करोडोंचा झाला फायदा – डॉ अमित बागवे
करोडोंचा झाला फायदा – डॉ अमित बागवे
मराठी समाजातील मरगळ दूर करणे आवश्यक – डॉ अमित बागवे
डॉ अमित बागवे अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट I Dr Amit Bagwe in Arthsanket Diwali Biz Conclave I
अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न अर्थसंकेतची समृद्ध विचारांची दिवाळी ‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ ही संकल्पना ८ वर्षापूर्वी सुरू करण्यात आली आहे. विविध उद्योजकीय संस्था यात सहभागी होत असतात. या संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे काम अर्थसंकेत करीत आहे. अर्थसंकेतच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो उद्योजक घडले आहेत.दरवर्षी विविध थीम घेऊन हा कार्यक्रम केला जातो. या वर्षी “प्रारंभ” या संकलपनेवर आधारित थीम असणार आहे. कोणतेही काम सुरु करण्या अगोदर आपण श्री गणेशाची पूजा करतो आणि म्हणूनच यंदा ‘प्रारंभ’ या थीम अंतर्गत आपण विविध गणेश उत्सव मंडळांचे व्यवस्थापन आणि त्यांचे समाजाप्रती केले जाणारे उपक्रम हा विषय घेण्यात आला होता. अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना लचके बागवे यांच्या ‘सप्तरंग उद्योजकतेचे’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ‘सप्तरंग उद्योजकतेचे’ पुस्तकात श्री नितीन बोरसे (ठाणे वर्तमान), श्रीमती नीता पवाणी (ग्लोबल कॉम्प्युटर सर्व्हिसेस), श्री सचिन शिगवण (सोलारमॅन) , श्री महेंद्र देवळेकर (आकार क्नॉलेज वर्ल्ड), श्री दीपक हरिया (बिल्डर आणि डेव्हलपर), सौ कविता देशमुख (अर्श इन्फो सर्व्हिसेस) , श्री सुशील अगरवाल (अगरवाल ज्वेलर्स) यांनी परिस्थितीशी झगडून मिळविलेल्या यशाचे शब्दांकन केले आहे.‘लालबागचा राजा’ व ‘मुंबईचा राजा, गणेशगल्ली’ मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर श्री प्रीतम वैद्य, हेडहंटर श्री गिरीश टिळक, श्री राजेश विनायक कदम व झोई फिनटेक यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जेष्ठ मूर्तिकार श्री मनोहर बागवे यांच्या कार्याचा इंजि. डॉ. माधवराव भिडे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.गणेश मंडळे गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. समाजाला एकत्रित आणणे आणि समाजाच्या प्रती सामाजिक काम करणे हे कार्य ते अविरतपणे करत असतात. गणपती मधील १० दिवस उत्सवाचे आणि इतर वर्षभर समाज उपयोगी उपक्रम चालू असतात. त्यासोबतच अनेक लोकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि अर्थांजन चालू राहते. गेली २ वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हे कार्य बंद होते, पण या वर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या ह्या कार्याचा सन्मान अर्थसंकेत दिवाळी पहाट या कार्यक्रमात करण्यात आला. मुंबईतील जवळपास १० गणेशमंडळांचा सत्कार यावेळी करण्यात आला. शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी “अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट” हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री शंतनू भडकमकर, विकोचे श्री संजीव पेंढारकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे उपस्थित होते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दिवंगत आई-वडिलांना माउंट एव्हरेस्टवरून जगावेगळी श्रद्धांजली: पोलीस निरीक्षक द्वारका डोके
- व्यवसाय नेटवर्किंग आणि AIच्या माध्यमातून उद्योजकीय विकासाला नवी दिशा
- शेतमजुराच्या मुलापासून ४ फॅक्टरींच्या मालकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास: नीलकंठ चौधरी!
- स्वच्छ शहर जबाबदारी कोणाची | Environmentalist Shieital Sonawane | 365 Days 365 Stories | 13
- डिझायनमधून घडतोय जगण्याचा नवा अनुभव । Kavita Sawant | 365 Days 365 Stories |


