विशेष नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून गोदरेज तर्फे घरगुती वापरासाठीच्या कीटकनाशक फॉरमॅटचे सार्वत्रीकरण I
विशेष नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून गोदरेज तर्फे घरगुती वापरासाठीच्या कीटकनाशक फॉरमॅटचे सार्वत्रीकरण
· कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांपर्यंत परवडणाऱ्या वाजवी किंमतीत सुरक्षित मॉस्किटो रिपेलेंट्स पोहोचविण्यासाठीचे सर्वात मोठे पाऊल
· डेंग्यूच्या उच्चाटनासाठी जगातील सर्वाधिक परवडणाऱ्या वाजवी किंमतीतील उपाय सादर
· गुडनाइट मिनी आणि HIT नो-गॅस स्प्रे सादर – जगातील सर्वात स्वस्त लिक्विड व्हेपोरायझर आणि झटपट किल स्प्रे उपाय
· अगरबत्ती सारखे असुरक्षित आणि अनियंत्रित स्वरूपातील उपाय सध्या करणाऱ्या १० कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य
नवी दिल्ली, ०७ फेब्रुवारी २०२३: डासांमुळे होणाऱ्या रोगांविरुद्धच्या जागतिक लढ्यात भारताने मोठी झेप घेतली आहे. दोन स्वदेशी नवकल्पना असलेल्या आणि गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने विकसित केलेले जगातील सर्वात कमी किमतीचे लिक्विड मॉस्किटो रिपेलेंट उपकरण आणि नो-गॅस इन्स्टंट मॉस्किटो-किल स्प्रे यांचे नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल, मलेरिया नो मोअर इंडिया, फोर्टिस हॉस्पिटल नोएडा येथील तज्ञांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले.
ब्रँडेड गुडनाइट मिनी लिक्विड आणि हिट नो-गॅस स्प्रे ही नाविन्यपूर्ण उत्पादने कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी सुरक्षित आणि धूरमुक्त डास संरक्षण सुविधा पुरवितात. या ग्राहकांपैकी बरेच जण आज असुरक्षित आणि अनियंत्रित अशा जास्त प्रमाणात धूर करणाऱ्या अगरबत्ती वापरतात. या धोकादायक अगरबत्ती वापरण्याबाबत डॉक्टर सावधानतेचा इशारा देतात कारण त्यामुळे ब्राँकायटिस, दमा, श्वसनमार्गाचे रोग अशी गंभीर आजाराची परिस्थिती उद्भवू शकते. आत्तापर्यंत, नियंत्रित आणि सुरक्षित धूर न करणाऱ्या उपाय केवळ जास्त किमतीला उपलब्ध होत्या आणि त्यामुळे या ग्राहकांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नव्हत्या.
जीसीपीएलने या गरजा सखोलपणे समजून घेतल्या आणि संशोधन आणि विकासासह नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित केली. कमी उत्पन्न असलेल्या अनेक घरांमध्ये रात्रीच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो हे लक्षात घेता त्यांना सातत्यपूर्ण उच्च रिपेलंट प्रभावाची आवश्यकता असते. यातून सिंगल मोड मशिन म्हणून गुडनाइट मिनीचे इंजिनीअरिंग आकाराला आले. ते संपूर्ण रात्रभर उच्च कार्यक्षमता देते. फक्त ५० रुपये (रिपेलेंट मशीन + रिफिल) ची किंमत आणि ३५ रुपयांना रिफिल असलेल्या या सोल्यूशनची एका रात्रीच्या वापरासाठी किंमत फक्त २.५ रुपये पडते. भारतात विद्युतीकरणाने ९५% हून अधिक असा मैलाचा दगड ओलांडल्याने (मार्च २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण – ५ अहवालानुसार) या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब होण्याची अपेक्षा आहे.
दुसरे म्हणजे, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांकडे तुलनेने लहान आकाराच्या खोल्या असल्याने मोठ्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरण्यासाठी डिझाइन केलेले महागडे एलपीजी आधारित एरोसोल स्प्रे योग्य नव्हते. जीसीपीएलने नो-गॅस डिओडोरंट्सपासून प्रेरणा घेऊन हिट नो-गॅस स्प्रे विकसित केला. हे एक नाविन्यपूर्ण झटपट डास मारणारा, पाण्यावर आधारित स्प्रे असून याचा खर्च प्रति वापर प्रसंगी १.५ रुपये इतका कमी आहे. जीसीपीएलने केलेल्या चाचण्यांनुसार, हिट नो-गॅस स्प्रे पूर्णपणे सुरक्षित आणि धूरमुक्त असून नकली अगरबत्तीपेक्षा डासांना लवकर मारतो.
परवडणाऱ्या किंमतीत नावीन्यपूर्ण उत्पादने सादर करण्याबद्दल भाष्य करताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले, “आपण आतापर्यंत डासांपासून होणा-या रोगांचा प्रभाव कमी करण्यात मोठी प्रगती केली आहे. असे असले तरी विशेषत: लहान गावे, शहरे आणि ग्रामीण भागातील लोकांना सक्षमीकरणासाठी तयार करणे हा पुढे जाण्याचा मार्ग आहे. लिक्विड रिपेलेंट्स आणि एरोसोल हे डासांच्या विरूद्ध सर्वात प्रभावी उपाय आहेत, परंतु उच्च किंमतीमुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना ही उत्पादने परवडू शकत नव्हती. जीसीपीएल मध्ये आम्हाला गुडनाइट मिनी आणि हिट नो-गॅस स्प्रे सादर करण्यात अभिमान वाटत आहे. या नावीन्यपूर्ण उत्पादनांनी भारतातील लिक्विड रेपेलेंट आणि स्प्रे श्रेण्यांच्या किंमती ५०% पर्यंत खाली आणल्या आहेत आणि अशा प्रकारे ही उत्पादने प्रत्येकासाठी उपलब्ध होऊ शकत आहेत. या नावीन्यपूर्ण उत्पादनांसह आम्ही कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी सुरक्षित मॉस्किटो रिपेलेंट्सचे सार्वत्रिकीकरण करत आहोत. देशाच्या आरोग्यावरचा भार कमी करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाला पाठबळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
मलेरिया नो मोअर इंडियाचे कंट्री डायरेक्टर प्रतीक कुमार सादरीकरण कार्यक्रमातील परिसंवादातील चर्चासत्राचा एक भाग म्हणून बोलताना म्हणाले, “डासांमुळे होणारे रोग, विशेषतः मलेरिया ही सार्वजनिक आरोग्य समस्या आहे आणि त्याचे संपूर्ण निर्मूलन हे आपले ध्येय असले पाहिजे. जर आपल्याला २०३० पर्यंत मलेरियामुक्त करण्याच्या आपल्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला बळकट करायचे असेल तर आपल्याला प्रतिबंधाच्या पलीकडे जाऊन निर्मूलन सुनिश्चित करणारी वेगळी रणनीती असणे गरजेचे आहे. नवीन युगाची साधने आणि तंत्रज्ञान यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. खाजगी आरोग्य पुरवठादारांची यात मोठी भूमिका आहे. मलेरिया निर्मूलनासाठी या रोगावर लक्ष केंद्रित करण्याकरता सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. आपण नवीन उपाय विकसित केले पाहिजेत, ते उपाय सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी उच्च तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे आणि वेळेवर यात हस्तक्षेप केला पाहिजे. अधिक महत्त्वाचे म्हणजे पुढील पायरी म्हणून रोगाचा जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या भागात कमी खर्चाच्या उपायांसह कमी उत्पन्न गटांना सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे.”
“हवामान बदलासारख्या घटकांमुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे देशातील आजारांचा भार लक्षणीय वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्र लवकर बरे वाटावे म्हणून प्रगत उपचारांवर संशोधन आणि विकास करत असतानाच डासांपासून होणा-या रोगांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लोकांनीही याबाबत प्रतिबंधक धोरणांचा अवलंब करणे महत्त्वाचे बनले आहे. जरी सामान्य लोकांना डासांपासून संरक्षणाची गरज माहीत असली तरी ते वारंवार धूर पसरविणाऱ्या अगरबत्ती सारख्या धोकादायक आणि अनियंत्रित पर्यायांकडे वळतात. त्यातून इतर रोग आणि श्वासोच्छवासाचे आजार यात आणखी वाढ होऊ शकते. या अगरबत्ती कमी खर्चिक असल्या तरी त्यामुळे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम फार कमी लोकांना माहिती आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या संरक्षणाची हमी देणारे व्यावहारिक, किफायतशीर नावीन्यपूर्ण उपाय आणि ते सर्वांना उपलब्ध होणे याची तातडीने आवश्यकता आहे,” असे नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटल मधील पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअर विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. राहुल शर्मा म्हणाले.
जीसीपीएल देशातील वेक्टर-बोर्न रोगांचा प्रभाव कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. गुडनाइट आणि हिट सारख्या महत्वाच्या ब्रँड्सद्वारे कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये विविध फॉरमॅटमध्ये अनेक नवकल्पना सादर केल्या आहेत.
२०१६ मध्ये, जीसीपीएलने २०३० पर्यंत मलेरिया निर्मूलनाच्या भारताच्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी सुसंगत एलिमीनेशन ऑफ वेक्टर-बोर्न एंडेमिक डिसीजेस (EMBED) प्रकल्पाचा सीएसआर उपक्रम सुरू केला. हा कार्यक्रम फॅमिली हेल्थ इंडिया (FHI) यांच्या सहकार्याने राबवला जात असून स्वयंसेवी संस्था आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड सरकारचा आरोग्य विभाग यात भागीदार आहेत. EMBED चे उद्दिष्ट जास्त भार असलेल्या भागात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियामुळे होणारे विकार आणि मृत्यू कमी करणे आहे. आजपर्यंत EMBED प्रकल्प मध्य प्रदेशातील ९ जिल्हे, उत्तर प्रदेशातील ४ जिल्हे आणि छत्तीसगडमधील २ जिल्ह्यांमध्ये मिळून २,००० हून अधिक गावांमधील ५ लाखांहून अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. जीसीपीएलचा EMBED कार्यक्रम २०३० पर्यंत मलेरिया निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतातील जास्त भार असलेल्या गावांना मदत करू शकणारे मोजमाप करण्यायोग्य मॉडेल तयार करण्यात यशस्वी ठरला आहे.
मोठा बदल घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असताना जीसीपीएलची नवीन कमी किमतीची नाविन्यपूर्ण उत्पादने व्हेक्टर बोर्न रोगांपासून मुक्त राष्ट्राच्या सरकारच्या संकल्पनेला पाठबळ देतात.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi