अॅमेझॉनतर्फे 30,000 महिला आणि युवकांसाठी उद्योजकता आणि आर्थिक साक्षरतेला चालना
अॅमेझॉनतर्फे 30,000 महिला आणि युवकांसाठी उद्योजकता आणि आर्थिक साक्षरतेला चालना
- ‘Entrepreneurship for Enablement’ कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक व्यवसायांना सक्षम करणे आणि त्यांच्यात परिवर्तन घडवून आणणे आहे. या उपक्रमांतर्गत त्यांना आर्थिक आणि डिजिटल साक्षरता तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेते होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यायोगे या अभिनव उद्योगाचे दीर्घकालीन यश सुनिश्चित केले जाईल.
- अमेझॉनचा उपक्रम पुढील तीन वर्षांत महाराष्ट्रातील १०,००० तरुण आणि महिलांना सक्षम बनवेल
महाराष्ट्र, 20 मार्च 2025: अॅमेझॉन इंडियाने “Entrepreneurship for Enablement” या तीन वर्षांच्या कार्यक्रमाची घोषणा केली असून त्याचा उद्देश 30,000 महिला आणि युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत तसेच त्यांच्या आर्थिक विषयक गोष्टींचे व्यवस्थापन करण्याबाबत शिक्षित करणे आहे. हा कार्यक्रम शाश्वत जीवनशैलीसाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यावर भर देत जगण्यासाठी बळ देण्याचे काम करणारी संस्था ACCESS Development Services यांच्यासोबत भागीदारीत राबवला जाणार आहे. अॅमेझॉनद्वारे सहनिर्मित आणि वित्तपुरवठा केला जाणारा हा उपक्रम हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. 20 मार्च 2025 रोजी गुरुग्राम येथे झालेल्या प्रारंभ सोहळ्यात विकास विभाग, गुरुग्राम, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) आणि ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RUDSETI) यांसारख्या महत्त्वाच्या सहयोगी संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उद्योजकांच्या विकासातील संधी आणि आव्हानांवर चर्चा झाली.
महिला उद्योजकतेवर भर देत हा कार्यक्रम रचनात्मक मार्गदर्शन कार्यक्रमाद्वारे सुमारे 3,000 उद्योजकांना व्यवसाय विकास प्रशिक्षण आणि मदत पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवतो. याशिवाय, सुमारे 24,000 सहभागींसाठी स्मार्टफोन वापराबाबत डिजिटल साक्षरता प्रशिक्षण आणि सुमारे 22,000 व्यक्तींसाठी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म प्रशिक्षण देण्याची योजना आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत 1,200 नवीन उद्योग स्थापन करण्यास मदत केली जाईल. त्यापैकी 80% उद्योग त्यांच्या तिसऱ्या वर्षापर्यंत वार्षिक 1 लाख रु. चे उत्पन्न मिळवतील असा अंदाज आहे. याशिवाय, कार्यक्रमाद्वारे 10 आदर्श उद्योगांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी निम्मे उद्योग महिलांच्या नेतृत्वाखालील असतील. हे उद्योग वार्षिक 10 ते 25 लाख रु. ची उलाढाल साध्य करतील आणि नवीन रोजगार संधी निर्माण करतील. तसेच हा कार्यक्रम या उद्योजकांना ऑफलाइन तसेच ऑनलाइन विक्रीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देईल.
ACCESS Development Services चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. विपिन शर्मा म्हणाले, “भारतातील आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी आणि त्याच्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षेला गती देण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. अॅमेझॉनसोबत आमच्या ‘Entrepreneurship for Enablement’ उपक्रमाचा उद्देश महिलांना आणि युवकांना कौशल्ये, वित्तीय सहाय्य आणि डिजिटल साधने उपलब्ध करून देऊन त्यांना यशस्वी व्यवसाय सुरू करण्यास सक्षम करणे आणि महत्वपूर्ण दरी भरून काढणे हा आहे. एकत्र मिळून आपण महिला प्रणीत उद्योगांची लाट निर्माण करू शकतो. त्यायोगे शाश्वत विकास, नवीन संधी आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.”
अॅमेझॉन लॉजिस्टिक्स इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. करूणा शंकर पांडे म्हणाले, “उद्योजकता हा आर्थिक वाढीचा महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही महिलांना आणि युवकांना शाश्वत व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक स्त्रोत आणि कौशल्ये पुरविण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपक्रमाद्वारे, 2027 पर्यंत भारताच्या उद्योजकता परिसंस्थेला चालना देऊन आर्थिक संधी निर्माण करणे आणि हजारो व्यक्तींना आत्मनिर्भर होण्यास सक्षम बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारच्या आमच्या सामाजिक प्रभाव उपक्रमांद्वारे आम्ही ज्या समाजात सेवा देतो त्यांचे सक्षमीकरण करणे, डिजिटल आणि आर्थिक समावेशन सुनिश्चित करणे तसेच त्यांच्यासाठी दीर्घकालीन संधी आणि फायदे सुनिश्चित करणे यावर भर दिला जातो.”
ज्ञानवर्धन आणि उद्योग विकास असा दुहेरी भर देत हा प्रकल्प तीन राज्यांमध्ये (5 ते 8 गावांच्या गटांमध्ये) अंमलात आणला जाईल.
हरियाणामध्ये, हा प्रकल्प गुरुग्राम जिल्ह्यातील फारुखनगर आणि तारु भागांतील तीन क्लस्टर्सवर, विशेषतः जमालपूर, सहसोला, बिनोला आणि भोराकलां या ठिकाणी लक्ष केंद्रित करेल. या भागांमध्ये कृषी उद्योग, अन्न उत्पादन युनिट्स, रीटेल व्यवसाय, हस्तकला आणि सौंदर्य प्रसाधन सेवा यांच्या वाढीची मोठी संधी आहे.
उत्तर प्रदेशमध्ये, हा उपक्रम लखनौमधील भाऊकापूर आणि उन्नावमधील बजेरा या दोन प्रमुख क्लस्टर्सवर लक्ष केंद्रित करेल. तिथे चिकनकारी आणि टेराकोटा यांसारख्या पारंपरिक हस्तकलेसह बँकिंग प्रतिनिधी युनिट्स, रिटेल स्टोअर्स, वस्त्रोद्योग आणि खाद्य सेवा उद्योगांसाठी मोठी संधी आहे.
महाराष्ट्रात, हा प्रकल्प भिवंडी भागातील तीन क्लस्टर्समध्ये राबवला जाणार आहे. येथे मातीची भांडी, वारली चित्रकला यांसारख्या पारंपरिक हस्तकलेच्या उद्योगांचा विकास, पॉवरलूम युनिट्स, अन्न उत्पादन उद्योग आणि शिकवणी वर्ग तसेच केटरिंग सेवांसारख्या सेवा-आधारित व्यवसायांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. हा प्रकल्प वेगवेगळ्या भौगोलिक भागांत राबविण्याचे उद्दिष्ट प्रत्येक प्रदेशातील विद्यमान कौशल्ये आणि बाजारपेठेतील क्षमता यांवर आधारित विविध उद्योजक संधींना चालना देण्याचे आहे.
अॅमेझॉन इंडिया आपल्या समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. 2014 पासून, आमच्या सामाजिक सहभाग उपक्रमांमध्ये शिक्षण, उपजीविका, आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता आणि आपत्ती निवारण प्रतिसाद यांसारख्या प्रमुख सामाजिक गरजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आज, आम्ही रचनाबद्ध, दीर्घकालीन कार्यक्रमांद्वारे अन्न आणि पोषण सुरक्षा, उपजीविका आणि कर्मचारी कल्याणावर भर देत आहोत. स्वयंसेवी संस्था, स्थानिक कार्यकर्ते आणि समुदाय भागधारकांसोबत सहयोग करत आम्ही कायमस्वरूपी आणि अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
About Amazon.in
Amazon is guided by four principles: customer obsession rather than competitor focus, passion for invention, commitment to operational excellence, and long-term thinking. Amazon strives to be Earth’s Most Customer-Centric Company, Earth’s Best Employer, and Earth’s Safest Place to Work. Customer reviews, 1-Click shopping, personalized recommendations, Prime, Fulfilment by Amazon, AWS, Kindle Direct Publishing, Kindle, Career Choice, Fire tablets, Fire TV, Amazon Echo, Alexa, Just Walk Out technology, Amazon Studios, and The Climate Pledge are some of the things pioneered by Amazon. For more information, visit www.amazon.in/aboutus.
For more information, contact:
Kriti Ashok
Amazon India
