अर्थसंकल्प २०२३ – कोणाला काय मिळाले ?
अर्थसंकल्प २०२३
– पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करणार, सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उपाय केले जाणार
– ८१ लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करणार
– देशभरात नॅशनल डिजिटल लायब्ररीची स्थापना करणार
– हैदराबादमधील श्रीअन्न (भरड धान्यासाठी) संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक मदत केली जाणार
– ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण
– सिकल सेल एनिमियाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करणार
– मत्स्य विकासासाठी ६ हजार कोटींची विशेष तरतूद
– देशभरात १५७ नर्सिंग कॉलेज उभारणार
– जिल्हा शिक्षक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार
– आदिवासी विकासासाठी पुढील तीन वर्षाचा कृतीआराखडा तयार करणार
– पुढच्या ३ वर्षांत ३८,८०० शिक्षक-कर्मचाऱ्यांची भरती
– पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीत ३३ टक्क्यांनी वाढ
– रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद
– पंतप्रधान आवास योजनेसाठी आर्थिक तरतूद ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रुपये करणार
– ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार. गटारांच्या सफाईसाठी मानवी वापर बंद करणार
– देशात ५० नवीन विमानतळांची उभारणी करणार
– पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल.
– ई-कोर्ट्सच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात केली जाणार. ७ हजार कोटींची तरतूद करणार.
– ५जी सेवांचा वापर करणारे एप्लिकेशन तयार करण्यासाठी देशभरातल्या इंजिनिअरिंग संस्थांमध्ये १०० लॅब्ज उभारण्यात येणार
– नैसर्गिक खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पीएम प्रणाम’ योजनेची घोषणा
– हरित ऊर्जा क्षेत्रासाठी ३५ हजार कोटींची तरतूद
– १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार
– फलोत्पादनासाठी २२०० कोटी रुपयांची घोषणा
– अमृत धरोहर योजनेच्या माध्यमातून वेटलॅण्ड संरक्षण. त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार
– विविध राज्यांमध्ये ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्यात येईल
– पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ऐपवर सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याची योजना
– देशांतर्गत पर्यटन क्षेत्रांना चालना देण्यासाठी ‘स्वदेश दर्शन योजना’
– पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये ६६ टक्क्यांनी वाढ
– क्रेडिट रिव्हॅम्प स्कीमसाठी ९ हजार कोटींची तरतूद
– लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी ९ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
– महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा
– ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा १५ लाखांवरून ३० लाखांवर वाढवण्याची घोषणा
– कस्टम ड्युटी दर २१ पासून १३ पर्यंत खाली आणण्याचा प्रस्ताव
– २०२५-२६ आधी वित्तीय तूट जीडीपीच्या ४.५ टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस
– तुुरुंगात असलेल्या गरीब कैद्यांना मिळणार आर्थिक मदत
– मोबाईल फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव. बॅटरीजवरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव.
– इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार
– करपात्र उत्पन्नाची मर्यादा ७ लाखांपर्यंत वाढवली
३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
३ ते ६ लाख – ५ टक्के
६ ते ९ लाख – १० टक्के
९ ते १२ लाख – १५ टक्के
१२ ते १५ लाख – २० टक्के
१५ लाखांहून जास्त – ३० टक्के
– बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी सुट्ट्यांच्या मिळणाऱ्या रकमेत २५ लाखांपर्यंत करामधून सूट
– करांवरील सरचार्ज ३७ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत कमी
– ९ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ ४५ हजार रुपयाचा तर १५ लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर १.५ लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार
– मार्च २०२४पर्यंत उत्पादन सुरू करणाऱ्या सहकारी सस्थांसाठी करात १५ टक्क्यांपर्यंत सवलत
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi