महिंद्रा लॉजिस्टिक्सने रिवीगोला संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले I
महिंद्रा लॉजिस्टिक्सने रिवीगोला संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले
~महिंद्राची उपकंपनी “एम एल एल एक्सप्रेस सर्विसेस प्रायवेट लिमिटेड” (एम इ एस पी एल) हा एक्सप्रेस व्यवसाय करेल.
~ एम इ एस पी एल चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) म्हणून श्री. श्रीराम वेंकटेश्वरन यांची नियुक्ती केली गेली आहे.
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२२: भारतातील एकत्रितपणे संपूर्ण लॉजिस्टिक्स आणि मोबिलिटी सोल्यूशन्स पुरविणार्यांपैकी एक अग्रगण्य प्रदाता महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एम एल एल) ने आज रिवीगो सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (आर एस पी एल ) चा बी २ बी एक्सप्रेस व्यवसाय आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले. एम एल एल ने आपली उपकंपनी एम एल एल एक्सप्रेस सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (एम इ एस पी एल) च्या माध्यमातून १० नोव्हेंबर पासून या प्रक्रियेचे सर्व व्यवहार पूर्ण करून बंद केले.
भारतातील प्रमुख लॉजिस्टिक्स कंपन्यांपैकी एक कंपनी, एम एल एल आपल्या 3 पी एल, एफ टी एल ट्रान्सपोर्टेशन, वेअर हाऊस, क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक्स, लास्ट माईल आणि बी टु बी एक्सप्रेस व्यवसाय या सर्वांना एकत्र करून आपल्या ग्राहकांना सप्लाय चैन सोल्यूशन देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. रिवीगोचे नेटवर्क, तंत्रज्ञान आणि प्रक्रियेची क्षमता ही एम एल एल च्या सध्याच्या बी २ बी एक्सप्रेस व्यवसायात एकत्र आल्याने एकूणच महिन्द्रा चा बी २ बी व्यवसाय आणि ग्राहक मूल्य अजून मजबूत होईल.
आता एम एल एल एक्सप्रेस सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (एम इ एस पी एल) झालेली , गुरूग्राम मध्ये स्थित असलेल्या रिवीगोकडे संपूर्ण भारतभर पसरलेली बी २ बी एक्सप्रेस नेटवर्क क्षमता, मजबूत ग्राहक संख्या आणि संपूर्ण सेवा देता येईल असे तंत्रज्ञान संच आहे. रिवीगो चे बी २ बी एक्सप्रेस नेटवर्क सध्या भारतातील १९,००० हून जास्त शहरांमध्ये आहे आणि आता ते महिन्द्रा लॉजिस्टिक्सच्या सध्याच्या नेटवर्क मध्ये जोडले जात आहेत. त्यांचे २५० हून आधी प्रक्रिया केंद्र आणि शाखा आणि १.५ मिलियन चौरस फीट पेक्षा जास्त क्षेत्रात असलेले त्यांचे अस्तित्व एम इ एस पी एल च्या कामांना मजबूती आणेल.
एम इ एस पी एल ने खालील वरिष्ठांच्या नियुक्ती सुद्धा जाहीर केल्या:
श्रीराम वेंकटेश्वरन, जे सध्या महिंद्रा लॉजिस्टिक्स च्या सेल्स मार्केटिंग आणि कम्युनिकेशनस् विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (सीनियर व्ही पी) आहेत; ते एम इ एस पी एल चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) होतील.
सुनील सिंह हे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) म्हणून नियुक्त केले गेले आहेत. सुनील सिंह यांनी वेगवेगळे प्रकल्पांमध्ये नेतृत्व केले आहे आणि व्यवसायातील अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पडल्या आहेत. नुकतेच ते रिवीगो सर्विसेस प्रायवेट लिमिटेड च्या एक्सप्रेस व्यवसायाचे सी ओ ओ म्हणून काम पाहत होते.
स्वाती राणे या मुख्य फायनान्शियल ऑफिसर म्हणून काम पाहतील. स्वाती या महिंद्रा ग्रुप मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फायनान्शियल लीडर म्हणून २ दशकांपासून कार्यरत आहेत.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक आणि सी इ ओ श्री राम प्रवीण स्वामीनाथन यावेळी म्हणाले की, “ आम्ही बी २ बी एक्सप्रेस लॉजिस्टिक्स व्यवसाय भारतात वाढविण्याच्या आमच्या दीर्घकालीन ध्येयाबाबत खूप आनंदी आणि उत्सुक आहोत. अन्य व्यवसायांना जोडून मिळणारी मजबूती आमच्या ग्राहकांना दीर्घकाळ उत्तम सेवा देण्याची आमची क्षमता अधिक समृद्ध करेल. आम्हाला आमच्या नेतृत्वावर आणि अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते आमच्या विकासासाठी योग्य प्रोत्साहन देतील.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- डॉ. मारुती पवार यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान – भारताच्या ‘स्टील व्हिजनरी’च्या प्रेरणादायी वाटचालीला सलाम
- गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण
- स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण
- बास्किन रॉबिन्सने क्विक कॉमर्स व स्नॅकिंग ट्रेंडसाठी रिटेल विस्तार केला
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती