गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने प्रिमायसेस सिक्युरिटी सोल्युशन्स (पीएसएस) श्रेणीमध्ये नोंदवली २०% ची वाढ I

भारत, २३ जानेवारी २०२३: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसची व्यवसायशाखा गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने त्यांच्या प्रिमायसेस सिक्युरिटी सोल्युशन्स (पीएसएस) या ब्रँडच्या एकूण महसुलामध्ये १५% योगदान देणाऱ्या संस्थात्मक व्यवसायाच्या उप-विभागाद्वारे २०% ची वाढ नोंदवली आहे. सुरक्षितता हा भारत सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमाचा मूलभूत पायाभूत घटक असल्याने व्यवसायात या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. देशाच्या पश्चिमेकडील प्रदेशा पाठोपाठ दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील प्रदेश या वाढीस हातभार लावत आहेत.

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे व्यवसाय प्रमुख श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “जीएसएस मध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुरक्षा उपाय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि आम्हाला या विभागामधील मार्केट लीडर्सपैकी एक असल्याचा अभिमान आहे. कंपनीने ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या सुविधा विकसित करण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये २ कोटी रुपयांची गुंतवणूक देखील केली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन आणि सुधारित उपायसुविधा तयार करण्यात गुंतवणूक करत राहू.”

अत्याधुनिक उत्पादने आणि उपायसुविधा यांच्या विस्तृत पोर्टफोलिओसह गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स बँकिंग आणि वित्तीय सेवा, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटॅलिटी, आयटी यासारख्या उद्योगांमधील ग्राहकांना उत्कृष्ट संरक्षण प्रदान करण्यात सक्षम आहे. जागतिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि संशोधन आणि विकास यावर भर देऊन व्यवसायाने ग्राहक केंद्रित दृष्टिकोन स्वीकारला आहे. पुढील दोन वर्षांत व्यवसाय भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेसाठीच्या खर्चात ३०% वाढ करण्यासाठी वचनबद्ध आहे. अलीकडील काही तंत्रज्ञान संपादन चालू आहे. जोडीला गोदरेज आणि बॉयसच्या व्यवसाय युनिटने भरभराट होत असलेल्या डेटासेंटर उद्योगासाठी भागीदार देखील आणले आहेत.

नवीन भागीदारांना ऑनबोर्डिंग करण्यासाठी आणि म्हणून वर्तमान पीएसएस चॅनेल विस्तार श्रेणी सक्षम करण्यासाठी विशिष्ट ग्राहक वर्गावर आणि भौगोलिक प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले जाते.

प्रिमायसेस सिक्युरिटी सोल्युशन्स विभागातील काही सर्वाधिक विक्री होणार्‍या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये क्रॅश रेट बोलर्ड्स, क्रॅश रेटेड रोड ब्लॉकर्स, UVSS, XBIS (एक्स-रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टम,) फेशियल रेकग्निशन सिस्टिम सह फ्लॅप बॅरिअर्सचे एकात्मिक सुरक्षा उपाय असल्याचे आढळून आले आहे. याव्यतिरिक्त जीएसएस आणि त्याच्या भागीदारांनी अँटी-स्पूफिंग तंत्रज्ञानासह नवीन एफआरएस वॉकथ्रू मोड विकसित करण्यासाठी सहकार्य केले आहे. हे अधिकृत व्यक्तींना अखंड प्रवेश प्रदान करते आणि फ्लॅप बॅरियरसह एकत्रीकरणामुळे चुकीच्या स्वीकृतीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे हे प्रचंड सुरक्षित आहे. प्रतिकूल ड्रोन शोधण्याची आणि निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली चिमेरा म्हणून ओळखली जाणारी अँटी-ड्रोन प्रणाली ही या श्रेणीतील आणखी एक महत्वपूर्ण जोड आहे.

पादचाऱ्यांच्या प्रवेश नियंत्रण सोल्यूशन्सचे भारतातील एक प्रमुख उत्पादक असल्याने आणि पीएसएस विभागातील पहिली पसंती होण्यासाठी प्रयत्नशील असल्याने जीएसएसने सेंट्रल व्हिस्टा, टी हब तेलंगणा, संसद इ. सारख्या विविध महत्वाच्या सरकारी प्रकल्पांसह भागीदारी केली आहे.

Godrej security solutions
Godrej security solutions

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *