टायटनला रु. ९८७/- करोड नफा I Titan profit of Rs. 987/- Crore I
टायटनला रु. ९८७/- करोड नफा
टायटनला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात १३५% ची वाढ
ज्वेलरी व घड्याळ बनविणाऱ्या टायटन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १३५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९८७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४१९/- करोड चा नफा झाला होता. प्रोडक्ट विक्रीतून महसूल ३४.८०% ने वाढला असून हि रक्कम रु. ९३८१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६९१२/- करोड होती. कंझ्युमर बिझनेस व इतर विभागात कंपनीला व्यवसायात वाढ झाली आहे. प्रॉडक्ट व कॅम्पेन लॉन्च करिता कंपनी नावीन्यपूर्णता व तंत्रज्ञान यांचा अवलंब करते. घड्याळ व इतर वेअरेबल विभागात कंपनीला रु. ७०८/- करोड चे उत्पन्न तर आयवेअर बिझनेस मध्ये रु.३४/- करोड चे एकूण उत्पन्न कंपनीला मिळाले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo