BSE SME चे मार्केट कॅपिटलायझेशन पहिल्यांदाच रु. ५०,०००/- करोड हुन अधिक I BSE SME Market Capitalization crosses Rs. 50,000/- Crore I
BSE SME चे मार्केट कॅपिटलायझेशन पहिल्यांदाच रु. ५०,०००/- करोड हुन अधिक
शुक्रवारी पहिल्यांदाच BSE च्या स्मॉल अँन्ड मिडीयम एन्टरप्रायझेस प्लॅटफॉर्म वरील कंपन्यांनी पहिल्यांदाच रु.५०,०००/- करोड चा टप्पा पार केला . सध्या BSE SME प्लॅटफॉर्म वर ३५९ कंपन्या लिस्टेड आहेत. त्यातील १२७ कंपन्या मेन बोर्ड वर गेल्या आहेत.
BSE SME चे प्रमुख श्री अजय ठाकूर म्हणाले, हा BSE च्या इतिहासातील संस्मरणीय क्षण असून आम्हाला याचा अभिमान आहे. लघु व मध्यम उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांची होत असलेली प्रगती देशासाठी कौतुकास्पद आहे.
मार्च २०१२ मध्ये SME करिता हा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला. आणि गेल्या १० वर्षात या प्लॅटफॉर्म वरून कंपन्यांनी रु.३८००/- करोड चे इक्विटी फंड जमा केले आहेत. ठाकूर पुढे म्हणाले, आम्हाला विश्वास आहे कि यापुढे देखील लघु उद्योग या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून लिस्टिंग करून फंड उभारणी करतील.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo