भारतीय रेल्वेसाठी मेक इन इंडिया मूल्य साखळी विकसित करण्यासाठी गोदरेज अँड बॉयसची रेनमॅकसोबत भागीदारी I

भारतीय रेल्वेसाठी मेक इन इंडिया मूल्य साखळी विकसित करण्यासाठी गोदरेज अँड बॉयसची रेनमॅकसोबत भागीदारी

~स्वदेशी विकासाला चालना देण्यासाठी यूरोप आणि जपानमधील जागतिक तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई१ मार्च, २०२३: गोदरेज समूहाची एक प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयस ने जाहीर केले की, त्यांच्या गोदरेज टूलिंग व्यवसायाने रेनमॅक सोबत भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेलसाठी मशीनरी आणि प्लांट (M&P) प्रकल्पामध्ये भारतात तयार केलेली (मेड इन इंडिया) जागतिक दर्जाची उपकरणे बनवण्यासाठी भागीदारी केली आहे. या युतीमुळे गोदरेज अँड बॉयस आता रेल्वेसाठी उपकरणे डिझाईन करण्यापासून ते ती तयार करण्यापर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी देऊ शकतील आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये बोली लावू शकतील. कंपनी १५ वर्षांपेक्षा जास्त काळ भारतीय रेल्वेची विश्वासू भागीदार आहे.

          गोदरेज टूलिंगने रेल्वे वर्कशॉपमधील उपकरणे विकसित करण्यासाठी रेनमॅक सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या सहभागीदारीमुळे यूरोप आणि इतर विकसित देशांमधील रेल्वे उद्योगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून दिला जाईल आणि भारतासाठी त्याचे स्वदेशीकरण केले जाईल.

          भारतीय रेल्वेने वंदे भारत सारख्या नवीन पिढीच्या आधुनिक गाड्या आणि त्याबरोबरच नवीन रेल्वे वर्कशॉप आणि डेपोमध्ये गुंतवणूक करण्याची त्यांची योजना जाहीर केल्यामुळे गोदरेज अँड बॉयसने भारतीय रेल्वेला टर्नकी सोल्युशन प्रदान करून या संधीचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे केवळ भारत स्वावलंबी होण्यास चालना मिळेल असे नाही तर देखभाली दरम्यान रेल्वे आणि मेट्रो डब्यांची गती, गुणवत्ता आणि सुरक्षितता देखील सुधारेल. कंपनीला पुढील ५ वर्षांमध्ये या क्षेत्रातील २०-३०% मार्केट शेअर मिळण्याची अपेक्षा आहे.

          या प्रसंगी बोलताना गोदरेज टूलिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. पंकज अभ्यंकर म्हणाले, वंदे भारत सारख्या नवीन पिढीच्या आधुनिक गाड्या सुरू करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेसह देशभरातली रेल्वे नेटवर्कच्या बळकटीकरणात योगदान देण्यासाठी रेनमॅकसोबत भागीदारी करताना आम्हाला फार आनंद होत आहे. आमच्या दोघांच्या सामर्थ्याचा वापर करून एकत्रितपणे यूरोप आणि जपानमधील जागतिक तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन उत्पादनांच्या स्वदेशीकरणाला चालना देण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रमुख मशीन आणि प्लांट (M&P) गुंतवणुकीसाठी टर्नकी सोल्युशन्स देण्याचे आमचे ध्येय आहे. ही सहभागीदारी रेल्वे आणि मेट्रो डब्यांच्या देखभाली दरम्यान वेग, गुणवत्ता आणि सुरक्षा सुधारण्यास हातभार लावेल. आम्ही भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल्वेसाठी अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी  रेनमॅकसोबत दीर्घ आणि फलदायी सहकार्याची अपेक्षा करतो.

          गोदरेज टूलिंग आणि रेनमॅक यांच्यामध्ये दहा वर्षांची मजबूत भागीदारी असेल. आपल्यासाठी जी आयात पर्याय आहेत अशी डेपो उपकरणे भारतात विकसित करून ही सहभागीदारी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या भारताच्या उपक्रमांमध्ये योगदान देईल. गोदरेज टूलिंग रेल्वे वर्कशॉप्स आणि मेट्रो जिग्स आणि फिक्सचर, ऑटोमेशन सोल्यूशन आणि रेल्वे वर्कशॉप व मेट्रो डेपोंसाठी वर्कशॉप उपकरणे पुरवते.

godrej and Renmakch
godrej and Renmakch

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *