बजाज फायनान्सला रु. २४१९/- कोटी नफा I Bajaj Finance profit of Rs. 2419/- Crore I
बजाज फायनान्सला रु. २४१९/- कोटी नफा
बजाज फायनान्सला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ८०% ची वाढ
बजाज फायनान्सने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ७९.६७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २४१९.५१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३४६.६४/- कोटी होती. हा सर्वाधिक नफा असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षाकरिता देखील कंपनीने सर्वाधिक नफा नोंद करीत विक्रम नोंदवला आहे. हि रक्कम रु. ७०२८/- कोटी आहे. मार्च अखेर तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्नात ३०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६०६८/- कोटी आहे. लोन बुक मध्ये १५% ची वाढ झाली असून ६.२८ मिलियन आहे. एकूण मालमत्ता व्यवस्थापन २९% ने वाढले असून रु.१,९७,४५२/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo