३,३०० ते रु ३,४०० च्या टप्प्यात वरखाली होत आहे. शेअरच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असून पुढील १२ ते १८ महिन्यांत किंमत रु. ३,७००/- ते तू. ३,८००/- पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

१४ सप्टेंबर २०२१ आणि ०८ मार्च २०२२ रोजी शेअरने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी रु. ४,१५२.०५/- आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी रु. ३,०५०.००/- ला स्पर्श केला आहे.

britannia
britannia

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified.

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *