अर्थसंकल्प २०२२ – श्री नितीन पोतदार (कॉर्पोरेट लॉयर)
अर्थसंकल्प २०२२ – श्री नितीन पोतदार (कॉर्पोरेट लॉयर)
कोविडमुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका लहान, मध्यम, सुक्षम व स्टार्टअप जेवढा झाला तितका कुणालाच झाला नसेल. खरं तर यांची परवड २०१६ च्या नोट बंदी पासुनच सुरु आहे. सहाजिकच त्यामुळे बेकारीही वाढली – नव्हे देशात सत्तर वर्षात झाली नव्हती इतकी बेकारी गेल्या दोन वर्षात झालेली दिसते. तसच गेली दोन वर्ष आपल्या शाळा-कॉलेज बंद असल्यामुळे देखिल जास्त मार हा सामान्यांना पडला. म्हणुन मला या बजेट मध्ये लघु, मध्यम व सुक्षम या उद्दोगांसाठी व शिक्षण क्षेत्रासाठी काही तरी भरीव असेल अस वाटल होत. त्यातच आता पाच राज्यांच्या निवडणुका देखिल आहे म्हटंल्यावर हा बजेट सामान्यांचा व शेतकर्यांचा बजेट असेल अस वाटल होत – पण तस काहीच घडलं नाही.
मला इथं फक्त तीन मुद्दे मांडायचे आहेत –
१. मोठ्या उद्दोजकांना जसे करोडो रुपयांचे पॅकेजेस (त्यात काही मुद्ल व व्याज माफी) सरकार आणि बॅंकांनी या पुर्वी दिली तसे एखादे पॅकेज लघु, मध्यम आणि सुक्षम उद्दोजकांना देखिल द्यायला पाहिजे होते. किमान जसे सार्टअप्सना 1 एप्रिल पासुन तीन वर्ष कर माफ असणार आहे – तीच कर सवलत किंवा निकान ५०% करमाफी या लहान उद्दोजकांना द्यायला काय हरकत होती? म्हणजे लहान उद्दोजकांनी फक्त कर्ज काढायची आणि फेडता नाही आली की आपला उद्दोग बंद करायचा हीच सरकारची अपेक्षा दिसते. हे खुपच दुर्दैवी आहे. सरकारला हे चांगल ठाउक आहे की या उद्दोगकांपैकी बहुतेक उद्दोजक हे अनौपचारिक (informal) इकोनोमीचा भाग आहेत कारण आपला देश हा गरिब देशा आहे. त्यांना मदत करायलाच हवी.
२. गेली दोन वर्ष सर्व शाळा- कॉलेज व इतर शैकक्षणिक संस्था बंद आहेत. त्यांना तर कुठलच पॅकेज सरकार विचार सुद्धा करायला तयार नाही. त्याउपर सरकार आता डीजिटल विद्यापीठ सुरु करणार आहे – म्हणजे आहे त्या शिक्षण संस्थांनी कायमचं बंद व्हाव अशी सरकारची अपेक्षा आहे का? बरं हे डिजिटल विद्यापीठ केंव्हा सुरु होणार – त्या साठी लागणारा निघी कुठे आहे? काहीच पत्ता नाही. २०२२ मध्ये सरकार ने खुप गाजावाजा करुन नविन शैकक्षणिक धोरण आणल त्याचा उल्लेख सुद्धा या बजेट मधे केलेला नाही. तरुणां बद्दल इतकी अनास्था आधीच्या कुठल्याही सरकार ने दाखवली नसेल.
३. स्टार्टअप्स बद्दल सरकार नेहमीच अस दाखवते की आम्ही किती अनुकुल आहोत. आता १ एप्रिल २०२२-२०२३ पर्यंत सुरु होणार्या स्टर्टअप्सना तीन वर्ष कर असणार नाही. म्हणजे आधी ज्यांनी ‘स्टर्टअप्-ईंडिया’ मध्ये सुरु केलेल्या कंपन्यांनी ज्या गेली दोन वर्ष कोविड मुळे ठप्प झालेल्या आहेत, कर्जबाजारी आहेत, त्यांनी काय पाप केल? जे ‘स्टर्टअप्स सुरु झालेले आहेत त्यांना मरु द्यायच का?
एकुणंच लघु, मध्यम व सुक्षम आणि स्टार्टअप जो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे; जो सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करतो त्याला या बजेटमध्ये काहीही ठोस अशी तरतुद केलेली दिसत नाही. ते आणि त्यांच नशिब.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo