गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट करणार दहेज येथील सुविधा केंद्राचा विस्तार, आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत महसूल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट करणार दहेज येथील सुविधा केंद्राचा विस्तार, आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत महसूल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
~ क्षमता उभारणीतून कार्यकुशलता विस्तार
~ आपल्या दहेज प्लांटच्या विस्तारासाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत विशेष आणि मोठ्या उपकरणांच्या वितरणासाठी हायड्रोजन आणि उर्जा क्षेत्रात आपले स्थान करत आहे मजबूत
मुंबई, २५ जुलै २०२२: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसची व्यवसाय शाखा गोदरेज प्रोसेस इक्विपमेंटने गुजरातमधील दहेज येथे त्यांच्या अत्याधुनिक सुविधा प्रकल्पाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. २०२५ पर्यंत महसूल दुप्पट करण्याची त्यांची योजना असून या विस्तारामुळे त्यांची क्षमता दुप्पट होत कार्यकुशलता वाढेल आणि या योजनेला बळकटी येईल. या चालू विस्तारामुळे त्यांचे उत्पादन क्षेत्र अंदाजे 25,000 चौ.मी.ने वाढेल. ते सध्या या विस्तारासाठी अतिरिक्त 300 कोटी रुपये गुंतवत आहेत.
गोदरेज आणि बॉयस द्वारे ही अत्याधुनिक उत्पादन सुविधा २०१६ मध्ये स्थापित केली गेली. ही सुविधा जागतिक प्रकल्पांसाठी महत्वाच्या आणि ओव्हर डायमेंशनल कंसाइनमेंट (ओडीसी) निर्मिती आणि वितरणासाठी सुसज्ज आहे. हा चालू विस्तार संसाधनांच्या सुधारित आणि कार्यक्षम वापरासह टिकाऊपणाच्या तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून तयार केला जात आहे. हरित उपक्रम जसे सौर ऊर्जा आणि पुनर्वापर, जलसंवर्धन आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी विविध आस्थापने यांचा समावेश यात केला जाईल. हा विस्तार उद्योगाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यावर आणि या भागात स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर केंद्रित आहे.
या धोरणात्मक विस्तारामध्ये आण्विक उपकरणांसाठी समर्पित भाग आणि जड उपकरणांच्या निर्मितीसाठी समर्पित दुसरा भाग यांचा समावेश असेल. यामध्ये टायटॅनियम, झिरकोनिअम इत्यादीसारख्या अनोख्या धातुकर्मांसह महत्वाची प्रक्रिया उपकरणे तयार करण्यासाठी अत्याधुनिक क्लीन रूमची सुविधा असेल. तसेच, क्रेनची उंची जास्त असल्याने १६ मीटर व्यासापेक्षा मोठ्या आणि ओव्हर डायमेंशनल उपकरणांचे उत्पादन सुलभ होईल. या विस्तारामध्ये मोठ्या आणि ओडीसी उपकरणांसाठी २ विस्तारित मॅन्युफॅक्चरिंग यार्ड देखील समाविष्ट असतील. विस्तारित फॅब्रिकेशन यार्डमध्ये २० मीटरपेक्षा कमी उंचीची एक क्रेन आहे ज्याचा मुख्य उद्देश मोठ्या आणि ओव्हर डायमेंशनल स्थिर उपकरणांच्या निर्मितीवर आहे. भविष्यात हे विस्तारित यार्ड मॉड्यूलर फॅब्रिकेशनसाठी देखील वापरले जाईल.
हा चालू विस्तार क्षमता आणि कार्यकुशलता या दोन्ही दृष्टीने गोदरेज प्रोसेस इक्विपमेंटला तेल आणि वायू, रसायने आणि खते आणि उर्जा क्षेत्रातील त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओ व्यतिरिक्त हायड्रोजन आणि ऊर्जा क्षेत्रातील विशेष आणि मोठ्या उपकरणांच्या क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्यास मदत करेल.
गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट देखील त्याची उत्पादन कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दहेजचे अत्याधुनिक सुविधा केंद्रात रूपांतर करण्यासाठी प्रक्रिया प्रवाह (वर्क सेंटर) संकल्पना हळूहळू अंमलात आणली जात आहे. वर्कसेंटर हे उत्पादनाचे एक नियुक्त क्षेत्र आहे जे विशिष्ट कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी करून उत्पादन प्रणाली अंतर्गत लवचिकता सुधारत आहे. उत्पादकता वाढल्याने लीड टाइम कमी होतो आणि त्यामुळे त्रुटी कमी होत विशेषीकरणात सुधारणा होते.
उच्च कुशल कर्मचारी आणि कामगारांच्या अंतर्गत क्षमता प्रशिक्षणाची काळजी घेण्यासाठी समर्पित प्रशिक्षण केंद्राचे आधुनिकीकरण केले जात आहे. वेल्डरना समग्र अनुभव मिळण्यासाठी आणि त्याद्वारे सिम्युलेशन वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी व्हीआर/एआर आधारित वेल्डिंग सिम्युलेटिंग सिस्टीम लागू करण्याची योजना आहे.
उत्कृष्टतेच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रवासात त्यांनी अलीकडेच दहेज येथे जागतिक दर्जाची चाचणी प्रयोगशाळा स्थापन केली असून ती एनएबीएल नुसार मान्यताप्राप्त आहे.
या प्रकल्प केंद्रात व्यवसाय देखील आपल्या कामकाजाचे डिजिटल रूपांतर करत आहे. IoT क्रांती उत्पादनात गेम चेंजर असेल आणि ते इंडस्ट्री 4.0 लागू करण्याची योजना आखत आहेत. ऑटोमेशनवर वाढलेला भर, डिजिटलायझेशनचा भाग म्हणून डिजिटल डेटा कॅप्चरिंग आणि शॉप फ्लोअरवर मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्यूशन सिस्टीमची अंमलबजावणी हे विविध उपक्रम दहेज मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये राबवले जात आहेत.
ऑटोमेटेड प्लेट मार्किंग आणि कटिंग प्रक्रियेसह उपकरणांच्या प्रत्येक तुकड्याच्या प्रवासापासून ऑटोमेशनवर भर देणे सुरू होते. त्यानंतर अंडर वॉटर प्लाझ्मा कटिंग, वॉटरजेट कटिंग, हॉटवायर टीआयजी प्रक्रिया, सबमर्ज्ड आर्क स्ट्रिप क्लॅडिंग (एसएएससी) आणि प्रगत नॉन-डिस्ट्रक्टिव्ह चाचणी (NDT) तंत्र येते. जोडीला ऑर्बिटल वेल्डिंग, नॅरो ग्रूव्ह टँडम वायर सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग (एसएडब्लू) आणि इनर बोअर इंटरनल डायमीटर आच्छादन यासह तंत्रज्ञान उपकरणांच्या निर्मितीला सुव्यवस्थित करतात. याव्यतिरिक्त नोझल कटिंग, नोजल वेल्डिंग, ट्यूब-टू-ट्यूब शीट वेल्डिंग इत्यादीसारख्या प्रमुख उत्पादन क्रियांमध्ये रोबोटिक्स आधीपासूनच आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की त्यांच्या वेल्डिंग क्रियांपैकी ८०% पेक्षा जास्त स्वयंचलित आहेत आणि या ऑटोमेशनचा मुख्य भर उत्पादकता, गुणवत्ता आणि सुरक्षितता सुधारणे हा आहे.
गोदरेज प्रोसेस इक्विपमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख हुसैन शरियार म्हणाले, “दहेज उत्पादन सुविधेने त्याच्या सुसज्ज क्षमतेमुळे आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प वितरित करण्याच्या क्षमतेमुळे आम्हाला अनेक मैलाचे टप्पे गाठण्यास सक्षम केले आहे. दहेज सुविधा प्रकल्प केंद्र केवळ परिमाणातच नव्हे तर जटिलतेमध्ये देखील विशेष उपकरणे तयार करण्याच्या उद्देशाने विकसित केली गेले होते. अशा उपकरणांच्या वाहतुकीसाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय बंदरांवर सहज प्रवेश मिळतो. ही विशेषता आम्हाला यामुळे मिळत आहे. या प्रकल्प केंद्राला एक स्मार्ट कारखाना बनवण्यासाठी आणि ग्राहकांना आनंद देण्यासाठी वितरित केलेल्या उत्पादनांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तसेच या प्रकल्प केंद्राला उद्योगातील सर्वात हरित उत्पादन सुविधांपैकी एक बनवण्याचा आमचा उद्देश आहे.”
About Godrej Process Equipment
Godrej Process Equipment is one of the fourteen businesses of Godrej & Boyce, with the largest global footprint in the G&B group. Godrej Process Equipment is a leader in manufacturing custom-built process equipment such as Heavy walled Reactors, Pressure Vessels, High-Pressure Heat Exchangers, Columns, Trays, and Reactor Internals for various critical applications in the Oil and Gas, Petrochemical, Hydrogen Fertilizer and Power sector across the globe, with over 80% of their products being exported.
About Godrej & Boyce Mfg. Co. Ltd
Godrej & Boyce (‘G&B’), a Godrej Group Company, was founded in 1897 and has contributed to India’s journey of self-reliance through manufacturing. G&B patented the world’s first springless lock and since then, has diversified into 14 businesses across various sectors from Security, Furniture, and Aerospace to Infrastructure and Defence. Godrej is one of India’s most trusted brands serving over 1.1bn customers worldwide daily.
To learn more visit: www.godrej.com
For further information, please contact:
Priya Shetty: priya.shetty@adfactorspr.com, 9870774424
Zainab Najmi: zainab.najmi@adfactorspr.com, 7710877863
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi