गोदरेज अँड बॉयस आपले १२५ वे वर्ष आणि सणासुदीचा हंगाम आकर्षक ग्राहक योजनांसह करत आहे साजरा!
गोदरेज अँड बॉयस आपले १२५ वे वर्ष आणि सणासुदीचा हंगाम आकर्षक ग्राहक योजनांसह करत आहे साजरा!
~ दररोज १ लाख रु. पर्यंत रोख बक्षिसे जिंकण्याची संधी. १ ते २५ ऑक्टोबर २२ पर्यंत दररोज १२५ विजेते ~
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२२: या सणासुदीच्या हंगामासाठी गोदरेज आणि बॉयसने सादर केलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक योजनेसाठी स्वत:ला तयार करा. त्यांचे ग्राहक आता दररोज १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जिंकू शकतात!
प्रत्येक सणासुदीच्या मोसमात, गोदरेज अॅण्ड बॉयसच्या नेतृत्वाखाली गोदरेज अप्लायन्सेस, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स, गोदरेज लॉक्स आणि गोदरेज इंटेरिओ यासारखे विविध ब्रँड आकर्षक सवलती, कॅशबॅक इन्सेन्टिव्ह आणि बरेच काही सादर करण्यासाठी ओळखले जातात. या वर्षी गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी त्यांचे १२५ वे वर्ष साजरे करत असताना आपले ग्राहक एक भव्य उत्सव साजरा करू शकतील हे गोदरेज अँड बॉयस हे सुनिश्चित करत आहे. ग्राहकांना केवळ आकर्षक ऑफरसह नावीन्यपूर्ण आणि नवीन उत्पादनांच्या श्रेणीतून खरेदी करण्याचा पर्याय नाही तर लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची आणि दररोज १ लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकण्याची संधी देखील आहे. दररोज १२५ भाग्यवान ग्राहक १ लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकू शकतात. ही योजना २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वैध आहे.
ग्राहक दोन सोप्या पायऱ्यांद्वारे या लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊ शकतात:
पायरी १ – https://www.godrej.com/125-lucky-draw. वर त्यांच्या खरेदीच्या तपशीलांसह स्वतःची नोंदणी करा.
पायरी २- १२५ भाग्यवान विजेत्यांची घोषणा वेबसाइटवर २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत दररोज रात्री ८ वाजता केली जाईल. विजेत्यांनी रोख बक्षीस प्राप्त करण्यापूर्वी खरेदी सत्यापित करणे आवश्यक आहे.
या मोहिमेविषयी बोलताना गोदरेज आणि बॉइसचे ब्रँड आणि स्ट्रॅटेजिक इनसाइट्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख मेहरनोश पिठावाला म्हणाले, “गोदरेज आणि बॉइसमध्ये आम्ही ग्राहकांना आमच्याशी बांधून ठेवणाऱ्या आणि निष्ठा वाढवणारे अनुभव मिळवून देण्याच्या मोहिमेवर आहोत. या महत्त्वाच्या १२५ व्या वर्षी आम्हाला आमचा आनंद ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्यांच्याबरोबर साजरा करायचा आहे. महामारीनंतर बाजारपेठा उघडल्या गेल्याने या सणासुदीच्या हंगामात पारंपारिक उत्साह बघायला मिळणार असून आम्ही निश्चितपणे त्याचे साक्षीदार आहोत. या योजनेसह आम्ही गोदरेज अप्लायन्सेस, गोदरेज लॉक्स, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स आणि गोदरेज इंटेरिओ कडून आमच्या योजनेमध्ये अधिक मोठ्या श्रेणीतील जागरूकता आणि आत्मीयता निर्माण होईल अशी आशा करतो.”
१२५ वर्षांहून अधिक काळ ग्राहकांना अंतर्बाह्य समजून घेत पिढ्यानपिढ्यासाठी प्रगती करण्याच्या उद्देशाने गोदरेज अँड बॉयस सतत नवनवीन उत्पादने आणि उपाय सुविधा तयार करत आहे.
खालील ठिकाणी योजनेविषयी अधिक जाणून घ्या:
Website: https://www.godrej.com/125-lucky-draw
Instagram: https://www.instagram.com/p/CjX9nZOP3Jm/?utm_source=ig_web_copy_link
Facebook: https://fb.watch/f_C9fixp2U/
About Godrej & Boyce
Godrej & Boyce (‘G&B’), a Godrej Group Company, was founded in 1897 and has contributed to India’s journey of self-reliance through manufacturing. G&B patented the world’s first springless lock and since then, has diversified into 14 businesses across various sectors from Security, Furniture, and Aerospace to Infrastructure and Defence. Godrej is one of India’s most trusted brands serving over 1.1bn customers worldwide daily.
To learn more visit: www.godrej.com
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi